लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा

विवो फोनचा फोटो

टेक कंपनी वीवोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन 5जी फोन Vivo V21 5G लॉन्च केला आहे ज्याची बेस किंमत 29,990 रुपये आहे. या फोनच्या माध्यमातून त्या मोबाईल युजर्सना टारगेट केले गेले आहे ज्यांना प्रीमियम क्वॉलिटी हायएन्ड डिवायस बाळगायला आवडते. तर दुसरीकडे काही वीवो फॅन असे पण आहेत, जे कधी Vivo एखादा कमी किंमत असलेला लो बजेट डिवायस म्हणजे स्वस्त स्मार्टफोन मार्केटमध्ये आणेल याची वाट बघत आहेत. लो बजेटमध्ये वीवो अनेक दिवसांपासून शांत आहे. एक तिमाही निघून गेली आहे आणि भारतात स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारात Vivo ची वाटचाल थांबली आहे. हि गोष्ट खटकण्यामागे कारण असे आहे कि Vivo अशी कंपनी होती, जिने 2021 च्या सुरुवातीला फक्त 10 दिवसांत 4 नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. (Vivo low budget phone in India price under Rs 10000)

Vivo भारतात वेगाने प्रगती करत आहे आणि या कंपनीची फॅन फॉलोइंग पण सतत वाढत आहे. आकर्षक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले वीवो फोन अनेकांना आवडतात. तसेच प्रत्येक बजेटमध्ये वीवो फोन्सचे अस्तित्व पण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना बांधून ठेवते. परंतु गेल्या एक क्वॉटरपासून वीवो कंपनी लो बजेटमध्ये शांत आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला आहे आणि वीवोने कोणताही लो बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला नाही. म्हणजे गेल्या तीन महिन्यांमध्ये वीवोने कोणताही असा फोन लॉन्च केला नाही ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

vivo चा रिटेल स्टोर

वीवोचे नाव त्या टेक ब्रँड्समध्ये येते ज्यांची लो बजेटमध्ये पण चांगली पकड आहे. फक्त जानेवारी महिन्यात वीवोचे 5 नवीन मोबाईल फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. यात Vivo Y20A, Vivo Y12s, Vivo Y20G, Vivo Y51A आणि Vivo Y31 चा समावेश होता. वीवो वाय12एस कंपनीद्वारे लॉन्च केला गेलेला वर्षाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 9,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन 12 जानेवारीला लॉन्च झाला होता आणि साल 2021 मध्ये याव्यतिरिक्त कोणताही दुसरा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला नाही.

किती स्वस्त Vivo फोन

10,000 ते 13,000 रुपयांच्या बजेटमध्ये पण वीवोने यावर्षी दोनच फोन सादर केले आहेत ज्यात 11,490 रुपये किंमत असलेला Vivo Y20A स्मार्टफोन आणि 12,990 रुपये प्राइसवर सादर झालेल्या Vivo Y20G चा समावेश आहे. यामुळे स्पष्ट झाले आहे कि वीवो वाय20ए चा भारतात पाहील सेल जरी 2 जानेवारीला सुरु झाला असला तरी कंपनीने हा गेल्यावर्षी म्हणजे 31 डिसेंबर 2020 ऑफिशियल केला होता. नवीन वर्षाची सुरुवात Vivo ने खूप उत्साहाने केली होती पण आता हि कंपनी काहीशी थंड पडल्यासारखी वाटत आहे आणि लो बजेट वीवो फोनची प्रतीक्षा वाढत आहे.

Vivo V21 5G

लेटेस्ट वी21 5जी फोन पाहता या फोनमध्ये 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनमध्ये सॅमसंगचा E3 इमिसिव डिस्प्ले देण्यात आला आहे. Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. वीवोने हा स्मार्टफोन 11GB पर्यंतच्या रॅमसह सादर केला आहे, ज्यात 8GB ऑरिजन RAM आणि 3GB एक्सटेंड RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जसह सादर केला गेला आहे. वीवोचा हा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो.

Vivo V21 5G चा फोटो

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V21 5G स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP OIS आहे, सोबत 8MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 44 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन) आणि डुअल LED फ्रंट फ्लॅशसह येतो. म्हणजे या स्मार्टफोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरा सेंसरमध्ये OIS सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here