पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन

Nothing Phone 1 भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. आयताकृती ठोकळ्यांच्या गर्दीत झगमगत्या स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. जगभरातील टेक प्रेमी या हँडसेटची आतुरतेने वाट बघत होते. कंपनीनं Return to Instinct नावाच्या ग्लोबल इव्हेंटमधून Snapdragon 778G+ चिपसेट, , 120Hz AMOLED display आणि 50MP dual rear camera असेलला स्मार्टफोन सादर केला आहे. जर तुम्ही देखील हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही पारदर्शक डिजाईनसह आलेल्या Nothing Phone (1) ची टॉप 5 वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

Nothing Phone (1) ची पाच वैशिष्ट्ये

  • हटके डिजाइन
  • सुंदर डिस्प्ले
  • जबरदस्त कॅमेरा
  • पावरफुल बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

1. Nothing Phone (1) ची कूल डिजाइन

नथिंग फोन (1) ची डिजाइन पाहता हँडसेटच्या बॅक पॅनलमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॉडी मेटल फ्रेम, टेक्सचर्ड फिनिश आणि बॉटम लेफ्ट कॉर्नरवर ब्रँडिंग आहे. फोनच्या डावीकडे एक पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर सुसाट आहे. नथिंग फोन (1) मध्ये मागच्या बाजूला टॉगल स्विच आहे. तसेच फोन फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे पंच होल देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजललेस आहे.

नथिंग फोन (1) चं मुख्य आकर्षण पारदर्शक बॅक पॅनलवर असलेलं ग्लिफ एलईडी लाईट इंटरफेस. जवळपास सर्वच स्मार्टफोन एका ठराविक डिजाईनसह येत असताना एका नव्या कंपनीला ग्राहक आकर्षित करण्यासाठी हटके डिजाईनची आवश्यकता होती. फोनमधील सॉफ्टवेयरच्या मदतीनं बॅक पॅनलवरील ग्लिफ एलईडी लाईट कॉल आणि मेसेजसाठी रिंगटोनच्या आधारावर कस्टमाइज करता येते. एक लाल एलईडी स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु असताना ब्लिंक करते.

2. Nothing Phone (1) चा सुंदर डिस्प्ले

Nothing Phone (1) मध्ये 6.55-इंचाचा 10-बिट OLED पॅनल देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले 2400×1080 पिक्सेल रिजॉल्यूशन, HDR10+, 402PPI आणि 1200 निट्स पर्यंतच्या पीक ब्राईटनेससह सादर करण्यात आला आहे.

3. Nothing Phone (1) चा जबरदस्त कॅमेरा

Nothing Phone (1) च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो OIS आणि EIS इमेज स्टॅबलायजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये मागे ƒ/1.88 अपर्चरसह 50MP Sony IMX766 सेन्सर आणि ƒ/2.2 अपर्चरसह 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच डिवाइसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ƒ/2.45 अपर्चरसह 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.

4. Nothing Phone (1) ची पावरफुल बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग, 15W ची वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. नथिंग फोन (1) मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6 आणि 802.11 ए/बी/जी/, ब्लूटूथ 5.2, एनएफसी आणि 5 जी चे ऑप्शन मिळतात. तसेच हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर, फेशियल रिकग्निशन, ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि आयपी53 रेटिंगला सपोर्ट करतो. नथिंग फोन (1) अँड्रॉइड आधारित नथिंग ओएससह येतो.

5. Nothing Phone (1) चा प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

Nothing Phone (1) मध्ये पावरफुल परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU मिळतो. तसेच यात 12GB LPDDR5 RAM सह 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) ची किंमत आणि सेल

नथिंग फोन (1) चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 37,499 रुपये आहे, तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज यूनिटची किंमत 42,499 रुपये आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन दोन ब्लॅक आणि व्हाईट कलर्समध्ये 21 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि नथिंगच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येईल.

लाँच ऑफर अंतगर्त कंपनी नथिंग फोन (1) वर 1,000 रुपयांची सूट देत आहेत. तसेच हँडसेट प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्डवर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. नथिंग पावर 45W चार्जरची किंमत 2,500 रुपये आहे परंतु प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना हा 1,500 रुपयांमध्ये मिळेल. नथिंग ईयर (1) 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध होतील आणि Nothing Phone (1) प्री-ऑर्डर करणार्यांना 5,999 रुपये द्यावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here