OPPO Reno 10 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा; डिजाइन देखील समजली

Highlights

  • OPPO Reno 10 सीरीज 24 मेला लाँच होऊ शकते.
  • OPPO Reno 10 सीरीजमध्ये तीन हँडसेट असू शकतात.
  • OPPO Reno 10 Pro Plus एक टॉप अँड फीचर्स असलेला फोन असू शकतो.

OPPO लवकरच आपली OPPO Reno 10 सीरीज लाँच करणार आहे. आता कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वीच या सीरिजच्या लाँच डेटची माहिती समोर आली आहे. लीक्सनुसार, 24 मेला ही सीरिज दुपारी 2:30 वाजता चीनमध्ये लाँच केली जाईल. या सीरिजमध्ये OPPO Reno 10, OPPO Reno 10 Pro आणि OPPO Reno 10 Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. यातील सर्वात मोठ्या प्रो प्लस मॉडेलमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.

ओप्पो रेनो10 सीरिज 24 मेला येऊ शकते चीनमध्ये

  • उपरोक्त पोस्टरमधून समोर आलं आहे की OPPO Reno 10 सीरिज येत्या 24 मेला चीनमध्ये सादर केली जाईल. परंतु इथे कुठेही किती डिवाइस येतील हे सांगण्यात आलं नाही.
  • पोस्टरमधून सीरिजच्या डिजाईनचा देखील खुलासा झाला आहे आणि पोस्टर मधील डिवाइस हायएन्ड OPPO Reno 10 Pro+ असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.
  • या डिवाइसमध्ये अंडाकृती रियर कॅमेरा मोड्यूल दिला जाईल, ज्यात तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल. हा डिवाइस गोल्ड आणि पिंक कलरसह बाजारात येईल.
  • बारकाईने पहिल्यांनंतर देखील या डिवाइसमध्ये कुठेही अँटेना लाइन दिसत नाहीत, त्यामुळे OPPO Reno 10 प्लास्टिक बॉडीसह येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
  • तसेच मागच्या बाजूला ‘Powered by Marisilicon’ हे ब्लर झालेलं आहे, हे ब्रॅंडिंग कंपनीच्या फ्लॅगशिप फाईंड एक्स सीरिजच्या मागे दिसतं.

ओप्पो रेनो10 सीरिज भारतीय लाँच

OPPO Reno 10 सीरिज लवकरच भारतात देखील येईल, अशी चर्चा आहे. हा डिवाइस पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. विशेष म्हणजे तिन्ही डिव्हाइसेसना भारतीय BIS सर्टिफिकेशन देखील मिळालं आहे. त्यामुळे लवकरच यांची एंट्री देशात होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here