OPPO Reno S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Nov 2019 13:48:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/#respond Thu, 07 Nov 2019 13:48:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5713 सर्वात खास बाब अशी कि यात 5जी सपोर्ट असू शकतो, 2020 मध्ये OPPO Reno 3 तुम्हाला बाजारात मिळेल.

The post 60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षीच्या सुरवातीला ओपोने आपल्या नवीन रेनो सीरीजची सुरवात केली होती. कंपनीने आधी रेनो मॉडेल आणला होता आणि नंतर भारतीय बाजारात रेनो 2 सीरीज अंतर्गत एक साथ तीन फोन लॉन्च केले. तर आता कंपनी Reno 3 ची तयारी करत आहे. हि बातमी अजून भारतातून आली नाही. चीन मध्ये या फोन मॉडेलचे स्पेसिफिकेशन लीक केले गेले आहेत. चीनी सर्टिफिकेशन साइट वीबो वर या फोनचे स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत ज्यात डिस्प्ले डिजाइन पासून कॅमेऱ्यापर्यंतची माहिती आहे. पण या स्पेसिफिकेशंसची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही पण रूमर मध्ये आले आहेत.

OPPO Reno 3 स्पेसिफिकेशन

दिलेल्या माहिती नुसार ओपो रेनो 3 मध्ये 6.5 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी एमोलेड डिस्प्लेचा वापर करू शकते. खास बाब अशी कि यावेळी कंपनी 90 हट्र्ज डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच दुसऱ्या रेनो फोन प्रमाणे यात पण तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो.

रेनो आणि रेनो 2 मॉडेल मध्ये शार्कफिन सेल्फी कॅमेरा दिसला होता पण अजूनतरी OPPO Reno 3 बद्दल अशी माहिती मिळाली नाही. लीक स्पेसिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आली आहे कि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 735 चिपसेट मिळू शकतो. याआधी रेनो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 आणि Reno 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी प्रोसेसर देण्यात आला होता.

स्टोरेज पाहता OPPO Reno 3 मध्ये तुम्हाला डीडीआर4एक्स रॅम आर्किटेक्चर असलेला 8 जीबी रॅम मिळू शकते. तसेच 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

OPPO Reno 3 चे कॅमेरा सेंसर्स

बातमीनुसार या फोन मध्ये तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो जो नुकत्याच लॉन्च झालेल्या ओपोच्या फोन मध्ये दिसला आहे. OPPO Reno 3 चा मुख्य कॅमेरा सेंसर 60 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच सपोर्टिव सेंसर्स 8 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे असू शकतात. सेल्फी बद्दल बोलायचे तर हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

OPPO Reno 3 ची बॅटरी

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये तुम्हाला 4,500 एमएएच ची बॅटरी असेल. सोबतच 30 वॉट चा फास्ट चार्जर ज्याला ओपो ने वूक चार्जरचे नाव दिले आहे तो मिळू शकतो. सर्वात खास बाब अशी कि यात 5जी सपोर्ट असू शकतो. राहिला प्रश्न बाजारात येण्याचा तर 2020 मध्ये OPPO Reno 3 तुम्हाला बाजारात मिळेल.

The post 60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/feed/ 0
Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/#respond Thu, 24 Oct 2019 13:41:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5588 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात OPPO Reno S भारतात लॉन्च केला जाईल तसेच हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये येईल.

The post Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश होता. हे तिन्ही स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च केले गेले होते. यात Oppo Reno 2 जगातील पहिला असा स्मार्टफोन होता जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20x digital zoom आणि 5x hybrid zoom ला सपोर्ट करतो. Reno 2 सीरीजने टेक बाजारात आपली पकड मजबूत करणारी OPPO आता या सीरीजचा विस्तार करणार आहे. OPPO लवकरच भारतात अजून एक नवीन फोन OPPO Reno S लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला OPPO Reno S संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी ‘रेनो 2 सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा स्मार्टफोन OPPO Reno S नावाने बाजारात येईल. OPPO Reno S ची निर्मिती सुरु झाली आहे आणि हा फोन यावर्षी बाजारात येईल. कंपनीने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात OPPO Reno S भारतात लॉन्च केला जाईल तसेच हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये येईल.

हे देखील वाचा: Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

OPPO Reno S

ओपो रेनो सीरीजच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्सूसिव माहितीनुसार OPPO Reno S भारतात लॉन्च होणारा पहिला OPPO फोन असेल ज्यात 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. OPPO Reno S सह हि कंपनी Realme, Redmi आणि Samsung च्या शर्यतीत येईल. OPPO Reno S क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. म्हणजे 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबतच या फोन मध्ये एकूण चार रियर कॅमेरा सेंसर मिळतील.

OPPO Reno S हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येईल जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेईल. या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस दिला जाईल. तसेच ओपो रेनो एस कंपनी आपल्या लेटेस्ट चार्जिंग टेक्नोलॉजी 65W SuperVOOC 2.0 सह बाजारात आणेल. फोनची किंमत पाहता OPPO Reno S एक फ्लॅगशिप फोन असेल आणि हा भारतात 40,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Oppo Reno 2 सीरीज

भारतात उपलब्द असलेल्या Oppo Reno 2 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 8जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. बाजारात या फोनची किंमत 36,990 रुपये आहे. Oppo Reno 2F भारतात 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 25,990 रुपये आहे. सीरीजच्या तिसऱ्या स्मार्टफोन Oppo Reno 2Z ने 29,990 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतील आहे आणि हा डिवाईस पण 8 जीबी रॅम सह 128 जीबी की स्टोरेज सपोर्ट करतो.

The post Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-reno-s-india-launch-in-december-with-64mp-camera-snapdragon-855-plus-chipset-65w-supervooc/feed/ 0