OLA Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 14:41:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-s1-pro-discount-offer-test-ride-price-range/ https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-s1-pro-discount-offer-test-ride-price-range/#respond Thu, 01 Dec 2022 09:36:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15571 जर तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कूटी विकत घेण्याचा अनेकजण विचार करत आहेत, परंतु प्रत्यक्षात स्कूटर चालवता येत नसल्यामुळे टाळाटाळ केली जाते. यावर उपाय म्हणून कंपनीनं काही दिवसांपूर्वीच देशातील 11 शहरांमध्ये 14 नवीन एक्सपीरियंस सेंटर सुरु केले आहेत, जिथे Electric Scooter खरेदी करण्यापूर्वी जाऊन बघता येईल. तसेच कंपनीनं दिवाळी दरम्यान सादर केलेली फेस्टिव सीजन ऑफर (OLA Electric […]

The post 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कूटी विकत घेण्याचा अनेकजण विचार करत आहेत, परंतु प्रत्यक्षात स्कूटर चालवता येत नसल्यामुळे टाळाटाळ केली जाते. यावर उपाय म्हणून कंपनीनं काही दिवसांपूर्वीच देशातील 11 शहरांमध्ये 14 नवीन एक्सपीरियंस सेंटर सुरु केले आहेत, जिथे Electric Scooter खरेदी करण्यापूर्वी जाऊन बघता येईल. तसेच कंपनीनं दिवाळी दरम्यान सादर केलेली फेस्टिव सीजन ऑफर (OLA Electric Discount Offer) 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ या ऑफर अंतगर्त ग्राहक ओला एस1 प्रो 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह निवडक एक्सपीरियंस सेंटरच्या माध्यमातून 7 दिवसांच्या डिलिव्हरीसह विकत घेता येईल.

या शहरांमध्ये ओपन झाले एक्सपीरिंयस सेंटर

ओला इलेक्ट्रिकनं आपल्या एक्सपीरियंस सेंटरच्या मदतीनं संपूर्ण भारतात 1 लाख पेक्षा जास्त ग्राहकांना टेस्ट राइड देत आहे. कंपनीनं बँगलोरमध्ये 3, पुण्यात 2 आणि अहमदाबाद, भोपाल, देहरादून, दिल्ली, हैद्राबाद, कोटा, नागपुर, रांची आणि वडोदरामध्ये एक-एक एक्सपीरियंस सेंटर ओपन केले आहेत. ग्राहक इथे जाऊन कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेऊ शकतात. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! 6000mAh ची राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; किंमत सर्वाना परवडणारी

ओला एक्सीपिरयंस सेंटरचे बेनिफिट्स

एक्सीपिरंयस सेंटरचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. या सेंटरच्या माध्यमातून तुम्ही ओलाची ईव्ही टेक्नॉलॉजी चेक करू शकता. तसेच स्कूटर संबंधित कोणतीही माहिती स्टोरमधील कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून घेऊ शकता. इतकेच नव्हे तर ग्राहक S1 आणि S1 Pro ची टेस्ट राइडचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे ग्राहक खरेदी करण्यापूर्वी ई-स्कूटर चालवताना कशी वाटते हे जाणून घेऊ शकतील. तसेच ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर फायनान्स संबंधित आवश्यक माहिती देखील सेंटरवर मिळेल.

OLA Electric Scooter च्या नावावर होतेय फसवणूक

OLA Scooter च्या बुकिंगच्या नावावर फ्रॉड देखील होत आहे. अलीकडेच बातमी आली होती की सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. अशा आरोपीना दिल्ली पोलिसांनी अटक देखील केली आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या आत आला दणकट 5G Phone; 7GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

The post 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-s1-pro-discount-offer-test-ride-price-range/feed/ 0
500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/ https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/#respond Tue, 16 Aug 2022 05:59:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12229 गेल्यावर्षी OLA नं भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. आता कंपनीनं आपल्या नवीन कारची माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की ते 2024 मध्ये आपली पहिली OLA Electric Car सादर करणार आहेत आणि या कारची रेंज 500 किलोमीटर असेल. तसेच कंपनीनं कारचा पहिला ऑफिशियल टीजर व्हिडीओ देखील सादर केला आहे ज्यातून कारचा लुक जगासमोर […]

The post 500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी OLA नं भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. आता कंपनीनं आपल्या नवीन कारची माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की ते 2024 मध्ये आपली पहिली OLA Electric Car सादर करणार आहेत आणि या कारची रेंज 500 किलोमीटर असेल. तसेच कंपनीनं कारचा पहिला ऑफिशियल टीजर व्हिडीओ देखील सादर केला आहे ज्यातून कारचा लुक जगासमोर आला आहे.

व्हिडीओमध्ये ही कार लाल रंगात दिसली आहे आणि समोरच्या बाजूला एलईडी लाइट देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं हिला थोडा स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. इव्हेंट दरम्यान कंपनीचे सीईओ आणि को-फाउंडर भाविश अग्रवाल यांनी संगीत की, “ही भारतात बनलेली पहिली स्पोर्टी कार असेल. आमची कार भारतातील सर्वात फास्ट कार असेल आणि फक्त 4 सेकंदांत 0-100 पर्यंतच्या स्पीड गाठण्यास सक्षम असेल.”

तसेच त्यांनी पुढे सांगितलं की, “एकदा चार्ज झाल्यावर ही कार 500 मीटर पर्यंतची रेंज देऊ शकेल. तसेच यात तुम्हाला ऑल ग्लास रूफ मिळेल. ही कार ओलाच्या मूव ओएसवर आधारित असेल आणि यात तुम्हाला पावरफुल कंप्यूटर मिळेल ज्यात असिस्टेड ड्राईव्हिंग फिचर असेल. तसेच ही कार फक्त कीलेस नसून मोठ्या प्रमाणात हँडल लेस देखील असेल.”

अजूनतरी OLA Electric Car लाँच होण्यास थोडा वेळ आहे, परंतु या लुकमुळे कंपनीनं धुमाकूळ घातला आहे. पुढे दिलेल्या व्हिडीओमध्ये ही कार तुम्ही बघू शकता. हा व्हिडीओ खूप मोठा आहे परंतु कारच लुक तुम्ही 19 मिनट आणि 40 सेकंदांनी पाहू शकता.

अशी असेल ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर व्हिडीओनुसार ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन खूप फ्यूचरिस्टिक असेल. यात नवीन व लेटेस्ट फीचर्स सोबतच जास्त रेंज देखील दिली जाईल, अशी चर्चा आहे. ओला इलेक्ट्रिक कारमध्ये स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, स्लॉपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील्ज मिळतील. तर, फ्रंट ग्रिल्स आणि डोर हँडल्स मात्र मिळणार नाहीत. गेल्यावर्षी भाविश अग्रवाल यांनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या कॉन्सेप्ट इमेज शेयर केल्या होत्या.

आधी शेयर केलेले फोटोज पाहता ई-कारमध्ये एलईडी लाईट्स व्यतिरिक्त ही कार कॉम्पॅक्ट साईज केबिनमध्ये सादर केली जाऊ शकते. कारसह टॅबलेट सारखी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच कारमध्ये स्पोर्टी सीट्स आणि 360-डिग्री ग्लास पॅनल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केबिनमध्ये खूप जागा असल्याचा भास होईल. कंपनी कारमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स देऊ शकते.

The post 500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/feed/ 0