Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

Samsung ने कालच आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या फ्लॅगशिप फोन Galaxy A80 ची किंमत कमी केली होती. हा स्मार्टफोन लॉन्च तर 47,990 रुपयांमध्ये झाला होता पण आता हा 8,000 रुपयांनी स्वस्त विकत घेता येईल. तर आज सॅमसंगच्या अजून एका फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S10e ची किंमत कमी झाल्याची बातमी समोर आली आहे. माहिती मिळाली आहे कि Samsung ने Galaxy S10e ची किंमत थेट 3,000 रुपयांनी कमी केली आहे आणि हा फोन 47,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फक्त इतकेच नव्हे तर आपल्या फॅन्सना भेट देत Samsung ब्रॅण्डच्या नवीन फोन Galaxy A70s सोबत 1,999 रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन पण मोफत देत आहे.

Samsung Galaxy S10e

गॅलेक्सी एस10ई पाहता हा फोन पंच होल डिजाईन सह येतो तसेच 1440 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.8 इंचाच्या डायनामिक एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एचडीआर10+ विजुअल क्वॉलिटी देऊ शकतो. फोनचा डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. Galaxy S10e एंडरॉयड 9 पाई आधारित वन यूआई वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या एक्सनॉस 9820 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: आता चालत्या ट्रेन मध्ये पण मिळेल वाई-फाई ची सुविधा, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Samsung Galaxy S10e भारतात 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला होता जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy S10e डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरचा 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर पर्यंत क्षमता असलेला 12 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/1.9 अपर्चरच्या 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy S10e मध्ये 3100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Galaxy A70s

ऑफर अंतर्गत Samsung Galaxy A70s स्मार्टफोन सोबत ITFIT Bluetooth Earphone मोफत दिला जात आहे. विशेष म्हणजे या वायरलेस हेडफोनची किंमत 1,999 रुपये आहे. फोनची किंमत पाहता Galaxy A70s चा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 28,999 रुपये तर 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन बाजारातून विकत घेता येईल.

Samsung Galaxy A70s मध्ये 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात गॅलेक्सी ए70एस दोन रॅम वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे जे 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमला सपोर्ट करतात. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: BSNL-MTNL साठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता Jio आणि Airtel च्या अडचणी वाढणार

लक्षात असू दे कि Samsung Galaxy A70s कंपनीचा पहिला 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी Galaxy A70s 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here