Nokia 2.1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Nov 2018 12:38:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 12:38:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2796 सध्या बाजारात असे फोन उपलब्ध आहेत ज्यात चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत मोठी बॅटरी मौजूद आहे. खाली आम्ही अशाच 10 शानदार फोनची माहिती दिली आहे.

The post 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपण बऱ्याचदा असा फोन शोधत असतो ज्याचे स्पेसिफिकेशन चांगले असतात. सोबतच आपण मोठी बॅटरी बघणे पण विसरत नाही. कारण जर बॅटरी कमजोर असेल तर चांगल्या स्पेसिफिकेशनचा काहीच फायदा होत नाही. कारण तुम्ही काही करायला गेलात तर बॅटरी धोका देऊ शकते. सध्या बाजारात असे फोन उपलब्ध आहेत ज्यात चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत मोठी बॅटरी मौजूद आहे. खाली आम्ही अशाच 10 शानदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी सी1

7,000 रुपयांच्या बजेट मध्ये हा बेस्ट फोन असे बोलले जात आहे. रियलमी सी1 मध्ये 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे जी नॉच सह उपलब्ध आहे. कंपानी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल मेमरी आहे. कमी रेंजच्या रियलमी 2 प्रो मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो या रेंज मधील फोन मध्ये सहज मिळत नाही. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

2. असूस झेनफोन मॅक्स (एम1)

asus

असूसचा हा फोन पण तुम्ही विचारत घेऊ शकता. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस 5.45-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले आहे. कंपनी ने 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेटवर चालतो आणि यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. कॅमेरा सेग्मेंट पाहता 13-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच मॅक्स मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे.

3. यू एस

माइक्रोमॅक्स सब-ब्रांड यू ने नुकताच दमदार फोन आणला आहे. कंपनी ने यू एस लान्च केला आहे जो 2जीबी आणि 3जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यू एस एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे आणि हा मीडियाटेक एमटी6738 चिपसेट वर चालतो. दोन रॅम वेरियंट सोबत हा 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4,000एमएएच बॅटरी सह येतो.

4. मोटोरोला मोटो ई5 प्लस

मोटो ई5 प्लस मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन सह 18:9 आसपेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फूल व्यू डिस्प्ले आहे. हा फोन पण स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी मोटो ई5 प्लस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेला 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईटला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड मोटो लोगो देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 5,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे.

5. लेनोवो के8 नोट

lenovo k8 note

हा फोन जरा जास्त किंमतत लॉन्च करण्यात आला होता पण आज 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये उपलब्ध आहे. लेनोवो के8 नोट मध्ये 5.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने कोटेड आहे. मीडियाटेक एक्स23 एमटी6797डी चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.3गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी सह उपलब्ध आहे. तसेच फोटोग्राफी साठी 13+5-मेगापिक्सलचा रियर आणि 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. नोकिया 2.1

Nokia 2.1

कमी किंमतत नोकियाचा पण एक दमदार फोन उपलब्ध आहे. कंपनी ने नोकिया 2.1 आणला आहे ज्यात 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो आणि यात 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल मेमरी आहे. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याले पुढे पण अपडेट मिळतील. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे.

7. माइक्रोमॅक्स भारत 5 इनफिनिटी एडिशन

माइक्रोमॅक्स ने नुकताच कमी किंमतीती भारत 5 इनफिनिटी एडिशन सादर केला आहे. नावाप्रमाणेच या फोन मध्ये 5.45 इंचाचा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल ​लेस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 1जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो आणि यात 32जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी यात 5-मेगापिक्सल फ्रंट आणि बॅक कॅमेरा आहे. खास बाब म्हणजे ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि हा एंडरॉयड गो एडिशन वर चालतो.

8. टेनॉर जी
हा फोन पण खूप ताकदवान आहे. टेनॉर जी मध्ये 13-मेगापिक्स्लचा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 626 चिपसेट वर आधारित या फोन मध्ये 2.2गीगाहर्टज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी की स्टोरेज आहे. टेनॉर जी मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा टेनॉर जी 5.5-इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले सह येतो.

9. माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो

micromax bharat 5 pro

माइक्रोमॅक्स चा हा फोन पण खूप चांगला आहे. माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो मध्ये पण कंपनी ने 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनची बॅटरी 3 आठवडे म्हणजे 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. इतर फीचर्स पाहता यात 5.2-इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. फोन मध्ये 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि हा 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनच्या रियर पॅनल मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

10. इनफोकस वीजन 3

InFocus Vision 3

इनफोकसचा हा फोन पण तुम्ही बघू शकता. वीजन 3 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.7-इंचाची फुल व्यू स्क्रीन आहे. कंपनी ने हा 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. मीडियाटेक एमटी6750 चिपसेट आधारित या फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबतच 13-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी साठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/feed/ 0
नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 12:50:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1656 नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 सोबत नोकिया 3.1 पण नवीन अपडेट सह बाजारात आणला आहे.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 5.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 सादर केले होते. आज भारतातील नोकिया फॅन्सना शानदार भेट देत कंपनी ने हे तिन्ही फोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केले आहेत. नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 सोबत नोकिया 3.1 पण नवीन अपडेट सह बाजारात आणला आहे. शानदार बिल्ड क्वॉलिटी व लुक सह हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. हे तिन्ही स्मार्टफोन्स 12 ऑगस्ट पासून आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.

नोकिया 5.1
नोकिया 5.1 बद्दल बोलायचे तर हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीजचा वापर केला आहे जो उत्कृष्ट बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 5.5-इंचाची आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 5.1 एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.0गीगाहट्र्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलियो पी18 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर ​फिंगर​प्रिंट सेंसर सह पावर बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.1 कॉपर, टेंपर्ड ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 2.1
नोकिया 2.1 कंपनी ने सादर केलेल्या सेकेंड जेनेरेशन चा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोन मध्ये 5.5-इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 1 जीबी रॅम दिला आहे. फोन मधील 8जीबी इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 2.1 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कने​क्टिविटी फीचर्स सह नोकिया 2.1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

नोकिया 2.1 ब्लू/कॉपर, ग्रे/कॉपर आणि ग्रे/सिल्वर कलर वेरिएंट मध्ये 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 3.1
जुलै महिन्यात नोकिया ने भारतात नोकिया 3.1 लॉन्च केला होता. आज या फोन ची पावर वाढवत कंपनी ने फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट पण बाजारत आणला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिया वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो ऐज एल्युमीनियम डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ​कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड 5.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे.

नोकिया 3.1 पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. नोकिया चा हा फोन एआर अॅप्सला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 2,990 एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

हा फोन ब्लू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयरन कलर वेरिएंट मध्ये 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 13:18:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1536 नोकिया 6.1 प्लस सोबत नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 2.1 ही नावे पण प्रामुख्याने समोर येत आहे

The post भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी नोकिया च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर कंपनी च्या लेटेस्ट स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस चा यूजर गाइड दिसला होता, त्यानंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी आपला हा नवीन नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन लवकरच भारतात घेऊन येईल. आता पुन्हा एकदा नोकिया फॅन्स च्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण नोकिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून लॉन्च ईवेंट ची माहिती दिली आहे. या ट्वीट सह कंपनी ने कँपेन च्या सुरूवातीची घोषणा पण केली आहे.

नोकिया इंडिया ने आपल्या ट्वीटर अकांउट वरून ट्वीट करत एका कँपेन ची सुरवात केली आहे ज्यात नोकिया फॅन्सना त्यांचा आवडीच्या नोकिया स्मार्टफोन सोबतचा एखादा खास अनुभव शेयर करायाला सांगण्यात आला आहे. सोबतच या ट्वीट मध्ये कंपनी ने सांगितले आहे की या स्पर्धेच्या विजेत्याला कंपनी च्या आगामी एक्सक्लूसिव लॉन्च ईवेंट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

या ट्वीट मधून नोकिया ने जाहीर केले की कंपनी येत्या काही दिवसात भारतात एका लॉन्च ईवेंट चे आयोजन करणार आहे. पण नोकिया ने कोणत्या स्मार्टफोनच्या लॉन्च ची तयारी सुरू आहे हे स्पष्ट केले नाही. बोलले जात आहे की या ईवेंट मध्ये नोकिया काही दिवसांपूर्वी हाँगकाँग मध्ये लॉन्च झालेला स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस लॉन्च करू शकते.

नोकिया 6.1 प्लस सोबत नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 2.1 ही नावे पण प्रामुख्याने समोर येत आहे पण नोकिया 6.1 प्लस चा यूजर गाइड कंपनी च्या वेबसाइट वर लिस्ट झाल्यामुळे हाच फोन लॉन्च होण्याची शक्यता जास्त आहे. कंपनी च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वरून समोर आलेल्या यूजर गाइड मधील फोन ची एसएआर डिटेल्स नोकिया 6.1 प्लस सोबत तंतोतंत जुळत आहेत.

पण नोकिया कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येणार आहे आणि हा स्मार्टफोन कधी देशात लॉन्च केला जाईल यासाठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

The post भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/feed/ 0
नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/#respond Wed, 30 May 2018 10:32:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=696 कंपनी चा दावा आहे की हे फोन्स जुन्या मॉडेल्स पेक्षा 50 टक्के वेगवान आहेत.

The post नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया मोबाइल चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती की 29 मे ला एक इवेंट करणार आहे. लोकांना वाटत होते की या दिवशी नोकिया द्वारा एक्स सीरीज चा फोन प्रदर्शीत केला जाईल पण कंपनी ने तीन दूसरे डिवाइस लॉन्च केले आहेत जे बजट सेग्मेंट मधील आहेत. कंपनी ने मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या नोकिया 2, नोकिया 3 आणि नोकिया 5 चे अपग्रेड वर्जन सादर केले आहेत ज्यांना नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1 ही नावे देण्यात आली आहेत. कंपनी चा दावा आहे की हे फोन्स जुन्या मॉडेल्स पेक्षा 50 टक्के वेगवान आहेत.

नोकिया 2.1 पाहता या फोन मध्ये 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे. विशेष म्हणजे हा लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याला पुढेही अपडेट मिळतील.

कॅमेरा पाहता नोकिया 2.1 मध्ये 8—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सल चा आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी चा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम आहे.

आता नोकिया 3.1 वर येऊया. या फोन मध्ये तुम्हाला थोडी छोटी स्क्रीन मिळेल. कंपनी ने याला 5.2—इंचाच्या स्क्रीन सह सादर केले आहे. विशेष म्हणजे कंपनी ने यात बेजल लेस डिस्प्ले दिला आहे. कंपनी ने याला 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन सह सादर केले आहे. तसेच यात 2.5डी कर्व्ड ग्लास चा वापर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 3.1 मीडियाटेकट 6750 चिपसेट सह सादर केला गेला आहे आणि यात 2जीबी रॅम सह 16जीबी ची इंटरनल मेमरी आहे. तसेच याची एक वेरिएंट 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी सह पण येतो. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 2,990 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तिसरा मॉडेल नोकिया 5.1 आहे जो यांमध्ये सर्वात पावरफुल आहे. हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीज चा वापर केला आहे जो उत्तम बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन मध्ये 5.5—इंचाचा आईपीएस डिसप्ले आहे आणि कंपनी ने यात 18:9 आसपेक्ट रेशियो वाली स्क्रीन दिली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6755एस चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 मध्ये 16—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे.

The post नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/feed/ 0