Laptop - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 07 Oct 2024 14:47:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Indian Festival: 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-deals-on-laptops-under-rs-50000/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-deals-on-laptops-under-rs-50000/#respond Mon, 07 Oct 2024 14:47:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=28596 जर तुम्ही डेली टास्कसाठी 50,000 रुपयांच्या रेंज मध्ये विश्वासू लॅपटॉप शोधत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival) मध्ये चांगली डील मिळेल. या सेलमध्ये टॉप ब्रँडच्या लॅपटॉपवर चांगली डील मिळवता येईल. चांगली बाब म्हणजे जर तुम्ही एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून लॅपटॉप खरेदी केला तर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त […]

The post Amazon Great Indian Festival: 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही डेली टास्कसाठी 50,000 रुपयांच्या रेंज मध्ये विश्वासू लॅपटॉप शोधत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival) मध्ये चांगली डील मिळेल. या सेलमध्ये टॉप ब्रँडच्या लॅपटॉपवर चांगली डील मिळवता येईल. चांगली बाब म्हणजे जर तुम्ही एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून लॅपटॉप खरेदी केला तर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ घेता येईल. चला जाणून घेऊया अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी रेंज मध्ये येणाऱ्या बेस्ट लॅपटॉपबाबत.

Acer Aspire Lite (12th Gen Intel Core i5-1235U processor, 16GB RAM

Acer Aspire Lite लॅपटॉप अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. हा लॅपटॉप पावरफुल परफॉर्मन्ससाठी 12व्या पिढीच्या Core i5-1235U प्रोसेसरसह येतो. हा मल्टीटास्टिंग आणि प्रोडक्टिविटीसाठी डिजाइन करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो शार्प व्हिज्युअल्स आणि वायब्रन्ट कलरसह येतो. स्लिक डिजाइनसह यात खूप कम बेजल्स आहेत. लॅपटॉपमध्ये 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि HDMI मिळतात. त्याचबरोबर, ह्यात बॅकलिटची सुविधा देखील आहे.

सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 36,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 15

आसुस विवोबुक 15 (ASUS Vivobook 15) लॅपटॉप देखील 12व्या पिढीच्या इंटेल Core i5-12500H प्रोसेसरसह आला आहे. हा देखील शानदार मल्टीटास्किंग आणि स्मूद कंप्यूटिंग एक्सपीरियंस देतो. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो 16:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येतो. यात तुम्हाला 16GB DDR4 रॅम आणि 512GB NVMe एसएसडी मिळते. याचे वजन फक्त 1.7kg आहे. हा डेली टास्कच्या हिशोबाने परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. यात तुम्हाला बॅकलिट चिकलेट कीबोर्ड आणि 720p HD कॅमेरा आहे. हा प्रायव्हसी शटरसह येतो. तुम्हाला प्री-इंस्टॉलेड विंडोज 11 आणि ऑफिस 2021 मिळतात.

सेलिंग प्राइस: 53,990 रुपये
डील प्राइस: 41,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo IdeaPad Slim 3

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये लेनोवोचा IdeaPad Slim 3 लॅपटॉप देखील स्वस्तात विकत घेता येईल. हा लॅपटॉप 12व्या पिढीच्या इंटेल Core i5-12450H प्रोसेसरसह आला आहे. हा परफॉर्मन्स पोर्टेबिलिटी दरम्यान परफेक्ट बॅलेन्स बनवतो. यात 14-इंच FHD डिस्प्ले अँटी-ग्लेयर टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB SSD च्या सुविधेसह येतो. याचे वजन 1.37kg आहे म्हणजे तुम्ही हा सहज कुठेही नेऊ शकता. अन्य फीचर पाहता, यात 12-तासांची बॅटरी लाइफ, 1080p वेबकॅम, डॉल्बी ऑडियो-एन्हांस्ड स्पिकर्स, प्री-इंस्टॉल्ड विंडोज 11 आणि ऑफिस 2021 मिळतात. हा अ‍ॅलेक्सा इंटीग्रेशन आणि 3 महिन्याच्या Xbox गेम पाससह येतो.

सेलिंग प्राइस: 53,890 रुपये
डील प्राइस: 38,940 (बँक डिस्काउंटसह)

Dell 15 (Intel Core i5-1235U Processor, 8GB DDR4 RAM

डेल 15 (Dell 15) थीन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो स्लिक डिजाइन आणि सॉलिड परफॉर्मन्ससह येतो. हा 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे, जो 4.40 GHz पर्यंतच्या स्पीड देतो. देतो. ह्यात तुम्हाला 8GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो क्रिस्प व्हिज्युअल देतो. हा स्पिल रेजिस्टंट कीबोर्डसह येतो. हा प्री-लोडेड विंडोज 11, एमएस ऑफिस 2021, 15 महिन्याच्या मॅकफी सब्सक्रिप्शनसह येतो. याचे वजन 1.66kg आहे, ज्यामुळे हा डेली टास्कसाठी परफेक्ट ठरतो.

सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 37,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo V15

Lenovo V15 लॅपटॉप 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह येतो. हा विश्वासू परफॉर्मन्स देतो. ह्यात 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडीची सुविधा आहे. लॅपटॉप 15.6-इंच FHD डिस्प्ले, 250 निट्स ब्राइटनेस आणि अँटी-ग्लेयर टेक्नॉलॉजीसह येतो. हा विंडोज 11 वर चालतो आणि ह्यात एमएस ऑफिस होम आणि स्टुडन्ट 2021 प्री-लोडेड आहे. याचे वजन 1.70kg आहे. लॅपटॉप 8.7 तास बॅटरी लाइफ सह येतो. सोबत तुम्हाला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

सेलिंग प्राइस: 48,990 रुपये
डील प्राइस: 38,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP 15s

HP 15s लॅपटॉप पावरफुल 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे. हा स्मूद मल्टीटास्किंग देतो. ह्यात तुम्हाला 16जीबी DDR4 रॅम आणि 512GB एसएसडीची सुविधा मिळते. हा 15.6-इंच FHD अँटी ग्लेयर मायक्रो एज डिस्प्लेसह येतो. लॅपटॉपचे वजन 1.69kg आहे आणि हा बॅकलिट कीबोर्डला सपोर्ट करतो, जो लो-लाइट कंडीशन मध्ये टायपिंग करण्यास मदत करतो. हा 7.5 तास बॅटरी लाइफ आणि HP फास्ट चार्ज सपोर्टसह येतो.

सेलिंग प्राइस: 53,990 रुपये
डील प्राइस: 42,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo Ideapad Gaming 3 Laptop

Lenovo IdeaPad Gaming 3 लॅपटॉप बद्दल बोलायचं तर, हा AMD Ryzen 5 5500H आणि NVIDIA RTX 2050 सह येतो, चांगली गेमिंग परफॉर्मन्स देतो. ह्यात 15.6-इंच FHD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आहे. हा पोर्टेबिलिटीच्या हिशोबाने डिजाइन करण्यात आला आहे. वजन 2.32kg आहे आणि मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी स्टँडर्डसह येतो. ह्यात बॅकलाइटिंग सह ट्रशिया्ट्राइक कीबोर्ड, Nahimic ऑडियो सराउंड साउंड आहेत, जे गेमिंग आणि मल्टीमीडिया एक्सपीरियंस सुधारतात आहेत. तसेच फास्ट चार्जिंगसह Xbox गेम पासचा सपोर्ट आहे.

सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 39,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 15 (Intel Core i5-1235U Processor, 16GB DDR4 RAM)

Dell 15 थीन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे. हा डेली टास्कसाठी शानदार परफॉर्मन्स आणि मल्टीटास्किंग देतो. यात 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे, जो क्लियर व्हिज्युअल देतो. सॉफ्टवेयर पाहता, हा विंडोज 11 वर चालतो आणि प्री-लोडेड एमएस ऑफिस आणि स्टुडन्ट 2021 सह येतो.

सेलिंग प्राइस: 52,990 रुपये
डील प्राइस: 38,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

MSI Thin 15

MSI Thin 15 पावरफुल गेमिंग लॅपटॉप आहे, जो Intel Core i5-12450H प्रोसेसरसह आला आहे. ह्यात 4.4GHz पर्यंतच्या स्पीड आहे. हा 40cm FHD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. लॅपटॉप 16GB ड्युअल-चॅनेल DDR4 रॅम आणि 512GB NVMe एसएसडी सह येतो. चांगल्या गेम प्ले आणि ग्राफिकसाठी 4GB GDDR6 सह एनविडिया GeForce RTX 2050 जीपीयू आहे. हा प्री-इंस्टॉलेड विंडोज 11 होम, वाय-फाय 6E आणि ब्लूटूथ 5.3 सह येतो.

सेलिंग प्राइस: 54,990 रुपये
डील प्राइस: 40,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Acer Aspire Lite (12th Gen Intel Core i7-1255U, 16 GB RAM)

Acer Aspire Lite स्लिक डिजाइन असलेला लॅपटॉप आहे, जो चांगल्या परफॉर्मन्ससाठी 12व्या पिढीच्या Intel Core i7-1255U प्रोसेसरसह येतो. हा 4.7GHz पर्यंतच्या स्पीड देतो. लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD डिस्प्ले आहे, जो शार्प इमेज आणि व्हायब्रन्ट कलरसह येतो. ह्यात 16GB ड्युअल चॅनेल DDR4 रॅम आणि 512 GB NVMe एसएसडी आहे. याचे वजन फक्त 1.59kg आहे, ज्यामुळे हा कुठेही नेता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी टाइप सी पोर्ट, 2 यूएसबी 2.0 पोर्ट, USB 3.2 पोर्ट आहे.

सेलिंग प्राइस: 54,980 रुपये
डील प्राइस: 41,390 (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Great Indian Festival: 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-deals-on-laptops-under-rs-50000/feed/ 0
लॅपटॉपवर Screenshot कसा काढायचा, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-take-screenshots-on-a-laptop-simple-step-windows-macos/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-take-screenshots-on-a-laptop-simple-step-windows-macos/#respond Wed, 21 Jun 2023 12:22:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21690 बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मोबाइलवर स्क्रीनशॉट कॅप्चर केला असेल जे खूप सोपं काम आहे. परंतु स्क्रीनशॉट जेव्हा लॅपटॉपवर कॅप्चर कसा करायचा हे अनेकांना माहित नसतं. त्यामुळे Windows/macOS लॅपटॉप वापरणारे लोक कॅमेरा किंवा मोबाइल शोधू लागतात, ज्यात फोटो क्लियर न आल्यामुळे त्यांचं काम देखील होत नाही. त्यामुळे कोणत्याही Laptop (How to take screenshots on a laptop) वर […]

The post लॅपटॉपवर Screenshot कसा काढायचा, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मोबाइलवर स्क्रीनशॉट कॅप्चर केला असेल जे खूप सोपं काम आहे. परंतु स्क्रीनशॉट जेव्हा लॅपटॉपवर कॅप्चर कसा करायचा हे अनेकांना माहित नसतं. त्यामुळे Windows/macOS लॅपटॉप वापरणारे लोक कॅमेरा किंवा मोबाइल शोधू लागतात, ज्यात फोटो क्लियर न आल्यामुळे त्यांचं काम देखील होत नाही. त्यामुळे कोणत्याही Laptop (How to take screenshots on a laptop) वर स्क्रीनशॉट कसा काढायचा हे माहित असणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत.

लक्षात असू दे पीसी वर स्क्रीनशॉट घेण्याच्या स्टेप सॉफ्टवेयर नुसार वेगवेगळ्या असतात. विंडोज आणि मॅक ओएस लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि कमांड आहेत आणि जर त्या माहित नसतील तर संशय येऊ शकते. पुढे आम्ही विंडोज 10 / विंडोज 7 लॅपटॉप किंवा पीसी आणि macintosh वर स्क्रीनशॉट घेण्याची माहिती दिली आहे.

विंडोज 10 लॅपटॉप / पीसीवर स्क्रीनशॉट कसा काढायचा

विंडोज 10-पावर्ड लॅपटॉप / पीसीवर स्क्रीनशॉट घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. विंडोज 7 लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत सारखीच आहे. चला जाणून घेऊया.

1. अ‍ॅपच्या मदतीनं Windows 7/ 10 लॅपटॉपवर स्क्रीनशॉट

Windows 10 आणि Windows 7 दोन्हीवर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी एक डेडिकेटिड अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याला ‘Snipping Tool’ म्हणतात. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं घेतलेले स्क्रीनशॉट तुमच्या फाइल्समध्ये इमेज स्वरूपात सेव्ह होतात.

  • सर्वप्रथम तुम्हाला स्टार्ट मेन्यू वर जाऊन Snipping Tool सर्च करा.
  • अ‍ॅप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ‘New’, ‘Mode’, ‘Delay’, ‘Cancel’, आणि ‘Options’ ऑप्शन दिसतील.
  • अ‍ॅपमधील New बटनच्या मदतीनं कधीही स्क्रीनशॉट कॅप्चर करता येतो.
  • तर ‘Mode’ ऑप्शनमध्ये तुम्ही सोयीनुसार क्रॉप करून स्क्रीनशॉट घेऊ शकता.
  • तसेच ‘Cancel’ बटनच्या मदतीनं तुम्ही स्क्रीनशॉट प्रोसेस थांबवू शकता. ‘Delay’ ऑप्शनच्या मदतीनं तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी टाइमर सेट करू शकता.

2. Windows लॅपटॉपवर प्रिंट स्क्रीनच्या मदतीनं स्क्रीनशॉट घ्या

अ‍ॅप व्यतिरिक्त Windows लॅपटॉपमध्ये ‘PrtScn’ key च्या मदतीनं देखील स्क्रीनशॉट घेता येतो. ह्या ऑप्शन द्वारे दोन्ही Windows 10/ 7-पावर्ड लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेता येतो.

  • बऱ्याचदा PrtScn key कीबोर्डच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असतं.
  • हे बटन प्रेस केल्यावर संपूर्ण स्क्रीन screenshot कॅप्चर होतो, जो तुम्ही Paint, Microsoft Word आणि इतर प्रोग्राममध्ये डिस्प्ले इमेज म्हणून पेस्ट करू शकता.
  • काही लॅपटॉपवर, ह्या बटनला फंक्शन key ची मदत घ्यावी लागते, ज्याला ‘Fn’ म्हणतात. अशा कंप्युटर्सवर स्क्रीनशॉट घेण्यासाठी Fn + PrtScn दाबा.

3. Alt+PrtScnच्या मदतीनं अ‍ॅक्टिव्ह window वर स्क्रीनशॉट कॅप्चर करा

  • हा ऑप्शन फक्त अ‍ॅक्टिव्ह विंडोसाठी आहे. ह्यात ती स्क्रीन कॉपी केली जाते जी ओपन आहे. ह्यात स्क्रिनशॉट क्लिपबोर्डवर कॉपी करून इतर प्रोग्राममध्ये पेस्ट करता येतो.
  • Windows 7 आणि Windows 10 लॅपटॉप युजर्सना स्क्रीनशॉट घेण्यासाठी PrtScn बटन ‘Alt’ key सह वापरावा लागतो.

4. एक पोर्शन कॅप्चर करण्यासाठी Windows key+Shift+S

  • जर तुम्हाला संपूर्ण स्क्रीनवरील एखादा विशिष्ट भाग कॅप्चर करायचा असेल तर तुम्हाला Windows + Shift+S एकत्र प्रेस करावे लागतील.
  • असे केल्यास तुम्ही माउस पॉईंटच्या मदतीनं पोर्शन निवडून स्क्रीनशॉट घेऊ शकता.
  • त्यानंतर स्क्रीनशॉट क्लिपबोर्डवर कॉपी होईल आणि तुम्ही कोणत्याहही प्रोग्रामवर तो पेस्ट करू शकता.

5. Windows key+PrtScn च्या मदतीनं थेट सेव्ह करा स्क्रीनशॉट

  • जर तुम्हाला क्लिपबोर्डवरून स्क्रीनशॉट कॉपी करायचा असेल तर Windows key+PrtScn शॉर्टकट कमांड वापरा, ज्यामुळे स्क्रीनशॉट इमेज फाईल म्हणून सेव्ह होईल.
  • अशाप्रकारे घेतलेला स्क्रिनशॉट “Pictures” फोल्डरच्या सब फोल्डर “Screenshots” मध्ये सेव्ह होईल.

6. Windows key+G द्वारे स्क्रीनशॉट

  • हा ऑप्शन गेमर्ससाठी आहे ज्यांना Windows laptop वर स्क्रीनशॉट काढायचा आहे.
  • गेम खेळताना Windows आणि G एकत्र प्रेस केल्यावर अनेक ऑप्शन येतील, ज्यामुळे सिलेक्टेड पोर्शन आणि फुल स्क्रीन कॅप्चर करता येईल.
  • त्यामुळे स्क्रीनशॉट थेट “Videos” फोल्डरच्या सबफोल्डर ‘Captures’ मध्ये सेव्ह होईल.

macOS laptops/ PCs वर कैसे लें स्क्रीनशॉट

macOS मध्ये देखील अनेक ऑप्शन आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज स्क्रीनशॉट घेऊ शकता, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

1. Command+Shift+3

macOS laptops/ PCs मध्ये Command+Shift+3 एकत्र प्रेस करा त्यामुळे सहज स्क्रिनशॉट घेता येईल. अशाप्रकारे संपूर्ण स्क्रीन कॅप्चर करता येईल.

2. Command+Shift+4

  • जर तुम्हाला स्क्रीनवरील खास भागाचा स्क्रीनशॉट हवा असेल तर cmd + shift + 4 चा वापर करता येईल.
  • सर्वप्रथम cmd+ shift+ 4 एकत्र प्रेस करा.
  • त्यानंतर क्लिक करून कर्सर ड्रॅग करा, जेणेकरून तुम्हाला हव्या असलेल्या भागाची निवड करता येईल.
  • स्क्रीनशॉट आपोआप डेस्कटॉपवर सेव्ह होईल.

3. Command+Shift+5

  • हा ऑप्शन तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी फ्रीहॅन्ड देतो.
  • ही कमांड दिल्यास तुमच्या समोर खालच्या बाजूला अनेक ऑप्शन येतात, ज्यामुळे सिलेक्टेड पोर्शन पासून संपूर्ण स्क्रीन कॅप्चर करता येईल.

4. Command+Shift+6

हा ऑप्शन फक्त टच बारसह येणाऱ्या MacBook व्हर्जनसाठी आहे.

The post लॅपटॉपवर Screenshot कसा काढायचा, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-take-screenshots-on-a-laptop-simple-step-windows-macos/feed/ 0
डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/#respond Wed, 28 Sep 2022 11:40:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13540 Flipkart Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Sale) सुरु आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहक देखील या वस्तूंवर तुटून पडले आहेत. परंतु तुम्हाला देखील डिस्काउंटनं आकर्षित केलं असेल तर कोणतीही खरेदी करण्याआधी ही बातमी (Online Shopping Fraud) नक्की वाचा. या Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी […]

The post डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Flipkart Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Sale) सुरु आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहक देखील या वस्तूंवर तुटून पडले आहेत. परंतु तुम्हाला देखील डिस्काउंटनं आकर्षित केलं असेल तर कोणतीही खरेदी करण्याआधी ही बातमी (Online Shopping Fraud) नक्की वाचा. या Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी शर्मा याने ऑफर पाहून वडिलांसाठी 50 हजारांचा लॅपटॉप ऑर्डर केला. परंतु फ्लिपकार्टनं लॅपटॉपच्या बॉक्समध्ये घडी डिटर्जंट साबणाच्या वड्या पाठवल्यामुळे ग्राहकाचे डोळे उघडले.

फ्लिपकार्टला चूक मान्य नाही

लॅपटॉप ऐवजी साबण मिळाल्यानंतर यशस्वी शर्मानं लिंक्डइन सोबतच ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली आहे की लॅपटॉपच्या जागी घडी डिटर्जंट पॅक पाठवल्यावर देखील फ्लिपकार्टच्या कस्टमर सपोर्ट आपली चूक मान्य करत नाही आणि उलटे आरोप करत आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज

तसेच त्याने सांगितलं की त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. परंतु, कस्टमर सपोर्टच्या मते खरेदीदाराला डिलिव्हरी एजंटच्या समोर पॅकेज उघडावं लागतं आणि आयटम टेस्ट केल्यानंतरच ओटीपी द्यावा लागतो. शर्मानं म्हटलं आहे की त्याच्या वडिलांना वाटलं की पॅकेज घेतल्यानंतर ओटीपी द्यायचा असतो, असं बऱ्याच प्रीपेड डिलिव्हरीच्या बाबतीत होतं.

रिटर्न होणार नाही प्रोडक्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लिपकार्टच्या सर्वात वरिष्ठ ग्राहक सहायता कर्मचाऱ्याने म्हटलं आहे की या प्रोडक्टचं रिटर्न शक्य नाही. त्याचबरोबर असं सांगण्यात आलं आहे की हे प्रकरण पुढे नेता येणार नाही. दुसरीकडे यशस्वीचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांची चूक म्हणजे की त्यांना वाटलं की – फ्लिपकार्ट अश्योर्डवरून येणाऱ्या पॅकेजमध्ये एक लॅपटॉप असेल डिटर्जंट नव्हे. ओटीपी मागण्याआधी डिलिव्हरी बॉयनं माझ्या वडिलांना ओपन बॉक्स कॉन्सेप्टची माहिती दिली नाही.

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ओपन बॉक्स कॉन्सेप्टमध्ये डिलिव्हरी बॉय समोरच ग्राहक बॉक्स ओपन करू शकतात. बॉक्समध्ये तुम्ही मागवलेलं प्रोडक्ट नसेल किंवा ते सुस्थितीत नसेल तर डिलिव्हरी बॉय ते प्रोडक्ट पुन्हा रिटर्न करतो. फक्त हे सर्व तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी डिलिव्हरी बॉयला देण्याआधी करणं आवश्यक आहे. ओटीपी दिल्यानंतर बॉक्स ओपन केल्यास डिलिव्हरी पूर्ण होईल आणि प्रोडक्ट त्याक्षणी रिटर्न जाणार नाही. हे देखील वाचा: भन्नाट! दोन-दोन सेल्फी कॅमेरे आणि 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 लाँच; फ्रंटला देखील मिळतोय फ्लॅश

iPhone 13 च्या ऑर्डर झाल्या रद्द

गेले काही दिवस जबरदस्त डिस्काउंटसह Flipkart वर iPhone 13 ची विक्रीची सुरु होती, हा आयफोन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांची देखील फसवणूक झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की Flipkart नं त्यांच्या Apple iPhone 13 ची ऑर्डर कॅन्सल केली आहे. युजर्सनी ट्विटरवर ऑर्डर कॅन्सलेशनचे स्क्रीनशॉट्स देखील शेयर केले होते. तसेच अशा युजर्सना फ्लिपकार्ट 10 हजार रुपयांचे व्हाउचर देत असल्याची बातमी देखील आली होती.

The post डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/feed/ 0