Oppo Reno9 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:00:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo Reno9 5G लाँच https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno9-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno9-launched-know-price-and-specifications/#respond Thu, 24 Nov 2022 06:28:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15321 Oppo नं आज टेक मार्केटमध्ये आपली नवीन ओप्पो रेनो 9 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त Oppo Reno9, Oppo Reno9 Pro आणि Oppo Reno9 Pro Plus स्मार्टफोन लाँच झाले आहेत. या फोनमध्ये शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 9 या सीरीजचा सर्वात अफॉर्डेबल स्मार्टफोन आहे जो 64MP Camera, 32MP Selfie Camera, […]

The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo Reno9 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo नं आज टेक मार्केटमध्ये आपली नवीन ओप्पो रेनो 9 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त Oppo Reno9, Oppo Reno9 Pro आणि Oppo Reno9 Pro Plus स्मार्टफोन लाँच झाले आहेत. या फोनमध्ये शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 9 या सीरीजचा सर्वात अफॉर्डेबल स्मार्टफोन आहे जो 64MP Camera, 32MP Selfie Camera, 12GB RAM आणि Snapdragon 778 Plus चिपसेटला सपोर्ट करतो. पुढे Oppo Reno9 Price आणि Specifications डिटेल्स देण्यात आले आहेत.

Oppo Reno9 Specifications

ओप्पो रेनो 9 स्मार्टफोनमध्ये कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आकार 6.7 इंच असून याचे रिजोल्यूशन फुलएचडी+ असेल. ही स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे. ज्यात स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा फिट असेल, हा एक नॅरो एज डिस्प्ले आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 160MP कॅमेरा आणि सर्वात पावरफुल प्रोसेसर; HONOR 80 Pro चे सर्वच फीचर्स दर्जेदार

32-mp-selfie-camera-phone-Oppo-reno9-launched-know-price-and-specifications

प्रोसेसिंगसाठी Oppo Reno9 फोनमध्ये Snapdragon 778 Plus चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला स्मार्टफोन 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओप्पोचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन अँड्रॉइड आधाराती कंपनीच्या कलर ओएसवर चालेल.

फोटोग्राफीसाठी Oppo Reno9 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला आणखी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो रेनो 9 स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, जो ऑटो फोकस टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

32-mp-selfie-camera-phone-Oppo-reno9-launched-know-price-and-specifications

Oppo Reno9 स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 9 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. Oppo Reno9 स्मार्टफोनची जाडी 7.19mm आहे तर याचे वजन 174 ग्राम आहे. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आला 108MP कॅमेरा असलेला Redmi Note 11S; सोबत 5000mAh ची बॅटरी

Oppo Reno9 Price

ओप्पो रेनो 9 स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 2,499 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 28,600 रुपये आहे. तर Oppo Reno9 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 2,699 युआन म्हणजे 30,900 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच झाला आहे. 12GB RAM + 512GB Storage असलेला मॉडेल 2,999 युआन अर्थात 34,300 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन चीनी मार्केटमध्ये omorrow Friday, Haoyuehei, आणि Slighly Drunk कलर्ससह आला आहे.

ही बातमी हिंदीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo Reno9 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-camera-phone-oppo-reno9-launched-know-price-and-specifications/feed/ 0