ओपो ने लॉन्च केला भारतात पहिला ‘वी’ नॉच वाला स्मार्टफोन एफ9 प्रो, यात आहे 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा

ओपो ने गेल्या काही दिवसांपासून इं​डियन स्मार्टफोन यूजर्स ची उत्सुकता वाढवली आहे. ओपो ने जेव्हा पासून एफ9 प्रो च्या लॉन्च ची घोषणा केली आहे तेव्हा पासून इंडियन टेक मार्केट मध्ये या फोनची वाट बघितली जात आहे. ही प्रतीक्षा संपवत ओपो इंडिया ने देशात पहिला ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन एफ9 प्रो लॉन्च केला आहे. ओपो फॅन्सना सरप्राइज देत ओपो ने देशात ओपो एफ9 स्मार्टफोन पण सादर केला आहे.

डिजाईन
ओपो एफ9 प्रो मध्ये तसे पाहता अनेक फीचर्स आहेत पण सर्वात मोठी खासियत आहे या फोनचा नॉच डिस्प्ले. आता पर्यंत स्क्वायर साइज ची नॉच मिळत होती पण ओपो एफ9 प्रो ची नॉच ‘वी’ शेप ची आहे. कंपनी ने या नॉचला ‘वॉटरमार्क नॉच’ चे नाव दिले आहे. हा फोन 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह सादर करण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही तर बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे.

डिस्प्ले
फोन मध्ये 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारा पहिला फोन आहे ज्याला या ग्रेड चे प्रोटेक्शन मिळाले आहे.

सॉफ्टवेयर
ओपो एफ9 प्रो एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये कंपनी ची आॅपरेटिंग सिस्टम कलरओएस 5.2 आहे जी वेगवेगळ्या थीम्स द्वारे फोन चा वापर आर्कषक आणि सोप्पा बनवतो. येत्या काही दिवसांत एफ9 प्रो ला एंडरॉयड पाई चा अपडेट पण मिळेल.

हॉर्डवेयर
ओपो एफ9 प्रो मध्ये 12एनएम 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर ​देण्यात आला आहे सोबतच हा फोन मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू असेल.

रॅम व स्टोरेज
ओपो ने एफ9 प्रो 6जीबी च्या ताकदवान रॅम सह भारतात लॉन्च केला आहे. तर फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तर ओपो एफ9 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी
ओपो एफ9 प्रो डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/1.85 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो ज्यात एआई फीचर आहे. तर ओपो एफ9 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी व फीचर
ओपो एफ9 प्रो च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

बॅटरी
ओपो एफ9 प्रो मध्ये कंपनी ने वीओओसी फ्लॅश चार्ज सपोर्ट दिला आहे. या फीचर मुळे हा फोन 5 ​मिनिटांच्या चार्ज मध्ये 2 तासांचा बॅकअप देतो. फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट ने चार्ज करता येईल.

किंमत
ओपो एफ9 प्रो सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रारी पर्पल मध्ये विकत घेता येईल. ओपो एफ9 प्रो भारतात 23,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर ओपो एफ9 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ओपो चे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 31 अगस्त पासून विकत घेता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here