शाओमी घेऊन येत आहे ताकदवान 5जी फोन मी मिक्स 4, ट्रिपल कॅमेर्‍या सह असेल स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर

शाओमी यावर्षी आपला 5जी फोन आणण्याची तयारी करत आहे. हा फोन मी मिक्स 3 असेल ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. काही दिवसांपूर्वी क्वालकॉमच्या ईवेंट मध्ये पण शाओमी मी मिक्स 3 दिसला होता ज्या फोन मध्ये 5जी सपोर्ट होता. आता बातमी येत आहे फक्त मी मिक्स 3 नव्हे तर शाओमी दोन अजून 5जी स्मार्टफोन्स वर काम करत आहे. शाओमी चे हे फोन मी 9 आणि मी मिक्स 4 असतिल.

या वर्षी फेब्रुवारी मध्ये मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये शाओमी ने जागतिक मंचावर आपला 5जी स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन कंपनी ने मी मिक्स 3 नावाने सादर केला होता. आता या सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याबाबत कंपनी ने टीज करायाला सुरवात केली आहे.

चीनच्या माइक्रोब्लगिंग वेबसाइट वीबो वर शाओमी ने एक टीजर जारी केला आहे, ज्यावरून बोलले जात आहे की कंपनी लवकरच मी मिक्स 4 सादर करू शकते. वीबो वर एक फोटो शेयर केला गेला आहे. या फोटो मध्ये मी मिक्स सीरीजचा स्मार्टफोन दिसत आहे, ज्यात मी मिक्स, मी मिक्स 2 आणि मी मिक्स 3 सोबत अजुन एक मॉडेल आहे ज्याचे नाव आणि डिजाइन दाखविण्यात आली नाही. हा बघितल्यावर निश्चितपणे म्हणता येईल की हा फोन मी मिक्स मॉडेल अंर्तगत सादर केला जाईल.

शाओमीच्या अपकमिंग फोन मी मिक्स 4 बद्दल बोलले जात आहे की हा डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 855 एसओसी सह येईल. तसेच फोनची हाईलाइट मोठा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो असेल. शाओमी ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून आपला पहिला 5जी फोन सादर केला होता. शाओमी ने हा फोन मी मिक्स 3 आणला होता. फोनच्या 5जी कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट सह आला होता. क्वालकॉमचा हा चिपसेट 5जी नेटवर्क सपोर्ट सह येतो. तसेच या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात आला आहे जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी सपोर्ट देतो. विशेष म्हणजे शाओमी मी मिक्स 3 5जी फोन 2जीबीपीएस पर्यंतचा डाउनलोड स्पीड देऊ शकतो.

मी मिक्स 3 बद्दल बोलायचे तर अलीकडेच हा फोन बीजिंग मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट सोबत क्वालकॉम एक्स50 मॉडेमला सपोर्ट करतो आणि याच हार्डवेयर मुळे फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी उपलब्ध झाली आहे. चर्चा अशी होती कि शाओमी हा फोन यूरोपियन देशांत पण लॉन्च करेल आणि लवकरच मी मिक्स 3 ग्लोबल मार्केट मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here