Redmi Note 11S वर मिळतोय 3000 रुपयांचा बँक डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनवर विक्री सुरु

108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 11S Amazon India वर खूप स्वस्तात मिळत आहे. सध्या Xiaomi Black Friday Sale सुरु आहे, या सेल दरम्यान या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा अ‍ॅडिशनल एक्सचेंज बोनस आणि बँक डिस्काउंट मिळत आहे. Redmi Note 11S स्मार्टफोनचे प्रमुख फीचर्स पाहता यात Mediatek Helio G96 प्रोसेसर, क्वॉड रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते. पुढे आम्ही तुम्हाला रेडमीच्या या दमदार स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि ऑफर्सची माहिती दिली आहे.

Redmi Note 11S किंमत आणि ऑफर्स

Redmi Note 11S स्मार्टफोन 16499 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 1000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळत आहे. तसेच रेडमीच्या या फोनवर 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. जर तुमच्या जुन्या फोनची व्हॅल्यू 1500 रुपये असेल तर एकूण या फोनवर 5500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे फोनची इफेक्टिव्ह किंमत 11,499 रुपये होईल. जुन्या फोनची व्हॅल्यू त्याच्या कंडीशनवर अवलंबुन असेल. रेडमी नोट 11S स्मार्टफोनवर मिळणारा बँक डिस्काउंट पाहता HDFC बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच, यात मिळते 19GB RAM ची ताकद

Redmi Note 11S चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

  • 108 MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप
  • 16 MP सेल्फी कॅमेरा
  • 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43 इंचाचा डिस्प्ले
  • MediaTek Helio G96 प्रोसेसर
  • 5000mAh बॅटरी आणि 33W चार्जर

Redmi Note 11S 5G स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ 1080 x 2400 पिक्सल आहे. या फोनच्या फ्रंटला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे.

फोनमध्ये Mediatek Helio G96 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे, जोडीला 8GB पर्यंत RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज वाढवण्यासाठी फोनमध्ये microSD कार्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 5000 mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: ‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये Redmi Note 11S 5G मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळतो. फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 11S स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, कंपास आणि व्हर्च्युअल प्रोसिमिटी सेन्सर देखील मिळतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here