Nokia X71 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले सह सॅमसंगला टक्कर देण्यास आला नोकिया एक्स71 https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-officially-launched-feature-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-officially-launched-feature-specifications-price/#respond Tue, 02 Apr 2019 12:05:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3990 अंर्तराष्ट्रीय बाजारात नोकिया एक्स71 ची भारतीय करंसी अनुसार किंमत जवळपास 30,000 रुपये आहे.

The post 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले सह सॅमसंगला टक्कर देण्यास आला नोकिया एक्स71 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा नोकिया एक्स71 नावाने टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. अनेक लीक्स आणि चर्चा शांत करत एचएमडी ग्लोबल ने आज नोकिया एक्स71 सादर केला आहे. कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर नोकिया एक्स71 सादर केला आहे. आर्कषक लुक, शानदार फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला नोकिया एक्स71 नोकिया ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनच्या स्वरूपात समोर आला ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.

नोकिया एक्स71 डिजाईन
नोकिया एक्स71 ची पहिली उपलब्धी हीच आहे कि हा फोन कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने याला प्योरडिस्प्लेचे नाव दिले आहे. नोकिया एक्स71 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये फोनच्या मधोमध आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे.

नोकिया एक्स71 स्पेसिफिकेशन्स
हा फोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे जो 6.39-इंच की फुलएचडी+ स्क्रीन सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत. कंपनीने नोकिया एक्स71 एंडरॉयडच्या लेटेस्ट आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर करण्यात आला आहे. नोकियाचा हा नवीन फोन आक्टा-कोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 एआईई चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी

नोकिया एक्स71 कंपनीने 6जीबी रॅम वर सादर केला आहे. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया एक्स71 कार्ल जेसिसच्या कॅमेरा सेंसर्स सह येतो. फोनच्या बॅक पॅनल वर ​फ्लॅश लाईट सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच हा फोन सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. नोकिया एक्स71 च्या पंच-होल मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा सेंसर एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच नोकिया एक्स71 मध्ये 8-मेगापिक्सलची सुपर वाईड-एंगल लेंस पण देण्यात आली आहे जी 120-डिग्री वाईड शॉट घेऊ शकते. नोकिया एक्स71 वर तिसरा रियरा कॅमेरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.4 अपर्चर तथा डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

हे देखील वाचा: शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे

नोकिया एक्स71 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन इन-डिस्प्ले अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. नोकिया एक्स71 मध्ये एलईडी पावर बटण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. किंमत पाहता अंर्तराष्ट्रीय बाजारात नोकिया एक्स71 ची भारतीय करंसी अनुसार किंमत जवळपास 30,000 रुपये आहे.

The post 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले सह सॅमसंगला टक्कर देण्यास आला नोकिया एक्स71 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-officially-launched-feature-specifications-price/feed/ 0
2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/#respond Tue, 26 Mar 2019 08:59:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3931 हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो.

The post 2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगातील पहिला पेंटा कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 5 रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ईशारा केला आहे कि हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येईल. दुसरीकडे नोकियाच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. बातमी अशी आहे कि एचएमडी ग्लोबल येत्या 2 एप्रिलला अंर्तराष्ट्रीय मंचावर नवीन स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे जो नोकिया एक्स71 नावाने येईल. हा स्मार्टफोन सर्वात आधी ताईवान मध्ये लॉन्च केला जाईल जो नंतर इतर बाजारांत येईल.

लॉन्च डिटेल
एचएमडी ग्लोबल ने तैवान मध्ये मीडिया इन्वाईट शेयर करत नवीन प्रोडक्ट लॉन्चची माहिती दिली आहे. कंपनीने मीडिया इन्वाईट मध्ये सांगितले आहे कि येत्या 2 एप्रिलला एचएमडी ग्लोबल नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया एक्स71 तैवान मध्ये लॉन्च करेल. नोकिया एक्स71 सोबत कंपनी या ईवेंट मध्ये नोकिया 9 प्योरव्यू पण लॉन्च करेल. विशेष म्हणजे तैवान मध्ये नोकिया 9 प्योरव्यूची लॉन्च डेट समोर आल्यानंतर कंपनीच्या इंडियन फॅन्स पण उत्साहित झाले आहेत आणि एप्रिल मध्ये नोकिया 9 प्योरव्यू भारतीय बाजारात येईल असे त्यांना वाटू लागले आहे.

नोकिया एक्स71
नोकिया एक्स71 च्या लॉन्च डेट सोबत एचएमडी ग्लोबल ने फोनच्या काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत. नोकियाचा हा आगामी स्मार्टफोन फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये खूप असणार आहे. कंपनी ने सांगितले आहे कि नोकिया एक्स71 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक सुपर वाईड-एंगल लेंस पण दिली जाईल जी 120-डिग्रीचा वाईड शॉट घेऊ शकेल.

शाओमी घेऊन येत आहे ताकदवान 5जी फोन मी मिक्स 4, ट्रिपल कॅमेर्‍या सह असेल स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर

नोकिया एक्स71 बद्दल समोर आलेल्या इतर बातम्या आणि लीक्स पाहता हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फोन मध्ये जर पंच-होल डिस्प्ले दिला गेला तर नोकिया एक्स71 कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो या डिजाईन सह सादर होईल. अलीकडेच सॅमसंग ने पण आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्मार्टफोन्स पंच-होल डिस्प्ले सह सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी नोकियाचा आगामी डिवाईस एनसीसी वेबसाइट वर टीए-1167 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. बोलले जात आहे कि नोकिया एक्स71 तोच मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन आहे.

नोकिया 9 प्योरव्यू
नोकिया 9 प्योरव्यू बद्दल बोलायचे तर हा जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन आहे. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post 2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/feed/ 0