रेडमी-रियलमीला Nokia चा दणका! तीन दिवस पुरणारी बॅटरी आणि 3 कॅमेऱ्यांसह स्वस्त फोन लाँच

नोकियानं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Nokia C21 Plus लाँच केला आहे. कंपनी गेले कित्येक दिवस या स्मार्टफोनचा लाँच टीज करत होती. नवीन Nokia C21 Plus स्मार्टफोन दमदार बॅटरी आणि स्लीक डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 5050mAh ची बॅटरी मिळते जी सिंगल चार्जवर दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा दावा नोकियानं केला आहे. हा हँडसेट बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, त्यामुळे रेडमी, रियलमी, टेक्नो आणि इनफिनिक्स सारख्या ब्रँड्सकडून नोकियाला टक्कर मिळू शकते. पुढे आम्ही तुम्हाला नोकियाच्या या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Nokia C21 Plus चे स्पेसिफिकेशन्स

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 720X1600 पिक्सल आणि आसपेक्ट रेश्यो 20:9 आहे. नोकियाचा हा Octa Core प्रोसेसरवर चालतो. चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 GB पर्यंत वाढवता येते. हा हँडसेट Android 11 Go एडिशनवर चालतो. जे अँड्रॉइडचं हलकं व्हर्जन आहे आणि यात जास्त रॅम आणि मेमरीची गरज पडत नाही. गुगल अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन देखील या मोबाईलमध्ये उपलब्ध होतील. हे देखील वाचा: 5G Network साठी Jio नं मागितली Nokia ची मदत; असा आहे अंबानीचा 5जी मास्टर प्लॅन

Nokia C21 Plus स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही दमदार बॅटरी दीर्घकाळ टिकते असा दावा कंपनीनं केला आहे. सोबतीला कंपनीनं 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला आहे. फोटोग्राफीसाठी नोकियाच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे सोबतीला 2MP चा डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. विशेष म्हणजे फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे LED फ्लॅश देण्यात आला आहे. हे देखील वाचा: कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nokia C21 Plus ची किंमत

Nokia C21 Plus स्मार्टफोन भारतात डार्क स्यान आणि वार्म ग्रे या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. नोकियाच्या या फोनचा 3GB रॅम व 32GB स्टोरेज असलेला मॉडेल 10,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,299 रुपये ठेवण्यात आली आहे. नोकियाचा हँडसेट सर्व रिटेल स्टोर आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतगर्त मर्यादित कालावधीसाठी फोन सोबत नोकिया वायर्ड बड्स मोफत दिले जातील. नोकियाचे बड्स Nokia.com वरून स्मार्टफोन विकत घेतल्यास मोफत मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here