6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Infinix ब्रँडनं भारतात आपली बहुप्रतीक्षित Hot 20 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं Infinix Hot 20 5G आणि Infinix Hot 20 Play असे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत 12 5G बँड्सना सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. तर Infinix Hot 20 Play सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 6,000mAh Battery, MediaTek Helio G37, 7GB RAM आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Hot 20 Play Price

Infinix Hot 20 Play स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे, जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली असून, याची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा हँडसेट चाट कलर व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Luna Blue, Fantasy Purple, Aurora Green आणि Racing Black चा समावेश आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या आत आला दणकट 5G Phone; 7GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

Infinix Hot 20 Play Specifications

इनफिनिक्स हॉट 20 प्ले स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, 720 X 1640 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा एक पंच होल डिस्प्ले आहे, ज्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल मिळतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट, 450 नीट्स ब्राईटनेस, 1500:1 कलर कॉन्ट्रास्ट, 21:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि आय केयर मोडला सपोर्ट करतो.

Infinix Hot 20 Play अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4X 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 7GB रॅमची पावर मिळवता येईल. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 प्ले मध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ 1.8 अपर्चर असलेला 13MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय Samsung चा लो बजेट स्मार्टफोन; MediaTek चिपसेटसह होणार लाँच

सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस असे फिचर मिळतात. भारतात Infinix Hot 20 Play स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here