4GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

Infinix ब्रँडनं आज भारतीय चाहत्यांना खुश करत आपली Hot 20 सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजमधील सर्वात स्वस्त 5G Phone भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत सादर केला आहे. इतकी कमी किंमत असून देखील हा स्मार्टफोन 12 5G बँड्सना सपोर्ट करतो, असे खूप कमी फोन्स या बजेटमध्ये आहेत. Infinix Hot 20 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh Battery, Mediatek Dimensity 810 आणि 120Hz रिफ्रेश रेट असे दमदार फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Hot 20 5G Price

Infinix Hot 20 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 11,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल, जिथे काही दिवसांपूर्वी हा फोन लिस्ट देखील करण्यात आला होता. हा हँडसेट तीन कलर व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Space Blue, Blaster Green आणि Racing Black चा समावेश आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय Samsung चा लो बजेट स्मार्टफोन; MediaTek चिपसेटसह होणार लाँच

Infinix Hot 20 5G Specifications

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा इनफिनिक्स मोबाइल 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येते जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

Infinix Hot 20 5G फोन 12 5G bands ना सपोर्ट करतो. इतके 5G बँड्स असलेला हा या बजेटमधील एकमेव स्मार्टफोन आहे असा दावा कंपनीनं केला आहे. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 7GB रॅमची पावर मिळवता येईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 325 रुपयांमध्ये घरी आणा रेडमीचा ए वन फोन! स्वस्तात मिळतेय दिवसभर टिकणारी 5000mAh ची बॅटरी

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. भारतात Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here