सर्वात अनोखा नॉच डिस्प्ले असलेला फोन घेऊन येत आहे ओपो, ओपो के1 च्या फोटो सह किंमत झाली लीक

ओपो बद्दल नुकतीच बातमी आली होती की कपंनी एका नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि तिचे नाव ‘के सीरीज’ असेल. ओपो ने काही दिवसांपूर्वी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन के1 चा टीजर शेयर केला होता ज्यातून फोनची झलक मिळाली होती. आता चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर ओपो के1 ची खरी ईमेज लीक झाली आहे. या फोन मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यातून फोनचा डिस्प्ले, लुक व डिजाईन यांची माहिती मिळाली आहे. हे मात्र नक्की की ओपो के1 आता पर्यंत आलेल्या नॉच वाल्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात अनोखा असेल.

ओपो के1 चा फोटो वेईबो वर शेयर करण्यात आला होता. या फोन मध्ये पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे पण हा आता पर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये सर्वात वेगळा आहे. ओपो के1 ची वॉटरड्रॉप नॉच फोन बॉडी पेक्षा थोडी वर गेली आहे. ईमेज मध्ये तुम्ही बघितले असेलच. फोन च्या वरच्या पॅनल मध्ये बारीक कर्व आहे जो फोनच्या बेजल लेस डिस्प्ले पासून वेगळा उंचवटा आहे. या उंचवट्यावर नॉच बनवण्यात आली आहे तसेच नॉच मध्ये कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

ओपो के1 मधील उंचावलेल्या नॉच मुळे वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ची कमी जागा घेते. फोनच्या तिन्ही बाजू बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट आहे. ओपो के1 च्या अनोख्या नॉच बद्दल बोलले जात आहे की कदाचित या नॉच च्या मागे कंपनी ने स्पीकर दिले असतील. नवीन लीक मध्ये ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स चा पण उल्लेख करण्यात आला आहे. वेईबो नुसार फोन मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल.

लीक्स नुसार ओपो के1 चा डिस्प्ले 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल ज्या सोबत हा 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.

ओपो के1 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. ओपो के1 च्या या फोटो मध्ये इन-डिसप्लेे फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या लीक मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नव्हता. वेईबो नुसार ओपो के1 2,000 युआन मध्ये लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 21,500 रुपये असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here