ओपो घेऊन येत आहे नवीन ‘के सीरीज’, इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल ओपो के1

ओपो ने नुकताच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एफ9 प्रो आणून देशातील पहिला वॉटरड्रॉप डिस्प्ले असलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. ओपो नंतर वीवो ने वी11 प्रो तसेच रियलमी ने रियलमी 2प्रो च्या माध्यमातून ‘वी’ शेप वाला नॉच चालू ठेवला. आता ओपो ने पुन्हा एकदा नवीन स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. ओपो ने सोशल मीडिया वर आपल्या आगामी स्मार्टफोनचा टीजर शेअर केला आहे. हा फोन वॉटरड्रॉप डिस्प्ले आणि इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह येत्या 10 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल.

ओपो चा हा नवीन फोन ‘के सीरीज’ अंतर्गत लॉन्च केला जाऊ शकतो जो ओपो के1 नावाने स्मार्टफोन बाजारात येईल. ओपो ने जरी या स्मार्टफोनच्या नावा सह याच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती आॅफिशियल केली नसली तरी ओपो के1 चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर झाला आहे. टेना वर हा फोन दोन मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे सोबत ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण देण्यात आली आहे.

टेना वर ओपो चा नवीन फोन पीबीसीएम10 आणि पीबीसीएम30 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. बोलले जात आहे की यातील एक मॉडेल 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. टेना नुसार ओपो के1 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये पण एफ9 प्रो प्रमाणे ‘वी’ शेप वाला वॉटरड्रॉप डिस्प्ले मिळेल.

ओपो के1 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाईल सोबतच हा 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

ओपो के1 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. टेना वरून समोर आलेल्या ओपो के1 च्या फोटो मध्ये याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला नाही. ज्यावरून असे वाटते की ओपो के1 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येईल. पण जोपर्यंत फोन लॉन्च होत नाही तोपर्यंत ओपो के1 च्या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही. ओपो के1 10 ऑक्टोबरला चीन मध्ये लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here