Oppo F9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Oct 2018 13:25:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 13:25:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2626 ताज्या फोटो मध्ये ओपो ए7 कंपनी ने भारतात लॉन्च केलेल्या एफ9 प्रो सारखा दाखवण्यात आला आहे.

The post वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो अपनी ‘ए सीरीज’ मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी आहे आणि हा फोन ओपो ए7 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. ओपो ए7 बद्दल आधीपण अनेक ​लीक्स आले आहेत ज्यात फोनची टेना लिस्टिंग व वाईफाई तसेच ब्लूटूथ सर्टिफिकेशन्सचा समावेश आहे. तर आज एका ताजा लीक मध्ये ओपो ए7 ची रेंडर ईमेज समोर आली आहे. हा फोटो लीक झाल्यामुळे एकीकडे ओपो ए7 च्या लुक आणि याच्या डिजाईनची माहिती स्पष्ट झाली आहे तर दुसरीकडे हा फोन लवकरच जगासमोर येणार याची शक्यता वाढली आहे.

ओपो ए7 संबंधित हा नवीन लीक माय स्मार्ट प्राइस कडून आला आहे. नवीन लीक मध्ये ओपो ए7 चा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. ताज्या फोटो मध्ये ओपो ए7 कंपनी ने भारतात लॉन्च केलेल्या एफ9 प्रो सारखा दाखवण्यात आला आहे. हा फोन पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच डिस्प्ले वर ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन आणि डाव्या पॅनल वर वॉल्यूम दिसत आहे.

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वॉल 6.2-इंचाचा एचडी+​ डिस्प्ले मिळेल जो 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 सह सादर केला जाईल ताईच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल.

ओपो ए7 बद्दल आलेल्या या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी आपला आगामी फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर करू शकते ज्यात 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम असेल. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतील जी माइक्रोएसडी कार्ड नवे वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहत लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील . तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

ओपो ए7 स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करेल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी असेल. तसेच लीक मध्ये फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर प्रश्नचिन्ह आहे. कंपनी कडून अजून ओपो ए7 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती देण्यात आली नाही पण बोलले जात आहे कि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओपो आपला आपला नवीन फोन जगासमोर आणेल.

The post वॉटरड्रॉप नॉच असलेल्या ओपो ए7 चा फोटो लीक, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-photo-leaked-with-water-drop-notch-display-specifications-feature-in-marathi/feed/ 0
ओपो ने लॉन्च केला वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला ए7एक्स, स्टाइलिश डिजाईन सह दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-official-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-official-feature-specification-price-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 12:36:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2009 फोन ची किंमत 2099 युआन म्हणजे जवळपास 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे जो 14 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post ओपो ने लॉन्च केला वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला ए7एक्स, स्टाइलिश डिजाईन सह दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ए7एक्स बद्दल आज सकाळीच आम्ही बातमी दिली होती ज्यात या फोन संबधित माहिती देण्यात आली होती. फोन लीक झाल्यानंतर काही वेळाने कंपनी ने हा आॅफिशियल केला आहे. ओपो ने ए7एक्स चा कोणताही लॉन्च ईवेंट केला नाही तर सरळ हा कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर किंमती सह लिस्ट करून हा आॅफिशियल केला आहे. ओपो ने आपल्या अधिकृत चीनी वेबसाइट च्या माध्यमातून ओपो ए7एक्स स्मार्टफोन टेक बाजारात आणला आहे. फोन ची किंमत 2099 युआन म्हणजे जवळपास 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे जो 14 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो ए7एक्स चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ओपो एफ9 प्रो प्रमाणे ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो ने हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर केला आहे तसेच हा 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने ओपो ए7एक्स 4जीबी रॅम सह सादर केला आहे तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ग्राफिक्स साठी हा फोन माली जी72 जीपीयू ला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

ओपो ए7एक्स च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. ओपो ए7एक्स मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी आहे. ओपो चा हा नवीन फोन स्टार पर्पल आणि आइस फ्लेम ब्लू कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो भारतीय करंसी नुसार जवळपास 22000 रुपयांच्या किंमतीत चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post ओपो ने लॉन्च केला वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला ए7एक्स, स्टाइलिश डिजाईन सह दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-official-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
ओपो ने लॉन्च केला भारतात पहिला ‘वी’ नॉच वाला स्मार्टफोन एफ9 प्रो, यात आहे 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-launched-in-india-feature-specification-price-sale-offers-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-launched-in-india-feature-specification-price-sale-offers-in-marathi/#respond Tue, 21 Aug 2018 09:09:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1766 ओपो एफ9 प्रो भारतात 23,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर ओपो एफ9 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post ओपो ने लॉन्च केला भारतात पहिला ‘वी’ नॉच वाला स्मार्टफोन एफ9 प्रो, यात आहे 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने गेल्या काही दिवसांपासून इं​डियन स्मार्टफोन यूजर्स ची उत्सुकता वाढवली आहे. ओपो ने जेव्हा पासून एफ9 प्रो च्या लॉन्च ची घोषणा केली आहे तेव्हा पासून इंडियन टेक मार्केट मध्ये या फोनची वाट बघितली जात आहे. ही प्रतीक्षा संपवत ओपो इंडिया ने देशात पहिला ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन एफ9 प्रो लॉन्च केला आहे. ओपो फॅन्सना सरप्राइज देत ओपो ने देशात ओपो एफ9 स्मार्टफोन पण सादर केला आहे.

डिजाईन
ओपो एफ9 प्रो मध्ये तसे पाहता अनेक फीचर्स आहेत पण सर्वात मोठी खासियत आहे या फोनचा नॉच डिस्प्ले. आता पर्यंत स्क्वायर साइज ची नॉच मिळत होती पण ओपो एफ9 प्रो ची नॉच ‘वी’ शेप ची आहे. कंपनी ने या नॉचला ‘वॉटरमार्क नॉच’ चे नाव दिले आहे. हा फोन 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह सादर करण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही तर बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे.

डिस्प्ले
फोन मध्ये 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारा पहिला फोन आहे ज्याला या ग्रेड चे प्रोटेक्शन मिळाले आहे.

सॉफ्टवेयर
ओपो एफ9 प्रो एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये कंपनी ची आॅपरेटिंग सिस्टम कलरओएस 5.2 आहे जी वेगवेगळ्या थीम्स द्वारे फोन चा वापर आर्कषक आणि सोप्पा बनवतो. येत्या काही दिवसांत एफ9 प्रो ला एंडरॉयड पाई चा अपडेट पण मिळेल.

हॉर्डवेयर
ओपो एफ9 प्रो मध्ये 12एनएम 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर ​देण्यात आला आहे सोबतच हा फोन मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू असेल.

रॅम व स्टोरेज
ओपो ने एफ9 प्रो 6जीबी च्या ताकदवान रॅम सह भारतात लॉन्च केला आहे. तर फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तर ओपो एफ9 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी
ओपो एफ9 प्रो डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/1.85 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो ज्यात एआई फीचर आहे. तर ओपो एफ9 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी व फीचर
ओपो एफ9 प्रो च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

बॅटरी
ओपो एफ9 प्रो मध्ये कंपनी ने वीओओसी फ्लॅश चार्ज सपोर्ट दिला आहे. या फीचर मुळे हा फोन 5 ​मिनिटांच्या चार्ज मध्ये 2 तासांचा बॅकअप देतो. फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट ने चार्ज करता येईल.

किंमत
ओपो एफ9 प्रो सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रारी पर्पल मध्ये विकत घेता येईल. ओपो एफ9 प्रो भारतात 23,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर ओपो एफ9 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ओपो चे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 31 अगस्त पासून विकत घेता येतील.

The post ओपो ने लॉन्च केला भारतात पहिला ‘वी’ नॉच वाला स्मार्टफोन एफ9 प्रो, यात आहे 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-launched-in-india-feature-specification-price-sale-offers-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x23-pre-booking-official-website-china-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x23-pre-booking-official-website-china-features-specifications-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 09:41:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1754 वीवो एक्स23 मध्ये पहिल्या मॉडेल प्रमाणे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या फोनची खासियत म्हणजे फोन मधील ‘वी’ शेप वाली ​नॉच जी डिस्प्ले वर खुप कमी जागा घेईल.

The post 8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो च्या आगामी स्मार्टफोन एक्स23 बद्दल गेल्या आठवड्यात एक लीक समोर आला होता ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली होती. या लीक नंतर स्पष्ट झाले की वीवो एक्स21 चा नेक्स्ट जेनेरेशन स्मार्टफोन एक्स24 नावाने सादर केला जाईल. आता वीवो च्या आॅफिशियल चीनी वेबसाइट वर पण हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. वीवो एक्स23 कंपनी ची वेबसाइट वर दिसल्यामुळे फक्त फोन च्या लॉन्च ची माहिती समोर आली नाही तर या लिस्टिंग मधून फोन चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

वीवो एक्स23 मध्ये पहिल्या मॉडेल प्रमाणे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या फोनची खासियत म्हणजे फोन मधील ‘वी’ शेप वाली ​नॉच जी डिस्प्ले वर खुप कमी जागा घेईल. वीवो एक्स23 च्या चारही बाजूंनी खुप बारीक बेजल देण्यात येतील. या फोन मध्ये 6.4-इंचाचा एमोलेड फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.2 प्रतिशत असेल.

वीवो एक्स23 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 ओएस वर सादर करण्यात येईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालेल. कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम देईल. वीवो आपला हा हाईएंड फ्लॅगशिप फोन एका पेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. कॅमेरा मेगापिक्सल ची माहिती मात्र अजूनही समोर आली नाही पण असे समजले आहे की एलईडी फ्लॅश असलेला हा कॅमेरा सेटअप एआई टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल तसेच वाईड-एंगल फोटोग्राफी मध्ये पण सक्षम असेल. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील सेल्फी कॅमेरा मध्ये पण 3डी फेशिअल रेक्ग्नेशन टेक्नोलॉजी असेल.

वीवो एक्स23 साठी कंपनी ने वीवो चाइना च्या आॅफिशियल वेबसाइट वर प्री-बुकिंग सुरू केली आहे. पण कंपनी ने अजूनही फोन ची लॉन्च तारीख सांगितली नाही. लक्षात असू दे उद्या ओपो भारतात ‘वी’ नॉच वाला फोन एफ9 प्रो लॉन्च करणार आहे. त्यामुळे कदाचित वीवो पण लवकरच आपला हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च करू शकते.

The post 8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x23-pre-booking-official-website-china-features-specifications-in-marathi/feed/ 0
ओपो एफ9 प्रो 21 ऑगस्टला होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-in-india-on-21-august-media-invite-sent-by-oppo-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-in-india-on-21-august-media-invite-sent-by-oppo-india-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 08:42:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1643 ओपो ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द ब्रेकिंग न्यू विजन’ टॅग लाईन वापरली आहे.

The post ओपो एफ9 प्रो 21 ऑगस्टला होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने गेल्या आठवड्यात आपल्या सोशल मीडिया प्लॅटफार्म वरून सुचना दिली होती की कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ मधील नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच भारतात एफ9 प्रो नावाने लॉन्च केला जाईल. ओपो एफ9 प्रो बद्दल अनेक टीजर व ईमेज इंटरनेट वर शेयर करण्यात आले होते. तसेच आज कंपनी ने फोन ची लॉन्च डेट पण सांगितली आहे. ओपो इंडिया ने आॅफिशियल केले आहे की एफ9 प्रो भारतात 21 ऑगस्टला लॉन्च केला जाईल.

ओपो इंडिया ने मीडिया इन्वाईट शेयर करून माहिती दिली आहे की कंपनी 21 ऑगस्टला मुंबई मध्ये एका ईवेंट चे आयोजन करत आहे आणि या ईवेंट च्या माध्यमातून कपंनी आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणेल. ओपो इंडिया ने या इन्वाईट मध्ये एफ9 प्रो च्या नावाचा उल्लेख केला नाही पण सूत्रांकडून ही माहिती स्पष्ट झाली आहे की 21 ऑगस्टला भरतात लॉन्च होणारा ओपो चा फोन एफ9 प्रो असेल. ओपो ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द ब्रेकिंग न्यू विजन’ टॅग लाईन वापरली आहे.

​ओपो एफ9 प्रो च्या फोटोज मध्ये स्पष्ट दिसत आहे की हा फोन बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्याच्या वरच्या बाजूला छोटा ‘वी’ शेप वाली नॉच आहे. हा फोन 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच कंपनी ने सांगितले आहे की पावर बॅकअप साठी ओपो एफ9 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि यूएसबी ओटीजी सह 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

ओपो एफ9 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कलरओएस 5.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा फोन 12एनएम 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी यात माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. भारतात हा फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह दोन वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच दोन्ही वेरिएंट मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.85 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात येईल. ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल.

ओपो एफ9 प्रो सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रेरी पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. ओपो एफ9 प्रो 29,990 रुपयांमध्ये भारतात येऊ शकतो असे बोलले जात आहे. पण फोन ची किंमत आणि याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व वेरिएंट्स साठी 21 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.

The post ओपो एफ9 प्रो 21 ऑगस्टला होईल भारतात लॉन्च, 6जीबी रॅम सह असेल डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-in-india-on-21-august-media-invite-sent-by-oppo-india-in-marathi/feed/ 0
15 ऑगस्टला लॉन्च होत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ9, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि भारतातील किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-on-15-august-in-vietnam-as-oppo-f9-with-features-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-on-15-august-in-vietnam-as-oppo-f9-with-features-specification-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 09:57:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1615 ओपो एफ9 वियतनाम मध्ये सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रेरी पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 15 ऑगस्टला लॉन्च होत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ9, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि भारतातील किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच भारतात एफ9 प्रो नावाने लॉन्च केला जाईल. ओपो ने अजूनतरी एफ9 प्रो च्या आॅफिशियल लॉन्च डेट चा खुलासा केला नाही पण भारतात ओपो एफ9 प्रो च्या लॉन्च च्या आधी अंर्तराष्ट्रीय बाजारात ओपो एफ9 च्या लॉन्च ची माहिती मिळाली आहे. बातमी अशी आहे की ओपो वियतनाम मध्ये पण एक नवीन फोन लॉन्च करणार आहे ज्याचे नाव एफ9 असेल. लीक वरून समजले आहे की वियतनाम मध्ये ओपो एफ9 स्मार्टफोन 15 ऑगस्टला लॉन्च केला जाईल आणि हा फोन एफ9 प्रो नावाने भारतात येईल.

ओपो एफ9 प्रो बद्दल काही दिवसांपूर्वी आम्ही एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात एफ9 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती देण्यात आली होती. तसेच वियतनाम मध्ये लॉन्च होणार्‍या एफ9 चे स्पेसिफिकेशन्स पण भारतात येणार्‍या एफ9 प्रो सारखे आहेत. रिपोर्ट नुसार ​ओपो एफ9 बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्याच्या वरच्या बाजूला छोटा ‘वी’ शेप वाली नॉच आहे. हा फोन 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल.

ओपो एफ9 म्हणजे एफ9 प्रो कलरओएस 5.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा फोन 12एनएम 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी यात माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. वियतनाम मध्ये हा फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह दोन वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच दोन्ही वेरिएंट मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.85 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात येईल. ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी ओपो एफ9 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि यूएसबी ओटीजी सह 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

ओपो एफ9 वियतनाम मध्ये सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रेरी पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे वियतनाम मध्ये हा फोन 15 ऑगस्टला लॉन्च केला जाईल. त्यामुळे ओपो इंडिया 15. ऑगस्टला भारतात पण एफ9 प्रो बद्दल मोठी घोषणा करू शकते. ओपो एफ9 प्रो 29,990 रुपयांमध्ये भारतात येऊ शकतो असे बोलले जात आहे. फोन ची आॅफिशियल इंडिया लॉन्च डेट ची तारीख लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल.

The post 15 ऑगस्टला लॉन्च होत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ9, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि भारतातील किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-pro-to-launch-on-15-august-in-vietnam-as-oppo-f9-with-features-specification-price-in-marathi/feed/ 0
अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 11:06:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1611 विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या आगामी स्मार्टफोन आर17 आणि आर17 प्रो बद्दल खुप दिवस झाले लीक्स येत आहेत. पण आता चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर पण ओपो चा हा आगामी स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण आहे. टेना लिस्टिंग वरून दोन्ही फोन च्या डिजाईन आणि लुक सह फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

टेना वर ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण लिस्ट करण्यात आला आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स असतील. ओपो आर17 प्रो मध्ये फ्रंट पॅनल वर अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर मिळू शकतो तर ओपो आर17 मध्ये कंपनी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. लीक नुसार फिंगर​प्रिंट सेंसर च्या प्लेसमेंट व्यतिरिक्त दोन्ही मॉडेल्स चे स्पेसिफिकेशन्स सारखे असतील.

ओपो आर17 व आर17 प्रो ला कंपनी मोठया ऐज टू ऐज बेजल लेस डिसप्ले सह सादर करू शकते. या फोन च्या फ्रंट पॅनल वर चारही बाजूंना बारीक बेजल्स असतील वरच्या बाजूला वी शेप मधील छोटीशी नॉच असेल. दोन्ही फोन मॉडल्स मध्ये 6.3-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. टेना नुसार हा फोन वाटरप्रूफ पण असू शकतो.

ओपो आपला हा आगामी फोन ग्लास डिजाईन वर सादर करू शकते. याच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो एलईडी फ्लॅश सह येईल दोन्ही मॉडेल्स च्या रॅम व प्रोसेसर ची माहिती या लिस्टिंग मधून मिळाली नाही पण असे सांगण्यात आले आहे की पावर बॅकअप साठी यात वीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 3,415एमएच ची बॅटरी मिळू शकते.

विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात. त्यामुळे लवकरच भारतात येणारा एफ9 प्रो अं​डर डिस्प्ले फिं​गरप्रिंट सेंसर सह येतो की नाही हे बघावे लागेल.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : ओपो एफ9 प्रो फुल स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 25एमपी सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f9-pro-full-specification-feature-design-before-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f9-pro-full-specification-feature-design-before-launch-in-marathi/#respond Tue, 31 Jul 2018 13:00:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1471 फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नसेल तसेच वरच्या बाजूला ‘V’ आकाराची नॉच असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा सेंसर असेल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ9 प्रो फुल स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 25एमपी सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने काही दिवसांपूर्वी आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी भारतात लवकरच आपला नवीन स्मार्टफोन एफ9 प्रो नावाने लॉन्च करणार आहे. ओपो एफ9 प्रो च्या आॅफिशियल घोषणा सोबत कंपनी ने फेसबुक पेज वर फोनचे फोटो शेयर केले होते ज्यावरून फोन च्या डिजाईन आणि याच्या ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले ची माहिती मिळाली होती. फोटो सोबतच ओपो इंडिया ने एफ9 प्रो स्मार्टफोन मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज सपोर्ट देणार असल्याचे सांगितले होते. आज फोन लॉन्च च्या आधी 91मोबाईल्स एफ9 प्रो स्मार्टफोन बद्दल एक्सक्लूसिव माहिती घेऊन आला आहे ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे.

91मोबाईल्स ने माहिती मिळवली आहे की ओपो एफ9 प्रो 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या बेजल लेस फुलव्यू आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नसेल तसेच वरच्या बाजूला ‘V’ आकाराची नॉच असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. डिस्प्ले च्या प्रोटेक्शन साठी कंपनी याला गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट करेल.

ओपो एफ9 प्रो एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच हा 2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. कंपनी या फोन मध्ये 6जीबी रॅम देईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो एफ9 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोन च्या रियल पॅनल वरील दोन्ही कॅमेरा सेंसर 16-मेगापिक्सल चे असतील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात येईल.

ओपो एफ9 प्रो च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल. हा एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी ओपो एफ9 प्रो ला वीओओसी फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

पण ओपो ने अजूनतरी एफ9 प्रो च्या इंडिया लॉन्च च्या तारखेचा खुलासा केला नाही तसेच कंपनी ने फोन चे स्पेसिफिकेशन्स पण जगासमोर ठेवले नाहीत. ओपो एफ9 प्रो च्या आॅफिशियल लॉन्च डेट ची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ9 प्रो फुल स्पेसिफिकेशन्स, 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 25एमपी सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f9-pro-full-specification-feature-design-before-launch-in-marathi/feed/ 0
ओपो घेऊन येत आहे असा फोन ज्याचा डिस्प्ले आहे आयफोन पेक्षा पण बेस्ट, फक्त 5 मिनिटांच्या चार्ज नंतर वापरता येईल 2 तास https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-to-launch-in-india-with-v-shaped-notch-display-and-vooc-charging-support-teaser-out-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-to-launch-in-india-with-v-shaped-notch-display-and-vooc-charging-support-teaser-out-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 09:21:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1450 ओपो इंडिया ने हे कन्फर्म केले आहे की कंपनी एफ9 प्रो ला वीओओसी फ्लॅश चार्ज फीचर सह लॉन्च करेल ज्यामुळे फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये हा फोन 2 तासांचा टॉकटाईम देऊ शकेल.

The post ओपो घेऊन येत आहे असा फोन ज्याचा डिस्प्ले आहे आयफोन पेक्षा पण बेस्ट, फक्त 5 मिनिटांच्या चार्ज नंतर वापरता येईल 2 तास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या आगामी स्मार्टफोन एफ9 प्रो बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती ज्यात फोन ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता. सर्टिफिकेशन्स साइट च्या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे की ओपो लवकरच आपला हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर करेल. या लिस्टिंग च्या एका आठवड्यानंतर आज ओपो इंडिया ने एफ9 प्रो बद्दल ट्वीट केले आहे. कंपनी ने घोषणा केली आहे की कंपनी लवकरच एफ9 प्रो भारतीय बाजारात आणणार आहे.

ओपो इंडिया ने एफ9 प्रो च्या भारतातील लॉन्च ची माहिती कंपनी च्या आॅफिशियल ट्वीटर अकाउंट वरून दिली आहे. ओपो इंडिया ने ट्वीटर वर एक टीजर शेयर केला आहे ज्यात ‘ओपो एफ9 प्रो कमिंग सून’ लिहिण्यात आले आहे. 7 सेकेंड्स च्या या टीजर मध्ये एक स्मार्टफोन पाण्यात दाखविण्यात आला आहे. टीजर मधील स्मार्टफोन मध्ये फुलव्यू डिसप्ले सोबत ‘V’ शेप ची छोटीशी नॉच दिसत आहे.

ओपो ने ट्वीटर सोबतच सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वर पण कवर फोटो अपलोड केला आहे. या फोटो मध्ये फोन चा फ्रंट तसेच बॅक पॅनल स्पष्ट दाखवण्यात आला आहे. फोन च्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा पूर्णपणे बेजल लेस आहे तसेच वरच्या बाजूल वी शेप वाली नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बारीक बेजल देण्यात आले आहेत.

ओपो एफ9 प्रो च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत हॉरिजेंटल शेप मधे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो पण या फोटो मध्ये तो दिसला नाही. फोन च्या डाव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहेत. फोन च्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे तसेच चार्जिंग व डाटा ट्रांसफर साठी यूएसबी टाईप सी पोर्ट दाखविण्यात आला आहे.

ओपो इंडिया ने हे कन्फर्म केले आहे की कंपनी एफ9 प्रो ला वीओओसी फ्लॅश चार्ज फीचर सह लॉन्च करेल ज्यामुळे फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये हा फोन 2 तासांचा टॉकटाईम देऊ शकेल. समोर आलेल्या फोटो मध्ये ओपो एफ9 प्रो रेड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर ओपो एफ9 प्रो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी वाला सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

ओपो ने अजूनपर्यंत एफ9 प्रो च्या इंडिया लॉन्च च्या तारखेचा खुलासा केला नाही आणि फोन च्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्स चा पण उल्लेख केला नाही. पण भारतातील फॅन फॉलोइंग पाहता कंपनी लवकरच आपला हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते.

The post ओपो घेऊन येत आहे असा फोन ज्याचा डिस्प्ले आहे आयफोन पेक्षा पण बेस्ट, फक्त 5 मिनिटांच्या चार्ज नंतर वापरता येईल 2 तास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f9-to-launch-in-india-with-v-shaped-notch-display-and-vooc-charging-support-teaser-out-in-marathi/feed/ 0