10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध

जर तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कूटी विकत घेण्याचा अनेकजण विचार करत आहेत, परंतु प्रत्यक्षात स्कूटर चालवता येत नसल्यामुळे टाळाटाळ केली जाते. यावर उपाय म्हणून कंपनीनं काही दिवसांपूर्वीच देशातील 11 शहरांमध्ये 14 नवीन एक्सपीरियंस सेंटर सुरु केले आहेत, जिथे Electric Scooter खरेदी करण्यापूर्वी जाऊन बघता येईल. तसेच कंपनीनं दिवाळी दरम्यान सादर केलेली फेस्टिव सीजन ऑफर (OLA Electric Discount Offer) 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ या ऑफर अंतगर्त ग्राहक ओला एस1 प्रो 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह निवडक एक्सपीरियंस सेंटरच्या माध्यमातून 7 दिवसांच्या डिलिव्हरीसह विकत घेता येईल.

या शहरांमध्ये ओपन झाले एक्सपीरिंयस सेंटर

ओला इलेक्ट्रिकनं आपल्या एक्सपीरियंस सेंटरच्या मदतीनं संपूर्ण भारतात 1 लाख पेक्षा जास्त ग्राहकांना टेस्ट राइड देत आहे. कंपनीनं बँगलोरमध्ये 3, पुण्यात 2 आणि अहमदाबाद, भोपाल, देहरादून, दिल्ली, हैद्राबाद, कोटा, नागपुर, रांची आणि वडोदरामध्ये एक-एक एक्सपीरियंस सेंटर ओपन केले आहेत. ग्राहक इथे जाऊन कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेऊ शकतात. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! 6000mAh ची राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; किंमत सर्वाना परवडणारी

ओला एक्सीपिरयंस सेंटरचे बेनिफिट्स

एक्सीपिरंयस सेंटरचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. या सेंटरच्या माध्यमातून तुम्ही ओलाची ईव्ही टेक्नॉलॉजी चेक करू शकता. तसेच स्कूटर संबंधित कोणतीही माहिती स्टोरमधील कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून घेऊ शकता. इतकेच नव्हे तर ग्राहक S1 आणि S1 Pro ची टेस्ट राइडचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे ग्राहक खरेदी करण्यापूर्वी ई-स्कूटर चालवताना कशी वाटते हे जाणून घेऊ शकतील. तसेच ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर फायनान्स संबंधित आवश्यक माहिती देखील सेंटरवर मिळेल.

OLA Electric Scooter च्या नावावर होतेय फसवणूक

OLA Scooter च्या बुकिंगच्या नावावर फ्रॉड देखील होत आहे. अलीकडेच बातमी आली होती की सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. अशा आरोपीना दिल्ली पोलिसांनी अटक देखील केली आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या आत आला दणकट 5G Phone; 7GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here