2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा

नोकिया ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगातील पहिला पेंटा कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 5 रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ईशारा केला आहे कि हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येईल. दुसरीकडे नोकियाच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. बातमी अशी आहे कि एचएमडी ग्लोबल येत्या 2 एप्रिलला अंर्तराष्ट्रीय मंचावर नवीन स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे जो नोकिया एक्स71 नावाने येईल. हा स्मार्टफोन सर्वात आधी ताईवान मध्ये लॉन्च केला जाईल जो नंतर इतर बाजारांत येईल.

लॉन्च डिटेल
एचएमडी ग्लोबल ने तैवान मध्ये मीडिया इन्वाईट शेयर करत नवीन प्रोडक्ट लॉन्चची माहिती दिली आहे. कंपनीने मीडिया इन्वाईट मध्ये सांगितले आहे कि येत्या 2 एप्रिलला एचएमडी ग्लोबल नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया एक्स71 तैवान मध्ये लॉन्च करेल. नोकिया एक्स71 सोबत कंपनी या ईवेंट मध्ये नोकिया 9 प्योरव्यू पण लॉन्च करेल. विशेष म्हणजे तैवान मध्ये नोकिया 9 प्योरव्यूची लॉन्च डेट समोर आल्यानंतर कंपनीच्या इंडियन फॅन्स पण उत्साहित झाले आहेत आणि एप्रिल मध्ये नोकिया 9 प्योरव्यू भारतीय बाजारात येईल असे त्यांना वाटू लागले आहे.

नोकिया एक्स71
नोकिया एक्स71 च्या लॉन्च डेट सोबत एचएमडी ग्लोबल ने फोनच्या काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत. नोकियाचा हा आगामी स्मार्टफोन फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये खूप असणार आहे. कंपनी ने सांगितले आहे कि नोकिया एक्स71 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक सुपर वाईड-एंगल लेंस पण दिली जाईल जी 120-डिग्रीचा वाईड शॉट घेऊ शकेल.

शाओमी घेऊन येत आहे ताकदवान 5जी फोन मी मिक्स 4, ट्रिपल कॅमेर्‍या सह असेल स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर

नोकिया एक्स71 बद्दल समोर आलेल्या इतर बातम्या आणि लीक्स पाहता हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फोन मध्ये जर पंच-होल डिस्प्ले दिला गेला तर नोकिया एक्स71 कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो या डिजाईन सह सादर होईल. अलीकडेच सॅमसंग ने पण आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्मार्टफोन्स पंच-होल डिस्प्ले सह सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी नोकियाचा आगामी डिवाईस एनसीसी वेबसाइट वर टीए-1167 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. बोलले जात आहे कि नोकिया एक्स71 तोच मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन आहे.

नोकिया 9 प्योरव्यू
नोकिया 9 प्योरव्यू बद्दल बोलायचे तर हा जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन आहे. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here