Oppo Reno8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 07:19:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/#respond Tue, 19 Jul 2022 12:38:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11544 OPPO Reno8 series अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. OPPO नं भारतात OPPO Reno 8 5G आणि OPPO Reno 8 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतातील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यातील Reno8 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 2T या डिवाइसला चांगली टक्कर देत […]

The post OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Reno8 series अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. OPPO नं भारतात OPPO Reno 8 5G आणि OPPO Reno 8 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतातील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यातील Reno8 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 2T या डिवाइसला चांगली टक्कर देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला Reno8 घ्यावा की वनप्लस नॉर्ड 2टी घ्यावा असा प्रश्न पडला असेल, पुढे आम्ही दोन्ही फोन्सच्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे. यातून चित्र स्पष्ट होईल.

OPPO Reno 8 5G vs OnePlus Nord 2T 5G: price in India

OPPO Reno 8 5G शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आहे. हा फोन एकच स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध झाला. डिवाइसच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,990 रुपये आहे.

दुसरीकडे OnePlus Nord 2T 5G दोन व्हेरिएंटमध्ये येतो. बेस मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 28,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील.

Design

OPPO Reno 8 स्मार्टफोन खूप स्टायलिश डिजाइनसह बाजारात आला आहे. फोनच्या फ्रंटला चारही बाजूंना बेजल लेस डिजाइन देण्यात आली आहे. तसेच टॉप लेफ्ट कॉर्नरला पंच होल कॅमेरा आहे. फोनच्या मागे असलेल्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे पावर बटन व डावीकडे वॉल्यूम बटन आहेत. तसेच बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल मिळते.

वनप्लस नॉर्ड 2टी प्लास्टिक मिड-फ्रेमसह एक ग्लास सँडविच डिजाइनसह येतो. फोनच्या मागे सिल्की-स्मूद ग्लास आणि फ्रंटला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. मागे ट्रिपल लेन्स असलेला मोठा कॅमेरा मॉड्यूल आहे. OnePlus Nord 2T मध्ये कोणतीही फॅन्सी LED नाही. त्याऐवजी यात Apple iPhones प्रमाणे एक अलर्ट स्लायडर आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉटचा ऑप्शन पण मिळतो. हा फोन झेड फॉग आणि ग्रे शॅडो रंगात विकत घेता येईल.

Processor, RAM, and Storage

OPPO Reno8 मध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेटदही टाकडे देण्यात आली हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड कलरओएस 12.1 वर चालतो. तसेच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि Mali G77 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची UFS3.1 स्टोरेज मिळते.

Display

OPPO Reno8 मध्ये 6.43-inch FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा स्क्रीन टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे. हा डिस्प्ले नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारे एचडी सर्टिफाईड आहे. तसेच हा एक SGS Eye Care Display आहे.

नॉर्ड 2 टीसाठी मध्ये कंपनीनं नॉर्ड 2 पॅनलचा उपयोग केला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR सर्टिफिकेशन सह 6.43-इंचाचा फुल HD + AMOLED पॅनल देण्यात आला आहे.

Camera

OPPO Reno8 मध्ये MariSilicon X हा वेगळा चिपसेट खास फोटोग्राफीसाठी देण्यात आला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी, 2MP चा B&W सेन्सर, आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX709 शूटर मिळतो.

दूसरीकडे OnePlus Nord 2T 5G मध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यात प्रायमरी कॅमेरा OIS, EIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर f/18 अपर्चरसह देण्यात आला आहे. सोबतीला 8MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला AI सेल्फीसाठी 32MP Sony IMX615 सेल्फी शूटर आहे.

Battery and Connectivity

दोन्ही फोनमध्ये 4,500mAh battery देण्यात आली आहे. तसेच दोन्ही फोन 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करतात. ओप्पोनं मात्र दावा केला आहे की, OPPO Reno8 फोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होईल.

OPPO Reno 8 मध्ये 5G, 4G+, 4G, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट आहे. तसेच यात Bluetooth v5.3 आणि Bluetooth Low Energy (BLE) चा सपोर्ट देखील मिळतो. OnePlus Nord 2T 5G मध्ये ड्युअल-बँड 4G आणि 5G सपोर्ट, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS आणि डेटा ट्रांसफरसाठी USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/feed/ 0
वनप्लसला टक्कर देण्यासाठी 50MP च्या धमाकेदार कॅमेऱ्यासह OPPO Reno 8 आणि Reno 8 Pro लाँच https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-and-reno8-pro-india-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-and-reno8-pro-india-launched-check-price-and-specifications/#respond Tue, 19 Jul 2022 05:51:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11509 OPPO Reno8 सीरीजचे स्मार्टफोन्स MediaTek Dimensity प्रोसेसर, 4,500mAh बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्जिंगसह भारतात आले आहेत.

The post वनप्लसला टक्कर देण्यासाठी 50MP च्या धमाकेदार कॅमेऱ्यासह OPPO Reno 8 आणि Reno 8 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Reno8 सीरीज भारतात लाँच झाली आहे कंपनीनं या सीरिजमध्ये OPPO Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. जे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart, OPPO च्या ऑफिशियल वेबसाईटसह ऑफलाईन स्टोर्समधून विकत घेता येतील. OPPO Reno8 सीरीजचे स्मार्टफोन्स MediaTek Dimensity प्रोसेसर, 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC चार्जिंग आणि Android 12 सह सादर करण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी वेगळा MariSilicon X चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO Reno 8 स्पेसिफिकेशन्स

  • 6.43-इंचाचा FHD+ AMOLED (90Hz रिफ्रेश रेट)
  • MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर 12GB पर्यंत रॅम 256GB स्टोरेज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC फास्ट चार्ज
  • Android 12 ColorOS 12.1

OPPO Reno8 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी OPPO चा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो.

OPPO Reno8 स्मार्टफोनमध्ये MariSilicon X पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 आहे, सोबत 2MP चा B&W सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo Reno8 सीरीजच्या या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे.

OPPO Reno 8 Pro स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-इंच Full HD+ AMOLED (120Hz रिफ्रेश रेट)
  • MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर
  • 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC चार्ज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 बेस्ड ColorOS 12.1

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करतो. ओप्पोचा हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

कॅमेरा ऑप्टिक्स पाहता यात MariSilicon X पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, सोबतीला 8MP IMX355 अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP OV02B10 मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोनमध्ये 32MP IMX709 कॅमेरा सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.

OPPO Reno8 सीरीजची किंमत

OPPO Reno8 स्मार्टफोन शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केले गेले आहेत. याची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. तर ग्लेज ग्रीन, ग्लेज ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये आलेला OPPO Reno8 Pro स्मार्टफोनचा बेस मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO Reno8 स्मार्टफोनची विक्री ओप्पोच्या ऑफिशियल वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर 25 जुलैपासून तर प्रो व्हेरिएंटची विक्री 19 जुलैपासून सुरु होईल.

The post वनप्लसला टक्कर देण्यासाठी 50MP च्या धमाकेदार कॅमेऱ्यासह OPPO Reno 8 आणि Reno 8 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-and-reno8-pro-india-launched-check-price-and-specifications/feed/ 0
नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-series-to-launch-in-india-on-18-july-check-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-series-to-launch-in-india-on-18-july-check-price-specification/#respond Sun, 17 Jul 2022 13:18:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11468 Oppo Reno8 आणि Reno8 Pro स्मार्टफोन भारतात 18 जुलैला लाँच होणार आहेत.

The post नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Reno 8 सीरीज 18 जुलैला भारतात लाँच होणार आहे. सीरीज अंतगर्त Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro भारतीयांच्या भेटीला येतील. हे दोन्ही हँडसेट आधीच चीनमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल बरीचशी माहिती आधीपासूनच उपलब्ध आहेत. कंपनीनं मात्र Reno 8 सीरीजचे फोन्स MediaTek Dimensity प्रोसेसर, लिक्विड कूलिंग आणि जास्त मेमरीसह लाँच होतील अशी माहिती दिली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला लाँचपूर्वीच OPPO Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro च्या सर्व संभाव्य फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि प्राईसची माहिती देणार आहोत.

Oppo Reno 8 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 8 स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात येईल. ओप्पोच्या या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1300 प्रोसेसर दिला जाईल. आगामी Reno8 स्मार्टफोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतचा स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हा अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12.1 वर चालेल. हे देखील वाचा: पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन

अपकमिंग Oppo Reno 8 स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ओप्पोच्या या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. Oppo Reno 8 स्मार्टफोनची किंमत भारतात 29500 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

OPPO Reno8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno8 Pro फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. कंपनी Gorilla Glass 5 ची सुरक्षा स्क्रीनला देईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात येईल. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालेल.

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो शूटर मिळेल. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल. ओप्पोच्या या फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी Marisilicon चिपसेट मिळेल. ओप्पोच्या आगामी फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

OPPO Reno8 Pro ची किंमत

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनचा हाय-अँड व्हेरिएंट 12GB रॅम व 256GB स्टोरेजसह भारतात 52,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. पहिल्यांदाच ओप्पोचा स्मार्टफोन 50 हजारांच्या सेग्मेंटमध्ये सादर केला जाईल. याआधी कंपनीनं इतका महाग कोणताही स्मार्टफोन सादर केलेला नाही. 12GB मॉडेलसह 8GB+128GB आणि 8GB+256GB ऑप्शन देखील भारतात येतील.

The post नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-series-to-launch-in-india-on-18-july-check-price-specification/feed/ 0
OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली, कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-series-will-launch-in-india-on-18-july-2022/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-series-will-launch-in-india-on-18-july-2022/#respond Tue, 05 Jul 2022 13:48:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11140 OPPO Reno8 Pro स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 8100 Max SoC सह सादर केला जाईल

The post OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली, कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO आपले प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Reno सीरिजमध्ये सादर करते. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लेटेस्ट OPPO Reno8 सीरिज सादर करण्यात आली आहे, तेव्हापासून या सीरिजच्या भारतीय लाँचची वाट बघितली जात आहे. आता माहिती आली आहे की, OPPO Reno8 सीरीज भारतात 18 जुलैला एंट्री करेल. चिनी स्मार्टफोन कंपनीनं आपल्या आगामी रेनो सीरीजच्या इंडिया लाँचची तारीख सांगितली आहे.

Oppo Reno8 सीरीज 18 जुलैला भारतात संध्याकाळी 6 वाजता लाँच केली जाईल. या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण तुम्ही कंपनीच्या YouTube चॅनेलसह सोशल मीडिया हँडलवरून बघू शकता. भारतात OPPO Reno8 सीरीज अंतर्गत चीनमध्ये लाँच झालेले Oppo Reno 8 आणि Oppo Reno8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. भारतात येणारा OPPO Reno8 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Reno8 Pro+ चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही या सीरिजच्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OPPO Reno 8 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno8 Pro बद्दल चर्चा आहे की हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 8100 Max SoC सह येईल. सोबतीला फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी MariSilicon X प्रोसेसर देण्यात येईल, 4K अल्ट्रा नाईट व्हिडीओ शूटिंग सारखे फीचर्स जोडेल. Geekbench च्या लिस्टिंगमधून समजले आहे की या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. Oppo Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल.

कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर असेल. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP Sony IMX709 सेन्सर मिळेल. ओप्पोच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल.

OPPO Reno8 स्मार्टफोन या सीरिजमधील स्वस्त हँडसेट असेल. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1300 SoC मिळते, जिचा स्पीड 3GHz वर क्लॉक करण्यात आला आहे. Reno8 स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तसेच सेल्फीसाठी 32MP Sony IMX709 सेन्सर असेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जसह देण्यात येईल.

OPPO Reno 8 सीरीजची संभाव्य किंमत

Oppo Reno8 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात येऊ शकतात. यातील 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 29,999 रुपये असू शकते. 8GB रॅम व 256GB मॉडेल 31,990 आणि 12GB रॅम व 256 मॉडेल 33,990 रुपयांमध्ये सादर केला जाईल. तसेच Oppo Reno8 Pro स्मार्टफोन भारतात 42,000 ते 46,000 रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो.

The post OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली, कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno8-series-will-launch-in-india-on-18-july-2022/feed/ 0