ओपो ने आज भारतात आपली स्मार्टफोन्स शृंखला वाढवत नवीन डिवाईस आणला आहे. ओपो ने के1 स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत ओपो ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉटरड्रॉप नॉच सारख्या शानदार फीचर्स ने सुसज्ज केला आहे. देशात या फोनची किंमत 16,990 रुपये ठेवण्यात आली आहे जो 12 फेब्रुवारीपासून सेल साठी उपलब्ध होईल.
ओपो के1 कपंनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. ओपो ने हा फोन एंडरॉयड 8.1 आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.
ओपो के1 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो के1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
ओपो के1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या डिस्प्ले वर इनविजिबल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ओपो के1 ची मोठी खासियत आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 3,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो के1 16,990 रुपयांमध्ये पियानो ब्लॅक आणि अस्ट्रर ब्लू रंगांत 12 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.















