नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

नोकिया ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 5.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 सादर केले होते. आज भारतातील नोकिया फॅन्सना शानदार भेट देत कंपनी ने हे तिन्ही फोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केले आहेत. नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 सोबत नोकिया 3.1 पण नवीन अपडेट सह बाजारात आणला आहे. शानदार बिल्ड क्वॉलिटी व लुक सह हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. हे तिन्ही स्मार्टफोन्स 12 ऑगस्ट पासून आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.

नोकिया 5.1
नोकिया 5.1 बद्दल बोलायचे तर हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीजचा वापर केला आहे जो उत्कृष्ट बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 5.5-इंचाची आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 5.1 एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.0गीगाहट्र्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलियो पी18 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर ​फिंगर​प्रिंट सेंसर सह पावर बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.1 कॉपर, टेंपर्ड ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 2.1
नोकिया 2.1 कंपनी ने सादर केलेल्या सेकेंड जेनेरेशन चा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोन मध्ये 5.5-इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 1 जीबी रॅम दिला आहे. फोन मधील 8जीबी इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 2.1 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कने​क्टिविटी फीचर्स सह नोकिया 2.1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

नोकिया 2.1 ब्लू/कॉपर, ग्रे/कॉपर आणि ग्रे/सिल्वर कलर वेरिएंट मध्ये 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 3.1
जुलै महिन्यात नोकिया ने भारतात नोकिया 3.1 लॉन्च केला होता. आज या फोन ची पावर वाढवत कंपनी ने फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट पण बाजारत आणला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिया वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो ऐज एल्युमीनियम डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ​कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड 5.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे.

नोकिया 3.1 पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. नोकिया चा हा फोन एआर अॅप्सला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 2,990 एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

हा फोन ब्लू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयरन कलर वेरिएंट मध्ये 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here