अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल Xiaomi 13 Pro; लाँच तारीख ठरली

Highlights

  • Xiaomi 13 Pro भारतात 26 फेब्रुवारीला लाँच केला जाईल.
  • गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हा फोन चीनमध्ये आला होता
  • फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे

Xiaomi 13 Pro गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केल्यानंतर आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तयारी सुरु झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की हा फोन भारतात 26 फेब्रुवारीला लाँच केला जाईल. आता अ‍ॅमेझॉन इंडियानं आपल्या प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे लाँचनंतर शाओमी 13 प्रो याच ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करता येईल, हे स्पष्ट झालं आहे.

Xiaomi 13 Pro भारतीय लाँच आणि उपलब्धता

भारतात शाओमी 13 प्रो लाँच झाल्यावर तो अ‍ॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवरून देखील खरेदी करता येऊ शकतो. परंतु शाओमीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. टिपस्टर मुकुल शर्मानुसार हा हा फोन मार्चच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ शकतो आणि मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रियलमीच्या सर्वात स्वस्त फोनला टक्कर देणार Redmi A2; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री

Xiaomi 13 Pro ची किंमत

शाओमी 13 प्रोच्या भारतीय किंमतीची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु चीनमध्ये या फोनच्या 8GB+128GB असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत CNY 5399 (सुमारे 64,000 रुपये), CNY 5799 (सुमारे 68,700 रुपये), CNY 6299 (सुमारे 74,600) ठेवण्यात आली आहे. वनप्लस आणि आयकूला टक्कर देखील अशी किंमत शाओमी ठेऊ शकते.

चीनमधील Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: 2500 रुपयांमध्ये बुक करा दणकट ई बाईक; Aarya Commander मध्ये 125 किलोमीटरची रेंज

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here