15 ऑगस्टला लॉन्च होत आहे 6जीबी रॅम वाला ओपो एफ9, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि भारतातील किंमत

ओपो ने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच भारतात एफ9 प्रो नावाने लॉन्च केला जाईल. ओपो ने अजूनतरी एफ9 प्रो च्या आॅफिशियल लॉन्च डेट चा खुलासा केला नाही पण भारतात ओपो एफ9 प्रो च्या लॉन्च च्या आधी अंर्तराष्ट्रीय बाजारात ओपो एफ9 च्या लॉन्च ची माहिती मिळाली आहे. बातमी अशी आहे की ओपो वियतनाम मध्ये पण एक नवीन फोन लॉन्च करणार आहे ज्याचे नाव एफ9 असेल. लीक वरून समजले आहे की वियतनाम मध्ये ओपो एफ9 स्मार्टफोन 15 ऑगस्टला लॉन्च केला जाईल आणि हा फोन एफ9 प्रो नावाने भारतात येईल.

ओपो एफ9 प्रो बद्दल काही दिवसांपूर्वी आम्ही एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात एफ9 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती देण्यात आली होती. तसेच वियतनाम मध्ये लॉन्च होणार्‍या एफ9 चे स्पेसिफिकेशन्स पण भारतात येणार्‍या एफ9 प्रो सारखे आहेत. रिपोर्ट नुसार ​ओपो एफ9 बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्याच्या वरच्या बाजूला छोटा ‘वी’ शेप वाली नॉच आहे. हा फोन 1080 X 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल.

ओपो एफ9 म्हणजे एफ9 प्रो कलरओएस 5.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा फोन 12एनएम 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी यात माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. वियतनाम मध्ये हा फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह दोन वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच दोन्ही वेरिएंट मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.85 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात येईल. ओपो एफ9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी ओपो एफ9 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि यूएसबी ओटीजी सह 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

ओपो एफ9 वियतनाम मध्ये सनराईज रेड, ट्वाइलाईट ब्लू आणि स्ट्रेरी पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे वियतनाम मध्ये हा फोन 15 ऑगस्टला लॉन्च केला जाईल. त्यामुळे ओपो इंडिया 15. ऑगस्टला भारतात पण एफ9 प्रो बद्दल मोठी घोषणा करू शकते. ओपो एफ9 प्रो 29,990 रुपयांमध्ये भारतात येऊ शकतो असे बोलले जात आहे. फोन ची आॅफिशियल इंडिया लॉन्च डेट ची तारीख लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here