जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Mukesh Ambani यंदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली होती की कंपनी आपल्या 5जी फोनवर काम करत आहे. तेव्हापासून भारतीय या 5जी मोबाइलची आतुरतेने वाट बघत आहेत. Reliance Jio 5G Services भारतात सुरु झाली आहे आणि आता कंपनी आपल्या Jio Phone 5G ची देखील तयारी केली आहे. रिलायन्स जियोनं अद्याप जियोफोन 5जीच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु हा अफॉर्डेबल 5जी फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट झालं आहे की लवकरच Jio Phone 5G भारतात लाँच होणार आहे.

Reliance Jio Phone 5G Launch ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग काल रात्रीची म्हणजे 7 डिसेंबर 2022 ची आहे जिथे जियोफोन 5जी Jio LS1654QB5 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे JioPhone5G या नावावरील पडदा उठला आहे आणि कन्फर्म झालं आहे की हा स्वस्त 5जी फोन लवकरच लाँच होणार आहे. हे देखील वाचा: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Oppo लाँच करणार 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip ची लाँच डेट कंफर्म

Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

गीकबेंच लिस्टिंगमध्ये जियोफोन 5जी अँड्रॉइड 12 ओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनमध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल हे समजलं आहे. गीकबेंचनुसार, हा स्मार्टफोन 2.21गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लाँच होईल तसेच या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट (Qualcomm Snapdragon 480+) मिळेल. ग्राफिक्ससाठी जियोफोन 5जी मध्ये एड्रेनो 619 जीपीयू दिला जाऊ शकतो.

Jio Phone 5G चे संभाव्य स्पेक्स

लीक्सनुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: 11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

सर्वात स्वस्त 5जी फोन

Jio Phone 5G भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) असू शकतो. काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टनुसार रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन जियोफोन 5जी 8,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 8 हजार ते 12 हजार पर्यंत असू शकते. फोनच्या ठोस किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here