11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

Realme आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Realme 10 Pro सीरिज सादर करणार आहे. हे फोन्स 108MP कॅमेरा आणि कर्व डिस्प्ले सारख्या फीचर्ससह भारतीयांच्या भेटीला येतील. एकीकडे नवीन सीरिज येत असताना दुसरीकडे कंपनीच्या जुन्या नंबर सीरिजच्या स्मार्टफोन डिस्काउंट दिला जात आहे. Realme 9 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट, 6GB रॅम, 48MP ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया Realme 9 5G ची किंमत, ऑफर्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Realme 9 5G ची किंमत आणि ऑफर्स

रियलमी 9 5जीचे दोन व्हेरिएंट्स फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. फोनचा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची एमआरपी 18,999 रुपये आहे परंतु 3000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा मॉडेल 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच Realme 9 5G 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांच्या ऐवजी 17,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: TVF Pitchers Season 2: 7 वर्षानंतर परत येतेय जबरदस्त वेब सीरिज; पुन्हा एकदा ऐकू येणार “तू बियर है **”

या स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील मिळत आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या फोनचा बेस व्हेरिएंट 2,667 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर विकत घेता येईल. Realme 9 5G स्मार्टफोन Black आणि Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

Realme 9 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 9 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईलसह येणारी या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आहे ज्याची थिकनेस 8.5एमएम आणि वजन 188 ग्राम आहे. रियलमी कंपनीनं आपला हा फोन Ripple Holographic Design सह लाँच केला आहे.

Realme 9 5G फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित रियलमी वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन डायनॅमिक रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते ज्यात 5जीबी वचुर्अल रॅम मिळतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडीसह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमर सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला ब्लॅक अँड व्हाईट पोर्टरेट कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! दर्जेदार फीचर्ससह Tecno Phantom X2 सीरिज दणक्यात लाँच; वनप्लसला टक्कर देण्याची तयारी

हा रियलमी मोबाइल ड्युअल सिमसह आला आहे तसेच दोन्ही सिम मध्ये 5जी वापरता येतं. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. हा रियलमी मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here