Redmi 12C आणण्याची तयारी सुरु; सर्टिफिकेशन साईटवर दिसली झलक

चिनी कंपनी शाओमीनं यावर्षीच्या सुरुवातीला एक लो बजेट स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवला होता. 50MP Camera, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 5,000mAh Battery सहा Redmi 10C स्मार्टफोन कंपनीनं सादर केला आहे. हा लो बजेट मोबाइल फोन ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध झाला होता परंतु भारतीय बाजारात आला नाही. परंतु आता Xiaomi रेडमी 10सी चा अपग्रेेडेड आणि अ‍ॅडव्हान्स व्हर्जन Redmi 12C आणण्याची तयारी करत आहे. रेडमी 12सी स्मार्टफोन सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे जिथे फोनची बरीच माहिती मिळाली आहे.

Redmi 12C स्मार्टफोन FCC आणि IMEI database वर लिस्ट झाला आहे. एफसीसीवर हा मोबाइल फोन 2212ARNC4L मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे तर आयएमआय डेटाबेसमधून Redmi 12C नावाचा खुलासा झाला आहे. ही नवीन लिस्टिंग 2 डिसेंबरची आहे ज्यावरून स्पष्ट झालं आहे की शाओमीचा रेडमी ब्रँड लवकरच आपला नवीन स्मार्टफोन रेडमी 12सी लाँच करू शकते. परंतु लाँच डेटसाठी अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. हे देखील वाचा: 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज

Redmi 12C चे लीक फीचर्स

सर्टिफिकेशन्समधून रेडमी 12सी स्मार्टफोनच्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती समोर आली नाही परंतु उपलब्ध माहितीनुसार Redmi 12C एलटीई कनेक्टिव्हिटी असलेला फोन असू शकतो, ज्यामुळे हा 4G फोन असू शकतो हे स्पष्ट झालं आहे. तसेच रेडमी 12सी स्मार्टफोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय असल्याचं देखील लिस्टिंगमधून समोर आलं आहे. सर्टिफिकेशन्सनुसार Redmi 12C स्मार्टफोन MIUI 13 ओएसवर लाँच केला जाऊ शकतो.

Redmi 10C चे स्पेसिफिकेशन्स

जागतिक बाजारातील रेडमी 10सी स्मार्टफोनवर नजर टाकल्यास हा स्मार्टफोन 6.71 इंचाच्य एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 सह 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. रेडमी 10सी 4जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यावर घरी आणा 64MP कॅमेरा असलेला Oppo स्मार्टफोन; अशी आहे ऑफर

Redmi 10C स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जोडीला 2 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी या लो बजेट स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here