125 किलोमीटरची रेंजसह Aarya Commander इलेक्ट्रिक मोटरसायकल पुढील महिन्यात होऊ शकते लाँच

Highlights

  • Aarya Commander ई-मोटरसायकल फक्त 2500 रुपये देऊन करा बुक
  • Aarya Commander ई-मोटरसायकल फुल चार्जमध्ये देईल 125km ची रेंज
  • आर्या कमांडरची किंमत जवळपास 1.60 लाख रुपये असेल

गुजरातमधील ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर आर्या ऑटोमोबाइल्स (Aarya Automobiles) पुढील महिन्यात आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल (electric motorcycle) लाँच करून इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये एंट्री करू शकते. कंपनीचा दावा आहे की आर्या कमांडर (Aarya Commander) ई-मोटरसायकल एकदा फुल चार्ज केल्यावर 125km ची रेंज देऊ शकते. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक मोटरसायकलची माहिती.

125km आहे रेंज

आर्या कमांडर इलेक्ट्रिक मोटरसायकल 4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह लाँच केली जाऊ शकते. दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 125 km ची रेंज देऊ शकते. यात 3 kW (4.02 bhp) ची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे, जी ताशी 90 KM चा टॉप स्पीड देऊ शकते. चार्जिंग पाहता, कंपनीच्या मते आर्या कमांडर सामान्य चार्जरनं 5 तासांत पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकते. हे देखील वाचा: गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत

Aarya Commander चे फीचर्स

काही दिवसांपूर्वी टीजरमधून कंपनीने मोटरसायकलच्या डिझाईनची झलक दाखवली होती. या बाईकला राउंड हेडलॅम्प्स, उठवलेला हँडलबार, टियरड्रॉप फ्युएल टँक आणि स्प्लिट सीट देण्यात आला आहे. ही क्रूझर मोटरसायकल परवडणाऱ्या किमतीत आधुनिक फीचर्ससह आणली जाणार असून ही मोटरसायकल एकूण आठ रंगांमध्ये लाँच होणार आहे.

Aarya Commander इलेक्ट्रिक बाइक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागे ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक अब्जॉर्बरसह येऊ शकते. ब्रेकिंगसाठी यात कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक मिळू शकतात. फीचर्स पाहता, आर्या कमांडरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट इत्यादीसह एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं जाऊ शकतं. हे देखील वाचा: रियलमीच्या सर्वात स्वस्त फोनला टक्कर देणार Redmi A2; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री

Aarya Commander ची किंमत

आर्या कमांडर (Aarya Commander) ची किंमत जवळपास 1.60 लाख रुपये, एक्स-शोरूम (राज्य सरकारची सबसीडी वगळून) असण्याची शक्यता आहे. हिची बुकिंग 2,500 रुपयांपासून सुरु झाली आहे आणि डिलिव्हरी यावर्षी एप्रिलपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. आर्या ऑटोमोबाइल्सचा दावा आहे की त्यांचं टियर-1 शहरांमध्ये अ‍ॅक्टिव्ह नेटवर्क आहे आणि लवकरच इतर भागांमध्ये याचा विस्तार केला जाऊ शकतो. तसेच सुरतमधील मॅन्युफॅक्चरिंग यूनिटची मासिक उत्पादन क्षमता 5,000 यूनिट्स आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here