Oppo Reno10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 May 2023 06:36:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 10 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा; डिजाइन देखील समजली https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-launch-date-design-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-launch-date-design-revealed/#respond Tue, 16 May 2023 06:36:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20903 OPPO लवकरच आपली OPPO Reno 10 सीरीज लाँच करणार आहे. आता कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वीच या सीरिजच्या लाँच डेटची माहिती समोर आली आहे. लीक्सनुसार, 24 मेला ही सीरिज दुपारी 2:30 वाजता चीनमध्ये लाँच केली जाईल. या सीरिजमध्ये OPPO Reno 10, OPPO Reno 10 Pro आणि OPPO Reno 10 Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ […]

The post OPPO Reno 10 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा; डिजाइन देखील समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरीज 24 मेला लाँच होऊ शकते.
  • OPPO Reno 10 सीरीजमध्ये तीन हँडसेट असू शकतात.
  • OPPO Reno 10 Pro Plus एक टॉप अँड फीचर्स असलेला फोन असू शकतो.

OPPO लवकरच आपली OPPO Reno 10 सीरीज लाँच करणार आहे. आता कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वीच या सीरिजच्या लाँच डेटची माहिती समोर आली आहे. लीक्सनुसार, 24 मेला ही सीरिज दुपारी 2:30 वाजता चीनमध्ये लाँच केली जाईल. या सीरिजमध्ये OPPO Reno 10, OPPO Reno 10 Pro आणि OPPO Reno 10 Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. यातील सर्वात मोठ्या प्रो प्लस मॉडेलमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.

ओप्पो रेनो10 सीरिज 24 मेला येऊ शकते चीनमध्ये

  • उपरोक्त पोस्टरमधून समोर आलं आहे की OPPO Reno 10 सीरिज येत्या 24 मेला चीनमध्ये सादर केली जाईल. परंतु इथे कुठेही किती डिवाइस येतील हे सांगण्यात आलं नाही.
  • पोस्टरमधून सीरिजच्या डिजाईनचा देखील खुलासा झाला आहे आणि पोस्टर मधील डिवाइस हायएन्ड OPPO Reno 10 Pro+ असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.
  • या डिवाइसमध्ये अंडाकृती रियर कॅमेरा मोड्यूल दिला जाईल, ज्यात तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल. हा डिवाइस गोल्ड आणि पिंक कलरसह बाजारात येईल.
  • बारकाईने पहिल्यांनंतर देखील या डिवाइसमध्ये कुठेही अँटेना लाइन दिसत नाहीत, त्यामुळे OPPO Reno 10 प्लास्टिक बॉडीसह येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
  • तसेच मागच्या बाजूला ‘Powered by Marisilicon’ हे ब्लर झालेलं आहे, हे ब्रॅंडिंग कंपनीच्या फ्लॅगशिप फाईंड एक्स सीरिजच्या मागे दिसतं.

ओप्पो रेनो10 सीरिज भारतीय लाँच

OPPO Reno 10 सीरिज लवकरच भारतात देखील येईल, अशी चर्चा आहे. हा डिवाइस पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. विशेष म्हणजे तिन्ही डिव्हाइसेसना भारतीय BIS सर्टिफिकेशन देखील मिळालं आहे. त्यामुळे लवकरच यांची एंट्री देशात होईल, अशी अपेक्षा आहे.

The post OPPO Reno 10 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा; डिजाइन देखील समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-launch-date-design-revealed/feed/ 0
आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-specifications-surfaced-online-tipped-feature-camera/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-specifications-surfaced-online-tipped-feature-camera/#respond Fri, 17 Feb 2023 07:26:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17912 OPPO नं अलीकडेच आपली Reno 9 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. परंतु ही सीरिज भारतीय बाजारात येणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्याऐवजी कंपनीनं थेट Reno 10 सीरिज भारतात सादर करेल. ओप्पो रेनो 10 सीरिज सर्वप्रथम चीनी बाजारात येईल, त्यांनतर भारतासह जगभरात लाँच केली जाईल. यात Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ […]

The post आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच होणार.
  • Reno 10 Pro+ 5G मध्ये पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • Reno 10 5G मध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल.

OPPO नं अलीकडेच आपली Reno 9 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. परंतु ही सीरिज भारतीय बाजारात येणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्याऐवजी कंपनीनं थेट Reno 10 सीरिज भारतात सादर करेल. ओप्पो रेनो 10 सीरिज सर्वप्रथम चीनी बाजारात येईल, त्यांनतर भारतासह जगभरात लाँच केली जाईल. यात Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ 5G अशा तीन प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो.

हे डिवाइस 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान सादर केले जातील. परंतु ओप्पोनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तत्पूर्वी एका नव्या रिपोर्टमधून आगामी ओप्पो रेनो 10 सीरिजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ही महत्वाची माहिती दिली आहे तसेच त्याने Reno 10 आणि Reno 10 Pro+ 5G च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. चला पाहूया… हे देखील वाचा: 2500 रुपयांमध्ये बुक करा दणकट ई बाईक; Aarya Commander मध्ये 125 किलोमीटरची रेंज

Reno 9

OPPO Reno 10 सीरिजचे लीक स्पेसिफिकेशन

सीरिजमधील वॅनिला Reno 10 स्मार्टफोन भारतातील Reno 8 5G ची जागा घेईल. ज्यात 6.7-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचे रिजोल्यूशन फुलएचडी+ असेल. आगामी ओप्पो फोनमध्ये एक 2X पोर्ट्रेट लेन्स देण्यात येईल तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये अलीकडेच भारतात आलेल्या Reno 8T 5G प्रमाणे कर्व डिस्प्ले असेल की नाही ते पाहावं लागेल.

टिपस्टरनं रेनो 10 प्रो प्लस 5जी च्या स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती दिली आहे. त्यानुसार या फोनमध्ये 1.5के डिस्प्ले दिला जाईल, जो 1220 x 2712 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. फोनमध्ये 50MP Sony IMX890 मेन कॅमेरा सेन्सर म्हणून मिळेल. या डिवाइसमध्ये एक पेरिस्कोप लेन्स देखील मिळेल जी या सेगमेंटमध्ये दुर्मिळ आहे. Reno 10 Pro+ 5G मध्ये 4,600mAh ची ड्युअल सेल बॅटरी दिला जाईल. ओप्पोचा सध्याचा ट्रेंड पाहता या फोनमध्ये 80W किंवा 100W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

डिजिटल चॅट स्टेशननं याआधी रेनॉ 10 प्रो प्लस 5जी चे डिजाइन रेंडर देखील लीक केले होते. ज्यातून नवीन कॅमेरा मॉड्यूल दिसला होता. या फोनमध्ये पिल शेप कॅमेरा मॉड्यूल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह दिला जाईल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. तर फ्रंटला मध्यभागी एक पंच होल कटआऊट असलेला डिस्प्ले मिळेल. लवकरच या सीरिजच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळू शकते, त्यामुळे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.

The post आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-specifications-surfaced-online-tipped-feature-camera/feed/ 0