Netflix - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Dec 2022 09:12:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Doctor G OTT Release: पोट धरून हसायला लावणारा आयुष्मानचा ‘हा’ हिट चित्रपट आता येतोय ओटीटीवर https://www.91mobiles.com/marathi/doctor-g-ott-release-ayushmann-khurrana-film/ https://www.91mobiles.com/marathi/doctor-g-ott-release-ayushmann-khurrana-film/#respond Mon, 05 Dec 2022 09:12:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15668 आयुष्मान खुरानाचा कॉमेडी चित्रपट ‘डॉक्टर जी’ मोठ्या पडद्यावर दर्शकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही देखील मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहू शकला नसाल तर आता तुम्ही ओटीटीवरून घर बसल्या या धमाल चित्रपटाची मजा घेऊ शकता. ‘डॉक्टर जी’ मध्ये आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंह आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात […]

The post Doctor G OTT Release: पोट धरून हसायला लावणारा आयुष्मानचा ‘हा’ हिट चित्रपट आता येतोय ओटीटीवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आयुष्मान खुरानाचा कॉमेडी चित्रपट ‘डॉक्टर जी’ मोठ्या पडद्यावर दर्शकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही देखील मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहू शकला नसाल तर आता तुम्ही ओटीटीवरून घर बसल्या या धमाल चित्रपटाची मजा घेऊ शकता. ‘डॉक्टर जी’ मध्ये आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंह आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना एका पुरुष स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत आहे.

या ओटीटीवर येतोय Doctor G

आयुष्मान खुरानाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होईल. अशी माहिती Netflix नं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन देण्यात आलं की, ‘डॉक्टरांना ??‍⚕ देखील अशा समस्यांचा सामना करावा लागतो ज्याचे उपाय त्यांच्याकडेही नसतात! डॉक्टर जी 11 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येत आहे!’ म्हणजे हा चित्रपट 11 डिसेंबरपासून स्ट्रीम करता येईल. हे देखील वाचा: एकच नंबर! 9 हजारांच्या आत आला Vivo Y02; शानदार लूकसह 5000mAh ची दमदार बॅटरी

स्त्रीरोगतज्ज्ञ बनला आयुष्मान

तुम्हाला माहित आहे की जवळपास सर्वच चित्रपाटांमध्ये आयुष्मान खुराना एक हटके भूमिका करून चाहत्यांना खुश करतो आणि तेच काम त्याने या चित्रपटात देखील केलं आहे. सामाजिक संदेश देण्यासोबतच हा चित्रपट दर्शकांना हसवतोही. या चित्रपटात Ayushmann Khurrana डॉ. उदय गुप्ता नावाच्या एका मेडिकल स्टूडेंटच्या भूमिकेत आहे ज्याला ऑर्थोपेडिक सर्जन बनायचं आहे. परंतु परिस्थितीमुळे त्याला मनाविरुद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात प्रवेश घ्यावा लागतो.

इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर

महिला एका पुरुष गायनोकॉलजिस्टचा सहज स्वीकार करत नाहीत, म्हणजे त्यांना उदय गुप्ता कडून उपचार करवून घ्यायचे नसतात. तसेच उदय गुप्ताला देखील या क्षेत्रात रस नसल्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. याबाबतीत महिला डॉक्टर्स आणि स्टाफ कशाप्रकारे त्याला मदत करतात याची ही गोष्ट आहे. शेफाली शाह आणि रकुलप्रीत यांनी महिला डॉक्टरांची भूमिका साकारली आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत येतोय Redmi 12C; रियलमी-सॅमसंगची धाकधूक वाढली

फॅन्सना आवडला डॉक्टर जी

‘डॉक्टर जी’ 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये आला होता. फॅन्सना ‘डॉक्टर जी’ मध्ये आयुष्मान खुरानाचा नवा अवतार आवडला होता. चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी आयुष्मान खुराना काहीही करू शकतो, अशी कौतुकाची थाप दिली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट जरी सामाजिक संदेश देत असला तरी दर्शकांना कंटाळा येत नाही तर उलट त्यातून मनोरंजन होते. याआधी आयुष्मान Gay तरुणाच्या भूमिकेत Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटात दिसला होता. तर यंदा आलेल्या “अनेक” नावाच्या चित्रपटातून त्याने एका सिक्रेट एजेंटची भूमिका देखील बजावली होती.

The post Doctor G OTT Release: पोट धरून हसायला लावणारा आयुष्मानचा ‘हा’ हिट चित्रपट आता येतोय ओटीटीवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/doctor-g-ott-release-ayushmann-khurrana-film/feed/ 0
Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/ https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/#respond Thu, 20 Oct 2022 10:43:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14193 Netflix Password: लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix चा पासवर्ड सहज शेयर केला जातो. अकाउंट युजर आपल्या मित्र किंवा कुटुंबियांना आपला पासवर्ड देत असतात. परंतु आता Netflix वर असं केल्यास आता तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. नेटफ्लिक्सनं स्पष्ट केलं आहे की ते 2023 पासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेयर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. यासाठी […]

The post Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Netflix Password: लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix चा पासवर्ड सहज शेयर केला जातो. अकाउंट युजर आपल्या मित्र किंवा कुटुंबियांना आपला पासवर्ड देत असतात. परंतु आता Netflix वर असं केल्यास आता तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. नेटफ्लिक्सनं स्पष्ट केलं आहे की ते 2023 पासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेयर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. यासाठी स्ट्रीमिंग कंपनीला होणारा तोटा कारणीभूत आहे आणि सब्सक्रिप्शन काउंट देखील घसरला आहे. नेटफ्लिक्सनं सांगितलं की पासवर्ड शेयर केल्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये वाढ होत नाही.

आता नेटफ्लिक्सनं प्रोफाईल ट्रांसफर नावाचं नवीन फीचरची (Netflix Profile Transfer Feature) घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीनं ओटीटी प्लॅटफॉर्म पासवर्ड शेयरिंग नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. 2023 पासून हा नवीन नियम जारी केला जाईल आणि त्यानंतर पासवर्ड शेयर करण्यासाठी एक सब-अकाऊंट बनवावं लागेल, ज्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. हे देखील वाचा: Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

नटफ्लिक्सनं माहिती दिली की आम्ही प्रोफाईल ट्रांसफर फिचर लाँच केलं आहे. हे एक असं फीचर असेल जे तुमचं अकाऊंट वापरत आलेल्या लोकांना एक प्रोफाइल ट्रांसफर करण्यास मदत करेल. ही सुविधा 18 ऑक्टोबरपासून जगभरातील सर्व सदस्यांना देण्यात आली आहे.

कंपनीनं अजूनतरी पासवर्ड शेयर केल्यावर किती चार्ज द्यावा लागेल, याची माहिती दिली नाही. परंतु रिपोर्ट्स आणि सूत्रतांच्या माहितीनुसार पासवर्ड शेयरिंगची किंमत $3-$4 (जवळपास 250-330 रुपये) दरम्यान असू शकते. यासाठी भारतात किती पैसे मोजावे लागतील आणि कधी हे फीचर येईल, याची माहिती मात्र मिळाली नाही.

Netflix India plans

नेटफ्लिक्सचा भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन आता फक्त 149 रुपये प्रति माहपासून सुरु होतो. तसेच प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांवरून 649 रुपये प्रति माह करण्यात आला आहे.

असं करा Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल

Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल करण्याच्या दोन पद्धती आहेत:

1. वेबसाइटच्या माध्यमातून बंद करा नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम Netflix वेबसाइट ओपन करा.
  • वेबसाइट ओपन केल्यानंतर तुमच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या मदतीनं साइन-इन करा.
  • साइन-इन केल्यानंतर Cancel streaming plan वर क्लिक करून तुम्ही तुमचं ऑटो सब्सक्रिप्शन बंद करू शकता.

2. नेटफ्लिपक्स अ‍ॅपवरून असं कॅन्सल करा सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम अपने नेटफ्लिक्स अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.
  • त्यानंतर Menu मध्ये खाली अकाऊंटवर टॅप करा.
  • त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि अपडेट बिलिंग डिटेलच्या खाली दिलेल्या कॅन्सल मेंबरशिपवर टॅप करा.
  • त्यानंतर नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅन कॅन्सल करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/feed/ 0
Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series https://www.91mobiles.com/marathi/netflix-upcoming-series-from-tabu-khufiya-to-rana-daggubatis-rana-naidu-these-movies-and-web-series-are-release-soon/ https://www.91mobiles.com/marathi/netflix-upcoming-series-from-tabu-khufiya-to-rana-daggubatis-rana-naidu-these-movies-and-web-series-are-release-soon/#respond Mon, 26 Sep 2022 13:46:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13462 Netflix Upcoming Series and Movies: OTT विश्वातील दिग्गज सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Netflix नं Diwali 2022 पूर्वी आपल्या फॅन्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं ओरिजनल वेब सीरीज आणि चित्रपटांची यादी जारी करून यांचे टीजर देखील रिलीज केले आहेत. म्हणजे नेटफ्लिक्सवर येत्या काळात भरपूर नवीन कंटेंट येणार आहे. ओटीटीवर एक किंवा दोन नव्हे तर अनेक नवीन चित्रपट […]

The post Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Netflix Upcoming Series and Movies: OTT विश्वातील दिग्गज सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Netflix नं Diwali 2022 पूर्वी आपल्या फॅन्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं ओरिजनल वेब सीरीज आणि चित्रपटांची यादी जारी करून यांचे टीजर देखील रिलीज केले आहेत. म्हणजे नेटफ्लिक्सवर येत्या काळात भरपूर नवीन कंटेंट येणार आहे. ओटीटीवर एक किंवा दोन नव्हे तर अनेक नवीन चित्रपट आणि सीरीज (Movies आणि Web Series) ची घोषणा करण्यात आली आहे. Upcoming Movies and Web Series मध्ये दाक्षिणात्य स्टार Dulquer Salmaan, Rana Daggubati आणि Venkatesh सोबतच लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश यांची ड्रीम वेडिंग सारखे अनेक रंजक प्रोजेक्ट्स स्ट्रीम करता येतील. पुढे आम्ही तुम्हाला Netflix Tudum 2022 मधील New Upcoming Movies and Series (Netflix Movies and series 2022) ची माहिती दिली आहे.

Netflix Tudum 2022

  • मोनिका ओ माय डार्लिंग
  • राणा नायडू
  • खुफिया
  • स्कूप
  • कटहल
  • सूप
  • कॅट
  • काला
  • चोर निकल के भागा
  • नयनतारा- बियॉन्ड द फेयरी टेल
  • गन्स अँड गुलाब्स
  • क्लास

मोनिका ओ माय डार्लिंग

Rajkummar Rao याची ओटीटीवर आगामी चित्रपट Monica O My Darling असेल. हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर येत आहे, ज्यात त्याच्यासोबत बॉलीवुड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि राधिका आपटे (Radhika Apte) दिसतील. या चित्रपटचा टीजर देखील रिलीज झाला आहे, जो पुढे बघता येईल.

राणा नायडू

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार्स पहिल्यांदा मोठ्या पदड्यावर एकत्र दिसत आहेत. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सीरीज ‘राणा नायडू’ मध्ये अभिनेता राणा दग्गुबाती आणि त्याचे काका दग्गुबाती वेंकटेश एकमेकांशी भिडताना दिसतील. या सीरीजचा टीजर रिलीज झाला आहे.

खुफिया >

विशाल भारद्वाज यांच्या Khufiya चा देखील Teaser रिलीज झाला आहे. या चित्रपटात तब्बू, अली फजल, वामिका गब्बी आणि आशीष विद्यार्थी दिसतील. टीजरवरून स्पष्ट झालं आहे की ही आगामी मूव्ही सस्पेंस असेल, टीजर पुढे बघता येईल.

स्कूप

नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज स्कूपचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. स्कूप जर्नलिस्ट जिग्ना वोरा यांचं पुस्तक बिहाइंड द बार्स इन बायकला – माय डेज इन प्रिजनवर आधारित आहे. या सीरीजमध्ये करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत आहे.

कटहल

अन्य आगामी चित्रपटांप्रमाणे Kathal चा देखील Teaser Out झाला आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विजय राज आणि राजपाल यादव दिसतील. या नेटफ्लिक्स ऑरिजनल चित्रपटचा टीजर पुढे बघता येईल.

सूप

बॉलीवुडमधील दिग्गज कलाकार मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांचा कॉमेडी क्राइम-ड्रामा चित्रपट सूप येत आहे. डायरेक्टर अभिषेक चौबे यांचा हा चित्रपट लवकरच रिलीज होईल. तसेच नेटफ्लिक्सनं अधिकृतपणे सूपचा धमाकेदार टीजर देखील रिलीज केला आहे. या टीजर तुम्ही पुढे पाहू शकता.

कॅट

माजी नागरिक गुप्तहेरच्या आयुष्यवर आधारित सीरीज कॅटचा टीजर देखील रिलीज करण्यात आला आहे. यात एक सिख व्यक्तीच्या भूमिकेत रणदीप हुड्डा दिसत आहे. ही रिवेंज ड्रामा सीरीज पंजाबमध्ये घडताना दिसत आहे.

काला

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानचा चित्रपट काला देखील Netflix वर रिलीज होणार आहे. या चित्रपटचा टीजर पुढे बघता येईल.

चोर निकल के भागा

Netflix वर Chor Nikal Ke Bhaga लवकरच रिलीज होणार आहे. यात बॉलीवुड सुपरस्टार यामी गौतम (Yami Gautam) आणि सनी कौशल (Sunny Kaushal) एकत्र दिसतील. चोर निकल के भागा चित्रपटाचा टीजर रिलीज केला गेला आहे, ज्यात चित्रपटची गोष्ट सस्पेंस वाटत आहे.

नयनतारा- बियॉन्ड द फेयरी टेल

दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार नयनतारानं अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट निर्माता विग्नेश शिवन यांच्याशी लग्न केलं आहे. आता ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ मधून त्यांचं आयुष्य, लग्न आणि त्यानंतरच आयुष्य दाखवण्यात येईल.

गन्स अँड गुलाब्स

चित्रपट गन्स अँड गुलाब्समध्ये 90 चं दशक दाखवण्यात आलं आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात राजकुमार राव, दुलकर सलमान आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत दिसतील.

क्लास

लोकप्रिय स्पॅनिश सीरीज एलीटचं भारतीय व्हर्जन आहे. यात गुरफतेह पीरजादा, चिंतन रच, आणि चयन चोपडा या कलाकारांची जबरदस्त अ‍ॅक्टिंग दिसेल.

The post Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/netflix-upcoming-series-from-tabu-khufiya-to-rana-daggubatis-rana-naidu-these-movies-and-web-series-are-release-soon/feed/ 0
अश्याप्रकारे करा Netflix वरून चित्रपट डाउनलोड, खूप सोप्पी आहे हि पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-automatically-downlod-netflix-movie-show-smart-download-feature/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-automatically-downlod-netflix-movie-show-smart-download-feature/#respond Thu, 25 Feb 2021 11:51:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10178 नावावरून समजते कि हा फीचर तुमच्या आवडीचे चित्रपट आणि शोज तुमच्यासाठी डाउनलोड करेल. त्यानंतर तुम्ही इंटरनेटविना (ऑफलाइन) व्हिडीओ बघू शकाल.

The post अश्याप्रकारे करा Netflix वरून चित्रपट डाउनलोड, खूप सोप्पी आहे हि पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनने चित्रपटांचे प्रदर्शन थांबले होते, त्यामुळे बॉलीवुडला ओटीटीकडे मोर्चा वळवावा लागला. कोरोना वायरस आणि लॉकडाउनच्या आधी पण ओटीटी म्हणजे over-the-top सर्विसेज वेगाने वाढत होत्या, त्यामुळे कंपन्या पण आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर सादर करता असतात. अलीकडेच भारतातील टॉप व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने आपल्या युजर्ससाठी एक घोषणा केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने गेल्या आठवड्यात स्मार्ट डाउनलोड नावाचा एक शानदार फीचर सादर केला आहे. या स्मार्ट डाउनलोड्स फीचरचे नाव “Downloads for You” ठेवण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या फीचरबद्दल. (how to automatically downlod netflix movie show smart download feature)

Downloads for You फीचर म्हणजे काय

नावावरून समजते कि हा फीचर तुमच्या आवडीचे चित्रपट आणि शोज तुमच्यासाठी डाउनलोड करेल. त्यानंतर तुम्ही इंटरनेटविना (ऑफलाइन) व्हिडीओ बघू शकाल. इतकेच नव्हे तर हे फीचर आपोआप ते शोज को डिलीट करेल जे बघून होतील आणि नवीन एपिसोड किंवा शोज डाउनलोड करेल. तुम्ही हे फीचर बंद पण कर करू शकता. पण या फीचरचा लाभ घेण्यासाठी आधी हा ऍक्टिव्हेट करावा लागेल.

हे देखील वाचा : 7000mAh बॅटरी आणि 4 बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा नवीन फोन Galaxy M62

पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि हा ऑटोमेटिक डाउनलोड फीचर सध्या फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. आयफोन किंवा आईपॅड वापरणाऱ्या युजर्सना यासाठी थोडी वाट बघावी लागेल. नेटफ्लिक्स नुसार 12 टीव्ही शोज आणि चित्रपटांसाठी 3 जीबी स्टोरेज खूप आहे.

Netflix चा ऑटेमेटिक डाउनलोड फीचर कश्याप्रकारे चालू करायचा

-सर्वप्रथम नेटफ्लिक्सचा अँड्रॉइड ऍप ओपन करा

-आता Downloads सेक्शन मध्ये जाऊन त्यावर क्लिक करा

-इथे तुम्हाला Downloads for You ऑप्शन दिसेल, ज्यावर क्लिक करावा लागेल.

-त्यानंतर स्टोरेजबाबत एक प्रश्न येईल, त्यानंतर हा फीचर ऑन होईल.

नोट: हि डाउनलोडिंग तुमच्या फोनच्या स्टोरेज मध्ये न होता नेटफ्लिक्स ऍपच्या स्टोरेज मध्ये होईल.

The post अश्याप्रकारे करा Netflix वरून चित्रपट डाउनलोड, खूप सोप्पी आहे हि पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-automatically-downlod-netflix-movie-show-smart-download-feature/feed/ 0