नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही

नोकिया मोबाइल चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती की 29 मे ला एक इवेंट करणार आहे. लोकांना वाटत होते की या दिवशी नोकिया द्वारा एक्स सीरीज चा फोन प्रदर्शीत केला जाईल पण कंपनी ने तीन दूसरे डिवाइस लॉन्च केले आहेत जे बजट सेग्मेंट मधील आहेत. कंपनी ने मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या नोकिया 2, नोकिया 3 आणि नोकिया 5 चे अपग्रेड वर्जन सादर केले आहेत ज्यांना नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1 ही नावे देण्यात आली आहेत. कंपनी चा दावा आहे की हे फोन्स जुन्या मॉडेल्स पेक्षा 50 टक्के वेगवान आहेत.

नोकिया 2.1 पाहता या फोन मध्ये 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे. विशेष म्हणजे हा लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याला पुढेही अपडेट मिळतील.

कॅमेरा पाहता नोकिया 2.1 मध्ये 8—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सल चा आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी चा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम आहे.

आता नोकिया 3.1 वर येऊया. या फोन मध्ये तुम्हाला थोडी छोटी स्क्रीन मिळेल. कंपनी ने याला 5.2—इंचाच्या स्क्रीन सह सादर केले आहे. विशेष म्हणजे कंपनी ने यात बेजल लेस डिस्प्ले दिला आहे. कंपनी ने याला 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन सह सादर केले आहे. तसेच यात 2.5डी कर्व्ड ग्लास चा वापर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 3.1 मीडियाटेकट 6750 चिपसेट सह सादर केला गेला आहे आणि यात 2जीबी रॅम सह 16जीबी ची इंटरनल मेमरी आहे. तसेच याची एक वेरिएंट 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी सह पण येतो. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 2,990 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तिसरा मॉडेल नोकिया 5.1 आहे जो यांमध्ये सर्वात पावरफुल आहे. हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीज चा वापर केला आहे जो उत्तम बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन मध्ये 5.5—इंचाचा आईपीएस डिसप्ले आहे आणि कंपनी ने यात 18:9 आसपेक्ट रेशियो वाली स्क्रीन दिली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6755एस चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 मध्ये 16—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here