आपण बऱ्याचदा असा फोन शोधत असतो ज्याचे स्पेसिफिकेशन चांगले असतात. सोबतच आपण मोठी बॅटरी बघणे पण विसरत नाही. कारण जर बॅटरी कमजोर असेल तर चांगल्या स्पेसिफिकेशनचा काहीच फायदा होत नाही. कारण तुम्ही काही करायला गेलात तर बॅटरी धोका देऊ शकते. सध्या बाजारात असे फोन उपलब्ध आहेत ज्यात चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत मोठी बॅटरी मौजूद आहे. खाली आम्ही अशाच 10 शानदार फोनची माहिती दिली आहे.
7,000 रुपयांच्या बजेट मध्ये हा बेस्ट फोन असे बोलले जात आहे. रियलमी सी1 मध्ये 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे जी नॉच सह उपलब्ध आहे. कंपानी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल मेमरी आहे. कमी रेंजच्या रियलमी 2 प्रो मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो या रेंज मधील फोन मध्ये सहज मिळत नाही. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
असूसचा हा फोन पण तुम्ही विचारत घेऊ शकता. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस 5.45-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले आहे. कंपनी ने 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेटवर चालतो आणि यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. कॅमेरा सेग्मेंट पाहता 13-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच मॅक्स मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे.
माइक्रोमॅक्स सब-ब्रांड यू ने नुकताच दमदार फोन आणला आहे. कंपनी ने यू एस लान्च केला आहे जो 2जीबी आणि 3जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यू एस एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे आणि हा मीडियाटेक एमटी6738 चिपसेट वर चालतो. दोन रॅम वेरियंट सोबत हा 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4,000एमएएच बॅटरी सह येतो.
मोटो ई5 प्लस मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन सह 18:9 आसपेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फूल व्यू डिस्प्ले आहे. हा फोन पण स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी मोटो ई5 प्लस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेला 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईटला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड मोटो लोगो देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 5,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे.
हा फोन जरा जास्त किंमतत लॉन्च करण्यात आला होता पण आज 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये उपलब्ध आहे. लेनोवो के8 नोट मध्ये 5.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने कोटेड आहे. मीडियाटेक एक्स23 एमटी6797डी चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.3गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी सह उपलब्ध आहे. तसेच फोटोग्राफी साठी 13+5-मेगापिक्सलचा रियर आणि 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
कमी किंमतत नोकियाचा पण एक दमदार फोन उपलब्ध आहे. कंपनी ने नोकिया 2.1 आणला आहे ज्यात 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो आणि यात 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल मेमरी आहे. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याले पुढे पण अपडेट मिळतील. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे.
7. माइक्रोमॅक्स भारत 5 इनफिनिटी एडिशन
माइक्रोमॅक्स ने नुकताच कमी किंमतीती भारत 5 इनफिनिटी एडिशन सादर केला आहे. नावाप्रमाणेच या फोन मध्ये 5.45 इंचाचा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 1जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो आणि यात 32जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी यात 5-मेगापिक्सल फ्रंट आणि बॅक कॅमेरा आहे. खास बाब म्हणजे ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि हा एंडरॉयड गो एडिशन वर चालतो.
8. टेनॉर जी
हा फोन पण खूप ताकदवान आहे. टेनॉर जी मध्ये 13-मेगापिक्स्लचा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 626 चिपसेट वर आधारित या फोन मध्ये 2.2गीगाहर्टज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी की स्टोरेज आहे. टेनॉर जी मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा टेनॉर जी 5.5-इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले सह येतो.
माइक्रोमॅक्स चा हा फोन पण खूप चांगला आहे. माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो मध्ये पण कंपनी ने 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनची बॅटरी 3 आठवडे म्हणजे 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. इतर फीचर्स पाहता यात 5.2-इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. फोन मध्ये 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि हा 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनच्या रियर पॅनल मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.
इनफोकसचा हा फोन पण तुम्ही बघू शकता. वीजन 3 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.7-इंचाची फुल व्यू स्क्रीन आहे. कंपनी ने हा 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. मीडियाटेक एमटी6750 चिपसेट आधारित या फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबतच 13-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी साठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.