मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स

साउथ कोरियातील दिग्गज कंपनी सॅमसंग 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहे. पण या इवेंट मध्ये कोणते डिवाइस समोर येतील याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता कंपनी ने आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए70 सादर केला आहे.

साल 2019 मध्ये गॅलेक्सी ए सीरीज मध्ये कंपनी ने आतापर्यंत गॅलेक्सी ए40, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 सादर केले आहेत. तसेच परवा गॅलेक्सी ए60 सह गॅलेक्सी ए70 टेना वर दिसला होता. टेना लिस्टिंग नंतर कंपनीने दोन फोन्स पैकी गॅलेक्सी ए70 ऑफिशियली सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए70 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी ए70 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर ऐमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. अशाप्रकारचा ऑप्टिकल सेंसर कंपनी ने गॅलेक्सी ए50 मध्ये दिला होता. वाटरड्रॉप नॉच सह सादर केल्या गेलेल्या या फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 6जीबी व 8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे.

पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए70 मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह देण्यात आली आहे. अशाचप्ररकची टेक्नॉलॉजी कंपनीने याआधी गॅलेक्सी एस10 5जी मध्ये सादर केली आहे. बोलले जात आहे कि सॅमसंग यावर्षीच्या शेवटीपर्यंत हि टेक्नॉलॉजी आपल्या सर्व नवीन फोन मध्ये उपलब्ध करेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए70 मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 32एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 32-मेगापिक्सल सेंसर प्राइमरी आहे जो 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग कॅमेरा सह येतो.

सध्या कंपनी ने गॅलेक्सी ए70 ची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती दिली नाही. तसेच कंपनी 10 एप्रिलला एका इवेंटचे आयोजन करणार आहे, ज्याबद्दल काही दिवसांपूर्वी ऑफिशियल ट्विटर हँडेल वरून ट्विट करण्यात आले होते. इवेंट कुठे होईल याची माहिती समोर आलेली नाही. पण अशा आहे कि या इवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीज ग्लोबली सादर केली जाईल.

विशेष म्हणजे गॅलेक्सी ए सीरीजचा गॅलेक्सी ए90 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी यूके मध्ये कंपनीच्या आफिशियल वेबसाइट वर दिसला होता. लीकनुसार या स्मार्टफोन मध्ये ‘स्लाइडिंग एंड रोटेटिंग कॅमेरा सिस्टम’ असू शकते. तसेच स्टीव नामक एका टिप्सटर ने ट्विटर वर सांगितले कि गॅलेक्सी ए90 मध्ये ओपो फाइंड एक्स प्रमाणे रोटेटिंग कॅमेरा असेल. पण टिप्सटर ने हि बातमी निश्चित नाही असे देखील सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here