Oppo लाँच करू शकते 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip येऊ शकतात बाजारात

Oppo नं आपल्या वार्षिक इव्हेंट Oppo Inno Day ची तारीख सांगितली आहे. यंदा हा इव्हेंट 14 डिसेंबरला आयोजित केला जाईल. या इव्हेंटच्या माध्यमातून एंटरटेनमेंट, प्रॉडक्टिव्हिटी, हेल्थ आणि एज्युकेशन क्षेत्रातील स्मार्ट टेक्नॉलॉजी सादर केली जाऊ शकते. परंतु सर्वांची नजर या इव्हेंटच्या माध्यमातून लाँच होणाऱ्या बहुप्रतीक्षित फोल्डेबल आणि फ्लिप Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip फोनवर असेल. ज्यांची लाँच डेट देखील कंपनीनं सांगितली आहे.

Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip लाँच

Oppo Inno Day 2022 च्या तारखेची घोषणा कंपनीनं केली आहे. 14 आणि 15 डिसेंबरला या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. इव्हेंट 14 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल, आणि कंपनीच्या युट्युब व सोशल मीडिया चॅनेल्सवरून पाहता येईल. या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip फोन सादर केले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. हे देखील वाचा: 11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन

लीक्सनुसार, ओप्पो फाइन्ड एन2 फ्लिपमध्ये 6.8 इंचाचा Full HD+ फोल्डेबल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 3.26 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो. हा फोन Android 13 आधारित ColorOS 13 वर चालू शकतो. यात MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह 12GB RAM पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी आणि 8MP चा Sony IMX355 अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. OPPO Find N2 Flip मध्ये 4300mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. सिक्योरिटीसाठी या फ्लिप फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. हे देखील वाचा: TVF Pitchers Season 2: 7 वर्षानंतर परत येतेय जबरदस्त वेब सीरिज; पुन्हा एकदा ऐकू येणार “तू बियर है **”

OPPO Find N2 चे स्पेसिफिकेशन

OPPO Find N2 फोनमध्ये एक 7.1 इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1920 x 1792 पिक्सल असू शकते. तसेच फोनमध्ये 5.54-इंचाचा सेकंडरी डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट असलेला E6 AMOLED पॅनल असू शकतो. हा फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसरसह बाजारात दाखल होऊ शकतो. यात 4,520mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here