5G Network साठी Jio नं मागितली Nokia ची मदत

5G Spectrum Auction ला केंद्र सरकार कडून मंजुरी मिळाली असल्यामुळे लवकरच 5G Network चा विस्तार भारतात होऊ शकतो. सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्यास 26 जुलैला भारतात 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु होईल आणि 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निम्मिताने भारतात 5जी नेटवर्क रोलआउट करण्यात येईल. अनेक दिग्गज टेक कंपन्या देशातील टेलीकॉम कंपन्यांसोबत मोबाईल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet देण्यासाठी काम करत आहे. याबाबत आता एक नवीन अपडेट समोर आलं आहे की देशातील नंबर वन दूरसंचार कंपनी Reliance Jio नं 5G Rollout साठी Nokia आणि Ericsson सह भागीदारी करण्याची योजना बनवली आहे.

Jio 5G

Reliance Jio, Airtel आणि Vi तिन्ही टेलीकॉम कंपन्यांनी वेगानं आपले 5जी ट्रायल्स पूर्ण केले आहेत तसेच आता स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 5जी रोलआउट करण्याची तयारी करत आहेत. 5जी नेटवर्कसाठीच रिलायन्स जियोनं युरोपियन कंपन्यांशी संपर्क साधला आहे ज्यात Nokia आणि Ericsson चं नाव आहे. नोकिया आणि एरिक्सन कंपनी भारतात 5जीचा विस्तार करण्यासाठी Jio ला मदत करतील आणि रिलायन्स जियो या कंपन्यांनी बनवलेल्या इक्विपमेंट तसेच टूल्सचा वापर करेल. तुम्हाला सांगू इच्छितो की 4G साठी रिलायन्स जियोनं फक्त Samsung सोबतच भागीदारी केली आहे.

जियो 5जी नेटवर्क

जियो 5जी नेटवर्क पाहता, Jio आणि Ericsson दोन्ही कंपन्यांनी एकत्र काम करून कंपनीच्या 5जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. ट्रायल्स दरम्यान या दोन्ही कंपन्यांनी राजधानी दिल्लीत 5G Trials पूर्ण केले होते. तसेच 5जी नेटवर्कवर डेटा ट्रान्सफर केला होता. आता या दोन्ही कंपन्या मुंबईत देखील एक 5जी ट्रायल करणार आहेत, त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये देखील 5जी नेटवर्कचं ट्रायल करण्यात केलं जाऊ शकतं. तसेच Nokia आणि Jio मधील बोलणी यशस्वी झाल्यास लवकरच 5जी नेटवर्क डिप्लॉयमेंटसाठी या कंपन्या एकत्र काम करताना दिसतील.

5G in India

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतात 5जी सर्विस बाबत सांगितलं आहे की, यावर्षीच्या अखेरपर्यंत भारतात सुमारे 25 शहर व वस्त्यांमध्ये 5जी नेटवर्क पूर्णपणे सक्रिय होईल. तसेच 5G Data प्राईसबद्दल सांगण्यात आलं आहे की, भारतात 5जी इंटरनेट वापरण्याचा खर्च जागतिक बाजाराच्या तुलनेत खूप कमी असेल. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या डेटा प्राईस 2 अमेरिकन डॉलर (जवळपास 155 रुपये) च्या आसपास आहेत, परंतु जागतिक बाजारात याची सरासरी किंम 25 यूएस डॉलर (जवळपास 1900 रुपये) आहे. याचप्रमाणे 5जी नेटवर्कवर देखील इंटरनेट डेटाच्या किंमती ग्लोबल मार्केटपेक्षा कमी असतील.

10 पट फास्ट असेल 5जी

IMT/5G Spectrum च्या लिलावात 5जी स्पेक्ट्रम पब्लिक आणि प्रायव्हेट कंपन्या दोन्हींना पुरवण्यात येईल. यात Jio, airtel आणि vi समवेत Goolge, ericsson, Nokia, Amazon, TCS आणि Cisco सारख्या कंपन्यांचा समवेश असेल. आगामी 5जी सध्या उपलब्ध असलेल्या 4जी पेक्षा 10 पट जास्त फास्ट असेल तसेच 5G Network वर 20Gbps पर्यंत डेटा डाउनलोड स्पीड मिळू शकतो. देशात होणाऱ्या स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz तसेच 2300 MHz फ्रीक्वेंसी असलेल्या लो बँड्ससह 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स आणि 26 GHz High frequency bands चा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here