8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी

स्मार्टफोन बाजारात सध्या खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आपल्याला हवे तसे हँडसेट निवडताना गोंधळायला होते. त्यातल्या त्यात एंट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये तर स्मार्टफोन मॉडेल्सचा खच पडलेला आहे. ह्यातून योग्य स्मार्टफोन निवडणं कठीण काम आहे. परंतु तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही आज अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे 8000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स देतात. या यादीत प्रत्येक ब्रँडचा एक स्मार्टफोन निवडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच हे हँडसेट गेल्या तीन महिन्यात बाजारात लाँच झाले आहेत. चला पाहूया यादी.

8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स

 1. Infinix Smart 7
 2. Tecno Spark Go 2023
 3. Moto E13 4GB RAM
 4. Samsung Galaxy M04
 5. Lava Yuva 2 Pro
 6. Itel P40 4GB RAM
 7. Nokia C12 Pro
 8. POCO C51

Infinix Smart 7

 • आकार : 6.6 इंच
 • प्रोसेसर : Unisoc SC9863A
 • किंमत : 7,299 रुपये

ह्या फोनमध्ये कंपनीनं ऑक्टा कोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेटचा वापर केला आहे. जोडीला 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो जो एक IPS LCD पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आहे. कंपनीनं फ्रंटला 5 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यातील 6000 mAh ची मोठी बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टच्या मदतीनं चार्ज करता येते.

Tecno Spark Go 2023

 • आकार : 6.56 इंच
 • प्रोसेसर : MediaTek Helio A22
 • किंमत : 7,999 रुपये

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोनला क्वॉड कोर प्रोसेसरसह MediaTek Helio A22 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये 4 GB RAM सह 64GB Storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.56 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ह्यात 13 MP + 0.08 MP चा ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. कंपनीनं 5000 mAh ची मोठी बॅटरी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे.

Moto E13

 • आकार : 6.5 इंच
 • प्रोसेसर : Unisoc T606
 • किंमत : 7,925 रुपये

हा फोन Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे. फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 13 MP चा मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह येतो. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये टाइप सी चार्जिंग पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M04

 • आकार : 6.5 इंच
 • प्रोसेसर : MediaTek Helio P35
 • किंमत : 7,977 रुपये

सॅमसंगचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीनं 4 GB RAM ची ताकद ह्यात दिली आहे, जोडीला 64GB Storage देखील मिळते. ह्यातील 6.5 इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या मागे 13 MP + 2 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 5000 mAh ची बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टनं चार्ज करता येते.

Lava Yuva 2 Pro

 • आकार : 6.5 इंच
 • प्रोसेसर : MediaTek Helio G37
 • किंमत : 7,999 रुपये

लावा युवा 2 प्रो मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G37 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 4 GB RAM आणि 64GB Storage मिळते. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा, 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आणि 0.3 MP चा तिसरा सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी यूएसबी टाइप सी पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Itel P40

 • आकार : 6.5 इंच
 • प्रोसेसर : Unisoc SC9863A
 • किंमत : 7,899 रुपये

6000 mAh च्या बॅटरीसह येणारा हा ह्या यादीतील दुसरा स्मार्टफोन आहे. चार्जिंगसाठी ह्यात टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 5 MP चा कॅमेरा आहे.

Nokia C12 Pro

 • आकार : 6.3 इंच
 • प्रोसेसर : Unisoc SC9863A1
 • किंमत : 7,499 रुपये

Unisoc SC9863A1 प्रोसेसरसह येणारा हा फोन 3 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्यात 6.3 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन एचडी+ आहे. फोनमध्ये 8 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सोबत 4000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

POCO C51

 • आकार : 6.52 इंच
 • प्रोसेसर : MediaTek Helio G36
 • किंमत : 7,249 रुपये

5000 mAh ची बॅटरी असलेला हा पोको फोन बजेट सेगमेंटमध्ये आला आहे. कंपनीनं यात MediaTek Helio G36 चिपसेटची पावर दिली आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. फोनच्या मागे 8 MP + 0.08 MP चा कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here