कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

5G in India चं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आज म्हणजे 26 जुलैला भारतात 5G Spectrum Auction सुरु होईल त्यानंतर Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea समवेत अनेक दिग्गज टेक कंपन्यांना 5G Service रोलआउट करण्यास परवानगी मिळेल. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर सर्व कंपन्यांमध्ये सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्याची स्पर्धा सुरु होईल. 5जी फोन आधीच बाजारात उपलब्ध आहेत आणि सर्व्हिस सुरु होताच लोकांना सुपर फास्ट 5G Internet ची मजा घेता येईल. अनेक लोकांनी 5G phones तर घेतले आहेत परंतु 5जी नेटवर्क आल्यावर 5G SIM कसं मिळेल? तथा नवीन 5जी सिम कार्डवर आपला जुना नंबर कशाप्रकारे वापरता येईल, असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला देखील 5G SIM Card बद्दल कुतूहल असेल तर पुढे आम्ही 5जी सिमसंबंधित प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

कसं असेल 5G SIM?

सध्या बाजारात 2G, 3G आणि 4G तिन्ही प्रकारचे सिम कार्ड आहेत. फीचर फोन्समध्ये 2G सिम वापरलं जात आहे तर स्मार्टफोन युजर्स 3G आणि 4G दोन्हीप्रकारचे सिम कार्ड वापरत आहेत. विशेष म्हणजे 5G SIM देखील सध्याच्या 4G SIM सारखंच असेल तसेच त्याचा आकार बदलला जाणार नाही. इतकेच नव्हे तर तुम्ही आता ज्या कंपनीचं 4G सिम वापरत असाल ते 5G नेटवर्कवर देखील ऑपरेट करू शकेल. याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

कोणत्या मोबाईल फोन्समध्ये वापरता येईल 5G SIM?

5G सिम तुम्ही फक्त 5G फोनवरच वापरू शकाल. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत ज्यात असा दावा केला जात आहे की 4जी मोबाईलमध्ये देखील 5जी सिम वापरता येईल. परंतु अश्या दाव्यात तथ्य नाही. या व्हिडीओजमध्ये यह सांगण्यात आलं आहे की जेव्हा 4G लाँच झालं होतं तेव्हा 4G सिम 2G आणि 3G फोनमध्ये देखील वापरता येतं होतं, जे साफ खोटं आहे. 2G फोनमध्ये 4जी सिम वापरल्यास त्यावर सर्व्हिस 2G ची मिळत होती. तसेच JIO सिम 2G किंवा 3G फोनमध्ये तर चालतच नव्हतं. कारण एयरटेल, वोडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्या 4G सह 2G आणि 3G सर्व्हिस देखील देत होत्या परंतु जियोकडे फक्त 4G सर्व्हिस होती. 5G साठी देखील अशीच सर्व्हिस मिळेल. तुम्ही 4G फोनमध्ये 5G सिम टाकू शकाल परंतु सर्व्हिस 4G ची मिळेल. आणि JIO ची 4G सर्व्हिस आहे त्यामुळे यावेळी Airtel आणि VI सह जियोचं 5G SIM देखील 4G फोनमध्ये 4G सर्व्हिस देईल.

4G SIM वरच 5G सर्व्हिस मिळणार की नवीन SIM घ्यावं?

आज स्मार्टफोन युजर्ससाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की 4G सिमवरच 5G सर्व्हिस मिळेल की यासाठी नवीन SIM घ्यावं लागेल? स्पष्ट सांगायचं झालं तर याचं उत्तर ऑपरेटरवर अवलंबुन असेल. कारण SIM मध्ये काही विशेष टेक्नॉलॉजी तर नसते. सिमच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एक यूनिक ID दिला जातो आणि त्या ID नुसार तुमच्या नंबरवर प्लॅन अ‍ॅक्टिव्ह केला जातो.

याबाबत जास्त माहितीसाठी आम्ही भारतातील प्रसिद्ध मोबाईल इंजीनियर अर्शदीप सिंह निप्पी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मजेशीर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की “ 4G SIM वर 5G सर्व्हिस दिली जाऊ शकते, जर SIM फ्यूचर रेडी असेल तर नवीन SIM ची गरज पडणार नाही. जर SIM फ्यूचर रेडी नसेल तरी देखील ऑपरेटर्स OTA अपडेटच्या माध्यमातून ते अपग्रेड करू शकतात.”

त्यांच्या मते “सिम तर फक्त आयडेंटिटी नंबर असतो. यात जास्त काही टेक्नॉलॉजी नसते. जर सिममध्ये टेक्नॉलॉजी असती तर सिम नसलेले फोन जे फक्त e-SIM वर चालतात त्यांना कशी 2G, 3G, 4G किंवा 5G सर्व्हिस मिळाली नसती.”

ते पुढे म्हणाले की “आधी सिम सोबत टूलकिट येत असे ज्यामुळे ते कोणत्याही नेटवर्कवर सहज अपग्रेड करता येत होतं. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते आता हटवण्यात आलं आहे. तरीही ऑपरेटर्सना 2G, 3G किंवा 4G सिमवर 5G सर्व्हिस देताना जास्त त्रास होणार नाही फोनमध्ये फक्त नेटवर्क बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.”

फोनमध्ये कशाप्रकारे वापरता येईल 5जी सर्व्हिस?

ज्या मोबाईल युजर्सनी 5G Smartphone विकत घेतले आहेत, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जर ऑपरेटर्सनी ठरवलं तर मोबाईल फोनमध्ये 5जी वापरण्यासाठी वेगळं 5G SIM घ्यावं लागणार नाही. ग्राहक आपल्या 4जी सिमवरच 5जी नेटवर्कशी कनेक्ट करू शकतील तसेच त्यावर सुपर फास्ट 5जी इंटरनेट देखील वापरू शकतील. विशेष म्हणजे 5जी नेटवर्कसाठी Jio, Airtel किंवा Vi च्या कोणत्याही ग्राहकाला आपलं सिम किंवा मोबाईल नंबर पोर्ट करावा लागणार नाही.

4G सिम 5G मध्ये पोर्ट करावं लागेल का?

इथे एक बाब स्पष्ट सांगणं आवश्यक आहे की वर सांगितल्याप्रमाणे 4G SIM फक्त 5G SIM मध्ये कन्वर्ट होईल, परंतु त्यात लगेच 5जी इंटरनेट वापरता येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर 5जी सर्व्हिस हवी असेल तर तुम्हाला वेगळे 5G Plans विकत घ्यावे लागतील, म्हणजे 5G Pack मध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सनुसार तुम्हाला 5जी सर्व्हिस मिळेल. कोणताही 5जी प्लॅन विकत घेण्याआधी तुमचं सिम 5जीवर अपग्रेड झालंय का तसेच ते 5जी फोनमध्ये आहे का याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर तुमच्या परिसरात 5जी सर्व्हिस सुरु झाली आहे का, हे देखील तपासून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here