Oppo K1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jun 2019 12:49:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo K1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-price-cut-in-india/#respond Thu, 06 Jun 2019 12:49:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4507 जर तुम्ही ऍक्सिस बँकेचे कार्ड होल्डर असाल तर तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट पण मिळू शकतो.

The post Oppo K1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने अलीकडेच F11 Pro सोबत Oppo A5 ची किंमत पण कमी केली होती. आता समोर आलेल्या माहिती नुसार कंपनीने आपल्या इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असलेल्या Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. लॉन्च नंतर या हँडसेटची किंमत पहिल्यांदा कमी करण्यात आली आहे.

दमदार स्पेसिफिकेशन्स सोबतच ओपो ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉटरड्रॉप नॉच सारख्या शानदार फीचर्स ने सुसज्ज केला आहे. कंपनीने हा फोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता 2,000 रुपयांच्या कपातीनंतर हा 14,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. हँडसेट नवीन किंमतीत एक्सक्लूसिव फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

ऑफर्स
फ्लिपकार्ट वर हा फोन 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या फोन वर 13,570 रुपत्यांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. इतकेच नव्हे तर जर तुम्ही ऍक्सिस बँकेचे कार्ड होल्डर असाल तर तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट पण मिळू शकतो.

Oppo K1 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo K1 कपंनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. ओपो ने हा फोन एंडरॉयड 8.1 आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला आहे जो 2.0गीगा​हर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.

Oppo K1 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo K1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo K1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या डिस्प्ले वर इनविजिबल इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर Oppo K1 ची मोठी खासियत आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 3,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Oppo K1 पियानो ब्लॅक आणि अस्ट्रर ब्लू रंगांत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

सोर्स

The post Oppo K1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-price-cut-in-india/feed/ 0
ओपो के1 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, डुअल कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-launched-in-india-in-display-fingerprint-sensor-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-launched-in-india-in-display-fingerprint-sensor-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 06 Feb 2019 09:28:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3554 ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.

The post ओपो के1 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, डुअल कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने आज भारतात आपली स्मार्टफोन्स शृंखला वाढवत नवीन डिवाईस आणला आहे. ओपो ने के1 स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत ओपो ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि वॉटरड्रॉप नॉच सारख्या शानदार फीचर्स ने सुसज्ज केला आहे. देशात या फोनची किंमत 16,990 रुपये ठेवण्यात आली आहे जो 12 फेब्रुवारीपासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो के1 कपंनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. ओपो ने हा फोन एंडरॉयड 8.1 आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला आहे जो 2.0गीगा​हर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.

ओपो के1 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो के1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

ओपो के1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या डिस्प्ले वर इनविजिबल इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर ओपो के1 ची मोठी खासियत आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 3,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो के1 16,990 रुपयांमध्ये पियानो ब्लॅक आणि अस्ट्रर ब्लू रंगांत 12 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post ओपो के1 झाला भारतात लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, डुअल कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-launched-in-india-in-display-fingerprint-sensor-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : ओपो के1 येत आहे भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 6जीबी रॅम वर होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-k1-launching-india-february-first-week-with-in-display-fingerprint-sensor-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-k1-launching-india-february-first-week-with-in-display-fingerprint-sensor-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 09:12:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3498 ओपो के1 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिवली सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

The post एक्सक्लूसिव : ओपो के1 येत आहे भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 6जीबी रॅम वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपोचा एक आगामी स्मार्टफोन काल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट केला गेला होता. फ्लिपकार्ट वर या फोनच्या नावाचा आणि लॉन्च डेटचा खुलासा करण्यात आलेला नाही पण सांगण्यात आले होते कि या स्मार्टफोन सोबत ओपो भारतात नव्या स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे. पण आज 91मोबाईल्स एक्सक्लूसिव बातमी काढून आणली आहे कि फ्लिपकार्ट वर लिस्ट हा स्मार्टफोन ओपो के1 असेल जो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देशात लॉन्च केला जाईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री मधील सूत्रांनी सांगितले आहे कि ओपो लवकरच भारतात आपली के स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे. ओपो या सीरीज अंतर्गत सर्वात आधी ओपो के1 स्मार्टफोन लॉन्च करेल. फ्लिपकार्ट वरील वेबपेज ओपो के1 चा आहे. प्राप्त माहितीनुसार ओपो के1 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च केला जाईल. ओपो के1 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिवली सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

ओपो के1 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असेल. गेल्यावर्षी याच नावाचा ओपो आपला स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला आहे. ओपो के1 पाहता चीन मध्ये हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. चीन मध्ये हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो नॉच मध्ये उपलब्ध आहे. तसेच रियर कॅमेरा पाहता कंपनी ने हा डुअल सेंसरने सुसज्ज केला आहे. मुख्य सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी ओपो के1 मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो के1 चीन मध्ये दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

ओपो के1 च्या 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंटची किंमत भारतीय करंसी अनुसार जवळपास 16,000 रुपये आहे तर फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत इंडियन करंसी अनुसार 18,000 रुपयांच्या आसपास आहे. अशा आहे कि भारतात पण ओपो के1 चे दोन्ही वेरिएंट्स लॉन्च केले जातील. हा फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो के1 येत आहे भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 6जीबी रॅम वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-k1-launching-india-february-first-week-with-in-display-fingerprint-sensor-in-marathi/feed/ 0
ओपो लॉन्च करेल जगातील सर्वात स्वस्त अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वाला फोन, 10,000 रुपये असेल बेस किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-could-be-the-cheapest-phone-with-under-display-fingerprint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-could-be-the-cheapest-phone-with-under-display-fingerprint-in-marathi/#respond Tue, 09 Oct 2018 07:14:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2401 किंमत पाहता हा अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह लॉन्च होणारा सर्वात स्वस्त मोबाइल फोन असेल.

The post ओपो लॉन्च करेल जगातील सर्वात स्वस्त अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वाला फोन, 10,000 रुपये असेल बेस किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जरी नॉच स्क्रीन असलेल्या फोनची सुरवात अॅप्पल ने आयफोन 10 पासून केली असली तरी नॉच मध्ये जितके प्रयोग ओपो करत आहे तेवढे कुठल्याच कंपनी ने केले नसतील. कंपनी ने वी7 पासून नॉच स्क्रीन वाल्या फोनची सुरवात केली होती आणि त्यानंतर कमी जास्त रेंज मध्ये अनेक फोन्स सादर केले आहेत ज्यात नॉच होता. पण वी9 पासून कंपनी ने एयरड्रॉप नॉच ची सुरवात केली होती ज्यात पाण्याच्या थेंबा सारखी नॉच होती. आता ओपोचा अजून एक फोन ओपो के1 चर्चेत आहे. कंपनी लवकरच आपल्या एका नवीन सीरीजचा फोन सादर करणार आहे ज्यात अनोख्या नॉच स्क्रीन सोबत अंडर​ डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

विशेष म्हणजे कंपनी ने आज या फोन बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर कंपनी ने लिहिले आहे की ओपो के1 उद्या लॉन्च केला जाईल ज्यात स्क्रीन वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. इतकेच नव्हे तर यासोबत फोनच्या किंमतीची माहिती पण देण्यात आली आहे आणि सांगण्यात आले आहे की या फोनची किंमत 1,000—1,999 यूआन असू शकते. ही जर भारतीय रुपयांमध्ये कनवर्ट केली तर 10,000 ते 20,000 रुपये होतात. ही किंमत पाहता हा अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह लॉन्च होणारा सर्वात स्वस्त मोबाइल फोन असेल.

या आधी वीवो ने एक्स21, वीवो नेक्स आणि वी11 प्रो सारख्या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला होता पण हे सर्व थोडे महाग होते. हे सर्व फोन 20,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मध्ये उपलब्ध आहेत पण ओपो के1 यापेक्षा खुप स्वस्त असेल.

कंपनी ने आपल्या सोशल मीडिया वर ओपो के1 चे काही फोटोग्राफ पण शेयर केले आहेत ज्यातून लुक बद्दल अंदाज लावता येतो. स्क्रीन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तर वरच्या बाजूला वाटर ड्रॉप नॉच दिसत आहे. नॉच च्या वर कंपनी ने लाउडस्पीकर ग्रिल दिले आहे जी फोटो मध्ये स्पष्ट दिसत आहे.

जरी अन्य स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती नसली तरी फोटो मध्ये तुम्ही बेजल लेस डिस्प्ले बघू शकता. लीक्स नुसार ओपो के1 चा डिस्प्ले 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल ज्या सोबत हा 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. ओपो के1 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post ओपो लॉन्च करेल जगातील सर्वात स्वस्त अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वाला फोन, 10,000 रुपये असेल बेस किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-could-be-the-cheapest-phone-with-under-display-fingerprint-in-marathi/feed/ 0
सर्वात अनोखा नॉच डिस्प्ले असलेला फोन घेऊन येत आहे ओपो, ओपो के1 च्या फोटो सह किंमत झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-water-drop-notch-display-real-image-leaked-price-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-water-drop-notch-display-real-image-leaked-price-design-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 07:43:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2393 वेईबो नुसार ओपो के1 2,000 युआन मध्ये लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 21,500 रुपये असेल.

The post सर्वात अनोखा नॉच डिस्प्ले असलेला फोन घेऊन येत आहे ओपो, ओपो के1 च्या फोटो सह किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो बद्दल नुकतीच बातमी आली होती की कपंनी एका नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि तिचे नाव ‘के सीरीज’ असेल. ओपो ने काही दिवसांपूर्वी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन के1 चा टीजर शेयर केला होता ज्यातून फोनची झलक मिळाली होती. आता चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर ओपो के1 ची खरी ईमेज लीक झाली आहे. या फोन मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यातून फोनचा डिस्प्ले, लुक व डिजाईन यांची माहिती मिळाली आहे. हे मात्र नक्की की ओपो के1 आता पर्यंत आलेल्या नॉच वाल्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात अनोखा असेल.

ओपो के1 चा फोटो वेईबो वर शेयर करण्यात आला होता. या फोन मध्ये पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे पण हा आता पर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये सर्वात वेगळा आहे. ओपो के1 ची वॉटरड्रॉप नॉच फोन बॉडी पेक्षा थोडी वर गेली आहे. ईमेज मध्ये तुम्ही बघितले असेलच. फोन च्या वरच्या पॅनल मध्ये बारीक कर्व आहे जो फोनच्या बेजल लेस डिस्प्ले पासून वेगळा उंचवटा आहे. या उंचवट्यावर नॉच बनवण्यात आली आहे तसेच नॉच मध्ये कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

ओपो के1 मधील उंचावलेल्या नॉच मुळे वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ची कमी जागा घेते. फोनच्या तिन्ही बाजू बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट आहे. ओपो के1 च्या अनोख्या नॉच बद्दल बोलले जात आहे की कदाचित या नॉच च्या मागे कंपनी ने स्पीकर दिले असतील. नवीन लीक मध्ये ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स चा पण उल्लेख करण्यात आला आहे. वेईबो नुसार फोन मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल.

लीक्स नुसार ओपो के1 चा डिस्प्ले 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल ज्या सोबत हा 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.

ओपो के1 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. ओपो के1 च्या या फोटो मध्ये इन-डिसप्लेे फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या लीक मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नव्हता. वेईबो नुसार ओपो के1 2,000 युआन मध्ये लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 21,500 रुपये असेल.

The post सर्वात अनोखा नॉच डिस्प्ले असलेला फोन घेऊन येत आहे ओपो, ओपो के1 च्या फोटो सह किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-water-drop-notch-display-real-image-leaked-price-design-in-marathi/feed/ 0
ओपो घेऊन येत आहे नवीन ‘के सीरीज’, इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल ओपो के1 https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-to-launch-on-10-october-feature-specification-tenaa-listing-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-to-launch-on-10-october-feature-specification-tenaa-listing-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 06:23:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2319 हा फोन वॉटरड्रॉप डिस्प्ले आणि इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह येत्या 10 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल.

The post ओपो घेऊन येत आहे नवीन ‘के सीरीज’, इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल ओपो के1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने नुकताच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एफ9 प्रो आणून देशातील पहिला वॉटरड्रॉप डिस्प्ले असलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. ओपो नंतर वीवो ने वी11 प्रो तसेच रियलमी ने रियलमी 2प्रो च्या माध्यमातून ‘वी’ शेप वाला नॉच चालू ठेवला. आता ओपो ने पुन्हा एकदा नवीन स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. ओपो ने सोशल मीडिया वर आपल्या आगामी स्मार्टफोनचा टीजर शेअर केला आहे. हा फोन वॉटरड्रॉप डिस्प्ले आणि इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह येत्या 10 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल.

ओपो चा हा नवीन फोन ‘के सीरीज’ अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो जो ओपो के1 नावाने स्मार्टफोन बाजारात येईल. ओपो ने जरी या स्मार्टफोनच्या नावा सह याच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती आॅफिशियल केली नसली तरी ओपो के1 चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर झाला आहे. टेना वर हा फोन दोन मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे सोबत ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण देण्यात आली आहे.

टेना वर ओपो चा नवीन फोन पीबीसीएम10 आणि पीबीसीएम30 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. बोलले जात आहे की यातील एक मॉडेल 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. टेना नुसार ओपो के1 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये पण एफ9 प्रो प्रमाणे ‘वी’ शेप वाला वॉटरड्रॉप डिस्प्ले मिळेल.

ओपो के1 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाईल सोबतच हा 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

ओपो के1 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. टेना वरून समोर आलेल्या ओपो के1 च्या फोटो मध्ये याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला नाही. ज्यावरून असे वाटते की ओपो के1 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येईल. पण जोपर्यंत फोन लॉन्च होत नाही तोपर्यंत ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही. ओपो के1 10 ऑक्टोबरला चीन मध्ये लॉन्च केला जाईल.

The post ओपो घेऊन येत आहे नवीन ‘के सीरीज’, इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल ओपो के1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k1-to-launch-on-10-october-feature-specification-tenaa-listing-in-marathi/feed/ 0