160MP कॅमेऱ्यासह HONOR 80 Pro झाला लाँच

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनरनं टेक मंचावर आपली नवीन आणि पावरफुल Honor 80 Series सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन 5G Phone लाँच झाले आहेत, त्यांची नावे Honor 80 SE, Honor 80 आणि Honor 80 Pro अशी आहेत. सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आलेली ऑनर 80 सीरीज लवकरच जगभरात लाँच केली जाईल. या सीरिजमधील सर्वात शक्तिशाली ऑनर 80 प्रो स्मार्टफोन 160MP कॅमेरा, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन1 चिपसेटसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती.

HONOR 80 Pro Specifications

Honor 80 Pro Display

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनर 80 प्रो 5जी फोन 19.8:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2700 × 1224 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही ड्युअल पंच-होल स्क्रीन आहे जिच्या कडा कर्व्ड आहेत तसेच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पिल शेप देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 1000निट्स ब्राइटनेस, 437पीपीआय आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्टे करते. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आला 108MP कॅमेरा असलेला Redmi Note 11S; सोबत 5000mAh ची बॅटरी

Honor 80 Pro Rear Camera

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनर 80 प्रो 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 160 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चरसह येतो. त्याचबरोबर Honor 80 Pro च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. या फोनची वाइड अँगल लेन्स मॅक्रो ऑप्शनसह येते.

Honor 80 Pro Selfie Camera

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनर 80 प्रो मध्ये तीन बॅक कॅमेऱ्यासह दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन ड्युअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. स्क्रीनवर बनलेल्या पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल पोर्टरेट प्रायमरी सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे तसेच Honor 80 Pro स्मार्टफोन 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जी डेप्थ-ऑफ-फिल्ड लेन्स आहे.

Honor 80 Pro Processor

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनर 80 प्रो 5जी फोन अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित मॅजिकओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन1 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी Honor 80 Pro एड्रेनो 730 जीपीयू मिळतो. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच, यात मिळते 19GB RAM ची ताकद

Honor 80 Pro RAM

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

ऑनर 80 प्रो 5जी तीन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. या मोबाइल फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दुसरा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या Honor 80 Pro मध्ये 12 जीबी रॅमसह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Honor 80 Pro Battery

160 MP Camera phone honor 80 pro launched know price and specifications

दमदार प्रोसेसरसह या फोनमध्ये गेमिंग सोपी होते तसेच मोबाइल गेमिंगची मजेत अडथळा येऊ नये म्हणून ऑनर 80 प्रो 5जी फोन मोठ्या मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे. Honor 80 Pro स्मार्टफोन 4,800एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जो 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे.

HONOR 80 Pro Price

8GB RAM + 256GB Storage = 3499 yuan (जवळपास 39,900 रुपये)

12GB RAM + 256GB Storage = 3799 yuan (जवळपास 43,500 रुपये)

12GB RAM + 512GB Storage = 4099 yuan (जवळपास 46,900 रुपये)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here