Low Budget Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/#respond Thu, 18 May 2023 13:15:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21000 स्मार्टफोन बाजारात सध्या खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आपल्याला हवे तसे हँडसेट निवडताना गोंधळायला होते. त्यातल्या त्यात एंट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये तर स्मार्टफोन मॉडेल्सचा खच पडलेला आहे. ह्यातून योग्य स्मार्टफोन निवडणं कठीण काम आहे. परंतु तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही आज अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे 8000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स […]

The post 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात सध्या खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आपल्याला हवे तसे हँडसेट निवडताना गोंधळायला होते. त्यातल्या त्यात एंट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये तर स्मार्टफोन मॉडेल्सचा खच पडलेला आहे. ह्यातून योग्य स्मार्टफोन निवडणं कठीण काम आहे. परंतु तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही आज अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे 8000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स देतात. या यादीत प्रत्येक ब्रँडचा एक स्मार्टफोन निवडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच हे हँडसेट गेल्या तीन महिन्यात बाजारात लाँच झाले आहेत. चला पाहूया यादी.

8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स

  1. Infinix Smart 7
  2. Tecno Spark Go 2023
  3. Moto E13 4GB RAM
  4. Samsung Galaxy M04
  5. Lava Yuva 2 Pro
  6. Itel P40 4GB RAM
  7. Nokia C12 Pro
  8. POCO C51

Infinix Smart 7

  • आकार : 6.6 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A
  • किंमत : 7,299 रुपये

ह्या फोनमध्ये कंपनीनं ऑक्टा कोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेटचा वापर केला आहे. जोडीला 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो जो एक IPS LCD पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आहे. कंपनीनं फ्रंटला 5 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यातील 6000 mAh ची मोठी बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टच्या मदतीनं चार्ज करता येते.

Tecno Spark Go 2023

  • आकार : 6.56 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio A22
  • किंमत : 7,999 रुपये

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोनला क्वॉड कोर प्रोसेसरसह MediaTek Helio A22 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये 4 GB RAM सह 64GB Storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.56 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ह्यात 13 MP + 0.08 MP चा ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. कंपनीनं 5000 mAh ची मोठी बॅटरी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे.

Moto E13

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : Unisoc T606
  • किंमत : 7,925 रुपये

हा फोन Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे. फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 13 MP चा मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह येतो. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये टाइप सी चार्जिंग पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M04

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio P35
  • किंमत : 7,977 रुपये

सॅमसंगचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीनं 4 GB RAM ची ताकद ह्यात दिली आहे, जोडीला 64GB Storage देखील मिळते. ह्यातील 6.5 इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या मागे 13 MP + 2 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 5000 mAh ची बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टनं चार्ज करता येते.

Lava Yuva 2 Pro

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G37
  • किंमत : 7,999 रुपये

लावा युवा 2 प्रो मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G37 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 4 GB RAM आणि 64GB Storage मिळते. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा, 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आणि 0.3 MP चा तिसरा सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी यूएसबी टाइप सी पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Itel P40

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A
  • किंमत : 7,899 रुपये

6000 mAh च्या बॅटरीसह येणारा हा ह्या यादीतील दुसरा स्मार्टफोन आहे. चार्जिंगसाठी ह्यात टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 5 MP चा कॅमेरा आहे.

Nokia C12 Pro

  • आकार : 6.3 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A1
  • किंमत : 7,499 रुपये

Unisoc SC9863A1 प्रोसेसरसह येणारा हा फोन 3 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्यात 6.3 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन एचडी+ आहे. फोनमध्ये 8 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सोबत 4000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

POCO C51

  • आकार : 6.52 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G36
  • किंमत : 7,249 रुपये

5000 mAh ची बॅटरी असलेला हा पोको फोन बजेट सेगमेंटमध्ये आला आहे. कंपनीनं यात MediaTek Helio G36 चिपसेटची पावर दिली आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. फोनच्या मागे 8 MP + 0.08 MP चा कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर मिळतो.

The post 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/feed/ 0
लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा https://www.91mobiles.com/marathi/vivo-low-budget-phone-in-india-price-under-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-low-budget-phone-in-india-price-under-rs-10000/#respond Fri, 30 Apr 2021 12:31:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10776 वीवोचे नाव त्या टेक ब्रँड्समध्ये येते ज्यांची लो बजेटमध्ये पण चांगली पकड आहे.

The post लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन 5जी फोन Vivo V21 5G लॉन्च केला आहे ज्याची बेस किंमत 29,990 रुपये आहे. या फोनच्या माध्यमातून त्या मोबाईल युजर्सना टारगेट केले गेले आहे ज्यांना प्रीमियम क्वॉलिटी हायएन्ड डिवायस बाळगायला आवडते. तर दुसरीकडे काही वीवो फॅन असे पण आहेत, जे कधी Vivo एखादा कमी किंमत असलेला लो बजेट डिवायस म्हणजे स्वस्त स्मार्टफोन मार्केटमध्ये आणेल याची वाट बघत आहेत. लो बजेटमध्ये वीवो अनेक दिवसांपासून शांत आहे. एक तिमाही निघून गेली आहे आणि भारतात स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारात Vivo ची वाटचाल थांबली आहे. हि गोष्ट खटकण्यामागे कारण असे आहे कि Vivo अशी कंपनी होती, जिने 2021 च्या सुरुवातीला फक्त 10 दिवसांत 4 नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. (Vivo low budget phone in India price under Rs 10000)

Vivo भारतात वेगाने प्रगती करत आहे आणि या कंपनीची फॅन फॉलोइंग पण सतत वाढत आहे. आकर्षक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले वीवो फोन अनेकांना आवडतात. तसेच प्रत्येक बजेटमध्ये वीवो फोन्सचे अस्तित्व पण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना बांधून ठेवते. परंतु गेल्या एक क्वॉटरपासून वीवो कंपनी लो बजेटमध्ये शांत आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला आहे आणि वीवोने कोणताही लो बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला नाही. म्हणजे गेल्या तीन महिन्यांमध्ये वीवोने कोणताही असा फोन लॉन्च केला नाही ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

vivo चा रिटेल स्टोर

वीवोचे नाव त्या टेक ब्रँड्समध्ये येते ज्यांची लो बजेटमध्ये पण चांगली पकड आहे. फक्त जानेवारी महिन्यात वीवोचे 5 नवीन मोबाईल फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. यात Vivo Y20A, Vivo Y12s, Vivo Y20G, Vivo Y51A आणि Vivo Y31 चा समावेश होता. वीवो वाय12एस कंपनीद्वारे लॉन्च केला गेलेला वर्षाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 9,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन 12 जानेवारीला लॉन्च झाला होता आणि साल 2021 मध्ये याव्यतिरिक्त कोणताही दुसरा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला नाही.

किती स्वस्त Vivo फोन

10,000 ते 13,000 रुपयांच्या बजेटमध्ये पण वीवोने यावर्षी दोनच फोन सादर केले आहेत ज्यात 11,490 रुपये किंमत असलेला Vivo Y20A स्मार्टफोन आणि 12,990 रुपये प्राइसवर सादर झालेल्या Vivo Y20G चा समावेश आहे. यामुळे स्पष्ट झाले आहे कि वीवो वाय20ए चा भारतात पाहील सेल जरी 2 जानेवारीला सुरु झाला असला तरी कंपनीने हा गेल्यावर्षी म्हणजे 31 डिसेंबर 2020 ऑफिशियल केला होता. नवीन वर्षाची सुरुवात Vivo ने खूप उत्साहाने केली होती पण आता हि कंपनी काहीशी थंड पडल्यासारखी वाटत आहे आणि लो बजेट वीवो फोनची प्रतीक्षा वाढत आहे.

Vivo V21 5G

लेटेस्ट वी21 5जी फोन पाहता या फोनमध्ये 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनमध्ये सॅमसंगचा E3 इमिसिव डिस्प्ले देण्यात आला आहे. Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. वीवोने हा स्मार्टफोन 11GB पर्यंतच्या रॅमसह सादर केला आहे, ज्यात 8GB ऑरिजन RAM आणि 3GB एक्सटेंड RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जसह सादर केला गेला आहे. वीवोचा हा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो.

Vivo V21 5G चा फोटो

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V21 5G स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP OIS आहे, सोबत 8MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 44 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन) आणि डुअल LED फ्रंट फ्लॅशसह येतो. म्हणजे या स्मार्टफोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरा सेंसरमध्ये OIS सपोर्ट मिळतो.

The post लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-low-budget-phone-in-india-price-under-rs-10000/feed/ 0
8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन https://www.91mobiles.com/marathi/10-best-smartphone-under-rs-8000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/10-best-smartphone-under-rs-8000-in-india/#respond Fri, 18 Dec 2020 15:42:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9375 भारतात अश्या लोकांची संख्या जास्त आहे ज्यांना लो बजेट मध्ये स्मार्टफोन घ्यायला आवडते. युजर्सची गरज पाहता जवळपास प्रत्येक मोबाईल ब्रँड या सेग्मेंट मध्ये आपले स्मार्टफोन्स घेऊन येतो. आमच्या अश्याच वाचकांसाठी आज आम्ही यावर्षी लाॅन्च झालेल्या अश्या 10 स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे जे 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात.

The post 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये लो बजेट पासून हायएन्ड फ्लॅगशिप सेग्मेंट पर्यंत सर्व किंमतीतले स्मार्टफोन लाॅन्च होतात. मोबाईल ग्राहक आपल्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार स्मार्टफोन्स घेतात. प्रत्येक प्राइस सेग्मेंट मध्ये स्मार्टफोन असूनही भारतात अश्या लोकांची संख्या जास्त आहे ज्यांना लो बजेट मध्ये स्मार्टफोन घ्यायला आवडते. युजर्सची गरज पाहता जवळपास प्रत्येक मोबाईल ब्रँड या सेग्मेंट मध्ये आपले स्मार्टफोन्स घेऊन येतो. आमच्या अश्याच वाचकांसाठी आज आम्ही यावर्षी लाॅन्च झालेल्या अश्या 10 स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे जे 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. या यादीत Samsung, Xiaomi, OPPO, VIVO, Realme आणि Micromax, InfinixTecno सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे, जे ग्राहक आपल्या आवडीनुसार निवडू शकतात.

Micromax In 1b

या लिस्ट मध्ये इंडियन कंपनी माइक्रोमॅक्स पण आहे, जिने अनेक दिवसानंतर स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीने Micromax In 1b नावाने आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. तसेच माइक्रोमॅक्स इन 1बी च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे.

Micromax IN 1b स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

Samsung Galaxy M01

सॅमसंग गॅलेक्सी एम01 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 आधारित वनयुआय सह या फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करता. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. तसेच सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

Xiaomi Redmi 9A

‘रेडमी 9’ सीरीज मध्ये 2 सप्टेंबरला लॉन्च झाला Xiaomi Redmi 9A बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,799 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी रेडमी 9ए 20:9 आस्पेक्ट रेशियो 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 9A अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 सह मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रियल डुअल सिम व 4जी वोएलटीईला सपोर्ट सोबतच सिक्योरिटीसाठी फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच ची बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Smart 4 Plus

इनफिनिक्स ब्रँडने जुलै मध्ये आपला मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस लॉन्च केला होता जो 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीसह येतो. हा फोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि फक्त 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे Infinix Smart 4 Plus फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए25 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी Infinix Smart 4 Plus च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C12

गेल्या महिन्यात लॉन्च झाला रियलमी सी12 पण 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरी सह येतो जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन रिवर्स चार्जिंग फीचर सह येतो. बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज सह आला आहे ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

रियलमी सी12 अँड्रॉइड 10 आधारित रियलमी युआय सह मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO C3

पोको सी3 दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 7,499 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा Arctic Blue, Lime Green आणि Matte Black कलर मध्ये विकत घेता येईल.

हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट करतो जो पी2आय कोटेड आहे. अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 सह हा फोन मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर 13एमपी प्राइमरी + 2एमपी मॅक्रो + 2एमपी डेफ्थ सेंसर तसेच फ्रंट पॅनल वर 5 एमपी सेल्फी सेंसर आहे. POCO C3 डुअल सिम, 4जी वोएलटीई, 3.5एमएम जॅक सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : POCO M3 : लॉन्चच्या आधी जाणून घ्या सर्वकाही, 6000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम तसेच 48एमपी कॅमेरा आणि किंमत

OPPO A1k

ओपो ए1के 7,490 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे जो 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर बनला आहे. OPPO A1k अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 9 पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A1k च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी OPPO A1k कंपनीने 4,000एमएएचच्या दमदार बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. हा ओपो स्मार्टफोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

Tecno Spark 6 Air

टेक्नोचा हा फोन भारतीय बाजारात 3 वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि हा 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो फक्त 8,699 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 7 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 आधारित हाईओएस 6.2 सह या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो ए25 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 13एमपी प्राइमरी सेंसर + 2एमपी डेप्थ सेंसर + एआय लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8एमपी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर सोबतच पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 6 एयर मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y1s

हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची किंमत 7,990 रुपये आहे तसेच 4,550 रुपयांचे जियो बेनिफिट पण मिळतात. वीवो वाय1एस 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 आधारित फनटच ओएस 10.5 सह या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y1s डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,030एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

Realme C11

रियलमी सी11 स्मार्टफोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. रियलमी सी11 अँड्रॉइड 10 आधारित रियलमी युआय वर चालतो तसेच प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे तसेच सेल्फीसाठी रियलमी सी11 मध्ये एफ/2.4 अपचर्रर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Realme C11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात हा फोन Rich Green आणि Rich Gray कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-best-smartphone-under-rs-8000-in-india/feed/ 0