Nokia C21 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 26 Jul 2022 13:36:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रेडमी-रियलमीला Nokia चा दणका! तीन दिवस पुरणारी बॅटरी आणि 3 कॅमेऱ्यांसह स्वस्त फोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-3-camera-nokia-phone-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-3-camera-nokia-phone-launched-check-price-and-specifications/#respond Tue, 26 Jul 2022 13:36:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11733 Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post रेडमी-रियलमीला Nokia चा दणका! तीन दिवस पुरणारी बॅटरी आणि 3 कॅमेऱ्यांसह स्वस्त फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियानं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Nokia C21 Plus लाँच केला आहे. कंपनी गेले कित्येक दिवस या स्मार्टफोनचा लाँच टीज करत होती. नवीन Nokia C21 Plus स्मार्टफोन दमदार बॅटरी आणि स्लीक डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 5050mAh ची बॅटरी मिळते जी सिंगल चार्जवर दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा दावा नोकियानं केला आहे. हा हँडसेट बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, त्यामुळे रेडमी, रियलमी, टेक्नो आणि इनफिनिक्स सारख्या ब्रँड्सकडून नोकियाला टक्कर मिळू शकते. पुढे आम्ही तुम्हाला नोकियाच्या या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Nokia C21 Plus चे स्पेसिफिकेशन्स

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 720X1600 पिक्सल आणि आसपेक्ट रेश्यो 20:9 आहे. नोकियाचा हा Octa Core प्रोसेसरवर चालतो. चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 GB पर्यंत वाढवता येते. हा हँडसेट Android 11 Go एडिशनवर चालतो. जे अँड्रॉइडचं हलकं व्हर्जन आहे आणि यात जास्त रॅम आणि मेमरीची गरज पडत नाही. गुगल अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन देखील या मोबाईलमध्ये उपलब्ध होतील. हे देखील वाचा: 5G Network साठी Jio नं मागितली Nokia ची मदत; असा आहे अंबानीचा 5जी मास्टर प्लॅन

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही दमदार बॅटरी दीर्घकाळ टिकते असा दावा कंपनीनं केला आहे. सोबतीला कंपनीनं 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला आहे. फोटोग्राफीसाठी नोकियाच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे सोबतीला 2MP चा डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. विशेष म्हणजे फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे LED फ्लॅश देण्यात आला आहे. हे देखील वाचा: कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nokia C21 Plus ची किंमत

Nokia C21 Plus स्मार्टफोन भारतात डार्क स्यान आणि वार्म ग्रे या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. नोकियाच्या या फोनचा 3GB रॅम व 32GB स्टोरेज असलेला मॉडेल 10,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,299 रुपये ठेवण्यात आली आहे. नोकियाचा हँडसेट सर्व रिटेल स्टोर आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतगर्त मर्यादित कालावधीसाठी फोन सोबत नोकिया वायर्ड बड्स मोफत दिले जातील. नोकियाचे बड्स Nokia.com वरून स्मार्टफोन विकत घेतल्यास मोफत मिळतील.

The post रेडमी-रियलमीला Nokia चा दणका! तीन दिवस पुरणारी बॅटरी आणि 3 कॅमेऱ्यांसह स्वस्त फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-3-camera-nokia-phone-launched-check-price-and-specifications/feed/ 0
अत्यंत कमी किंमतीत Nokia C21 Plus स्मार्टफोन लाँच; 8 इंचाचा Nokia T10 टॅबलेटही ग्राहकांच्या भेटीला https://www.91mobiles.com/marathi/nokia-c21-plus-smartphone-launched-in-india-check-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c21-plus-smartphone-launched-in-india-check-price-and-specs/#respond Wed, 13 Jul 2022 09:28:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11353 Nokia C21 Plus बजेट स्मार्टफोनसह कंपनीनं भारतात लाँच केला आहे. Nokia T10 Tab ग्लोबल मार्केटमध्ये सादर झाला आहे.

The post अत्यंत कमी किंमतीत Nokia C21 Plus स्मार्टफोन लाँच; 8 इंचाचा Nokia T10 टॅबलेटही ग्राहकांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia नं भारतासह जागतिक बाजारात आपला बजेट स्मार्टफोन Nokia C21 Plus लाँच केला आहे. कंपनीनं Nokia T10 टॅबलेट देखील जगासमोर ठेवला आहे, परंतु भारतीयांना या टॅबसाठी अजून काही काळ वाट बघावी लागू शकते. नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये बजेट स्पेसिफिकेशन्स आणि पॉलीकार्बोनेट बॅक पॅनल देण्यात आला आहे. कंपनीनं स्मार्टफोनमध्ये Unisoc प्रोसेसरची ताकद दिली आहे.

Nokia C21 Plus ची किंमत

Nokia C21 Plus स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेल 10,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेजसाठी 11,299 रुपये मोजावे लागतील. Nokia C21 Plus स्मार्टफोन डार्क स्यान, वार्म ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

नोकियाचा हा स्मार्टफोन कंपनीच्या भारतीय वेबसाईटवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त या फोन सोबत कंपनी Nokia Wired Buds मोफत देणार आहे. Nokia चा हा फोन 10 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येईल तसेच ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळतील.

Nokia C21 Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच फोनचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. नोकियाच्या या फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर दिसत आहे.

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 4GB पर्यंतचा रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आला आहे. स्टोरेज वाढण्यासाठी कंपनीनं मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे. नोकियानं सध्यातरी फोनच्या बॅटरी कपॅसिटीची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु कंपनीनं सांगितलं आहे की, सिंगल चार्जमध्ये हा फोन तीन दिवसांचा बॅकअप ऑफर करतो. Nokia C21 Plus स्मार्टफोन Android 11 Go Edition वर चालतो.

Nokia T10 टॅबलेट चे स्पेसफिकेशन्स

Nokia T10 टॅबलेटमध्ये 8-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा टॅबलेट अँड्रॉइड 12 वर चालतो. कंपनी तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देणार आहे. Nokia T10 टॅबलेटमध्ये Unisoc T606 SoC देण्यात आली आहे. सोबतीला 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते.

नोकियाच्या टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 2MP चा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. Nokia T10 मध्ये 3.5mm हेडफोन जॅक, AI फेस अनलॉक, ड्युअल बँड Wi-Fi (2.4 GHz आणि 5 GHz), Bluetooth 5.0, आणि GPS सपोर्ट देण्यात आला आहे. हा टॅबलेट Wi-Fi आणि Wi-Fi + 4G LTE ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post अत्यंत कमी किंमतीत Nokia C21 Plus स्मार्टफोन लाँच; 8 इंचाचा Nokia T10 टॅबलेटही ग्राहकांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c21-plus-smartphone-launched-in-india-check-price-and-specs/feed/ 0