60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3

यावर्षीच्या सुरवातीला ओपोने आपल्या नवीन रेनो सीरीजची सुरवात केली होती. कंपनीने आधी रेनो मॉडेल आणला होता आणि नंतर भारतीय बाजारात रेनो 2 सीरीज अंतर्गत एक साथ तीन फोन लॉन्च केले. तर आता कंपनी Reno 3 ची तयारी करत आहे. हि बातमी अजून भारतातून आली नाही. चीन मध्ये या फोन मॉडेलचे स्पेसिफिकेशन लीक केले गेले आहेत. चीनी सर्टिफिकेशन साइट वीबो वर या फोनचे स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत ज्यात डिस्प्ले डिजाइन पासून कॅमेऱ्यापर्यंतची माहिती आहे. पण या स्पेसिफिकेशंसची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही पण रूमर मध्ये आले आहेत.

OPPO Reno 3 स्पेसिफिकेशन

दिलेल्या माहिती नुसार ओपो रेनो 3 मध्ये 6.5 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी एमोलेड डिस्प्लेचा वापर करू शकते. खास बाब अशी कि यावेळी कंपनी 90 हट्र्ज डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच दुसऱ्या रेनो फोन प्रमाणे यात पण तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो.

रेनो आणि रेनो 2 मॉडेल मध्ये शार्कफिन सेल्फी कॅमेरा दिसला होता पण अजूनतरी OPPO Reno 3 बद्दल अशी माहिती मिळाली नाही. लीक स्पेसिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आली आहे कि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 735 चिपसेट मिळू शकतो. याआधी रेनो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 आणि Reno 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी प्रोसेसर देण्यात आला होता.

स्टोरेज पाहता OPPO Reno 3 मध्ये तुम्हाला डीडीआर4एक्स रॅम आर्किटेक्चर असलेला 8 जीबी रॅम मिळू शकते. तसेच 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

OPPO Reno 3 चे कॅमेरा सेंसर्स

बातमीनुसार या फोन मध्ये तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो जो नुकत्याच लॉन्च झालेल्या ओपोच्या फोन मध्ये दिसला आहे. OPPO Reno 3 चा मुख्य कॅमेरा सेंसर 60 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच सपोर्टिव सेंसर्स 8 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे असू शकतात. सेल्फी बद्दल बोलायचे तर हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

OPPO Reno 3 ची बॅटरी

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये तुम्हाला 4,500 एमएएच ची बॅटरी असेल. सोबतच 30 वॉट चा फास्ट चार्जर ज्याला ओपो ने वूक चार्जरचे नाव दिले आहे तो मिळू शकतो. सर्वात खास बाब अशी कि यात 5जी सपोर्ट असू शकतो. राहिला प्रश्न बाजारात येण्याचा तर 2020 मध्ये OPPO Reno 3 तुम्हाला बाजारात मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here