Phone Blast - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 May 2023 10:36:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 केरळमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातल्या फोननं घेतला पेट; व्हिडीओ देखील आला समोर https://www.91mobiles.com/marathi/phone-explodes-in-pocket-of-70-year-old-man-in-kerala/ https://www.91mobiles.com/marathi/phone-explodes-in-pocket-of-70-year-old-man-in-kerala/#respond Fri, 19 May 2023 10:36:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21034 केरळमधील त्रिशुरमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातील फोन ब्लास्ट झाला आहे. ही घटना गुरुवार सकाळी 10 वाजता घडली आहे, जेव्हा इलियास नावाची व्यक्ती मारोटिचल भागातील एका दुकानात बसून चहा पीत होते. अचानक त्यांच्या खिशात एक स्फोट झाला आणि आग लागली. त्यांनी त्वरित आग विझवली. ह्या घटनेत इलियास ह्यांना कोणतीही दुखापत झाली आंही. एका महिन्यापेक्षा कमी काळात […]

The post केरळमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातल्या फोननं घेतला पेट; व्हिडीओ देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • केरळमधील त्रिशुर मधील ही घटना
  • दुकानात बसून चहा पिताना फोननं घेतला पेट
  • एका महिन्यात केरळमध्ये तीन फोन ब्लास्ट

केरळमधील त्रिशुरमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातील फोन ब्लास्ट झाला आहे. ही घटना गुरुवार सकाळी 10 वाजता घडली आहे, जेव्हा इलियास नावाची व्यक्ती मारोटिचल भागातील एका दुकानात बसून चहा पीत होते. अचानक त्यांच्या खिशात एक स्फोट झाला आणि आग लागली. त्यांनी त्वरित आग विझवली. ह्या घटनेत इलियास ह्यांना कोणतीही दुखापत झाली आंही. एका महिन्यापेक्षा कमी काळात केरळमध्ये मोबाइल फोनमध्ये ब्लास्ट होण्याची ही तिसरी घटना आहे.

समचार एजेंसी पीटीआयनुसार, ह्या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. ओलूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम इलियास यांच्याशी फोनवरून चौकशी केली आणि घटनेची माहिती घेतली.

एक वर्षांपूर्वी घेतला होता फोन

इलियास यांनी सांगितलं की त्यांनी जवळपास वर्षभरापूर्वी 1000 रुपयांमध्ये फीचर फोन घेतला होता. त्यांचा फोन आतापर्यंत कोणत्याही समस्येविना ठीक सुरु होता. अचानक चहा पिताना फोनमध्ये स्फोट झाला आणि त्यांच्या खिशाला आग लागली.

गेल्या आठवड्यात देखील खिशात फोननं घेतला होता पेट

केरळमधील कोझिकोडमधील एका तरुणाच्या खिशात फोनचा याचंच स्फोट झाला होता. फोन गरम झाल्यानंतर अचानक त्यात आग लागली. परंतु त्या फोनचा पाच ते सहा महिन्यांपूर्वी डिस्प्ले रिपेयर करण्यात आला होता. याआधी केरळमध्ये फोन ब्लास्ट झाल्यावर 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेळेवेळी फोनमध्ये ब्लास्ट होण्याच्या बातम्या येत असतात.

फोनमध्ये आग लागण्याची कारणे

  • मोबाइल फोन ऑरिजनल बॅटरी न वापरणे
  • फोन ऑफिशियल सर्व्हिस सेंटरवरून रिपेयर न करणे
  • दुसऱ्या ब्रँड किंवा डुप्लिकेट चार्जरचा वापर करणे
  • चार्जिंग दरम्यान फोनचा वापर करणे
  • फोनमध्ये एखादा मेन्यूफॅक्चरिंग फॉल्ट असणे

The post केरळमध्ये 70 वर्षीय वृद्धाच्या खिशातल्या फोननं घेतला पेट; व्हिडीओ देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-explodes-in-pocket-of-70-year-old-man-in-kerala/feed/ 0
व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य https://www.91mobiles.com/marathi/kerala-girl-8-dies-after-mobile-phone-explodes/ https://www.91mobiles.com/marathi/kerala-girl-8-dies-after-mobile-phone-explodes/#respond Tue, 25 Apr 2023 06:30:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20440 मोबाइल फोनचा वापर करत असताना त्यात कथितरित्या स्फोट झाल्यामुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. केरळ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी ‘पीटीआय-भाषा’ ला सांगितलं की तिरुविलवमाला मध्ये सोमवारी म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी रात्री दहा वाजता आदित्यश्रीच्या मोबाइल फोनमध्ये स्फोट झाला. त्यांनी सांगितलं की आदित्यश्रीचा मृत्यू झाला. ती जवळच्या Christ New Life School […]

The post व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • केरळातील त्रिशुर मध्ये घडला मोबाइलचा स्फोट
  • या स्फोटात 8 वर्षाची मुलगी जखमी झाली
  • पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

मोबाइल फोनचा वापर करत असताना त्यात कथितरित्या स्फोट झाल्यामुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. केरळ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी ‘पीटीआय-भाषा’ ला सांगितलं की तिरुविलवमाला मध्ये सोमवारी म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी रात्री दहा वाजता आदित्यश्रीच्या मोबाइल फोनमध्ये स्फोट झाला. त्यांनी सांगितलं की आदित्यश्रीचा मृत्यू झाला. ती जवळच्या Christ New Life School मध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

आठ वर्षीय आदित्यश्री तिरुविलवमाला मधील एका शाळेत ईयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. सोमवारी रात्री मोबाइलवर व्हिडीओ पाहत असताना हातातील फोनचा स्फोट झाला. रिपोर्ट्सनुसार ही घटना रात्री 10.30 च्या सुमारास घडली. वैद्यकीय उपचार करून देखील तिला वाचवण्यात यश आलं नाही. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास हाती घेतला आहे तसेच फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार हा फोन तीन वर्षांपूर्वी विकत घेण्यात आला होता, तसेच यातील बॅटरी गेल्यावर्षी बदलण्यात आली होती. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा आदित्यश्री आपल्या आजीसोबत होती तसेच हा फोन चार्जिंगला लावून वापरला जात होता असं देखील समोर आलं आहे. हा मोबाइल कोणत्या कंपनीचा होता तसेच याचा मॉडेल नंबर कोणता होता हे मात्र स्पष्ट झालं नाही. मोबाइल फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे आठ वर्षीय आदित्यश्रीच्या चेहरा आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. परंतु त्यानंतर उपचार करून देखील काही फायदा झाला नाही आणि तिचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये देखील झाली होती दुर्घटना

काही दिवसांपूर्वी बिहारमधील फोन ब्लास्टची बातमी आम्ही दिली होती. तेव्हा शाओमी कंपनीच्या Xiaomi 11 Lite NE फोन मॉडेलचा स्फोट झाला होता. ही घटना बिहारमधील मोहाद्दीनगर, जिल्हा भागलपुरमधील आहे. एक शाओमी मोबाइल फोन युजर संजीव राजा यांच्या फोनमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही वेळाने त्या फोनमध्ये स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटातून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

The post व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kerala-girl-8-dies-after-mobile-phone-explodes/feed/ 0
धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/8-month-old-dies-in-phone-blast-mobile-explode-in-up/ https://www.91mobiles.com/marathi/8-month-old-dies-in-phone-blast-mobile-explode-in-up/#respond Wed, 14 Sep 2022 09:08:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13087 Redmi 6A Blast ची एक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती ज्यात Xiaomi Phone मध्ये स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता आता उत्तरप्रदेश (UP) मध्ये देखील अशीच एक दुर्घटना घडली आहे, जिथे Mobile Phone Explode झाल्यामुळे एका 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ज्या मोबाइलमध्ये धमाका झाला आहे तो एक keypad phone […]

The post धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi 6A Blast ची एक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती ज्यात Xiaomi Phone मध्ये स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता आता उत्तरप्रदेश (UP) मध्ये देखील अशीच एक दुर्घटना घडली आहे, जिथे Mobile Phone Explode झाल्यामुळे एका 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ज्या मोबाइलमध्ये धमाका झाला आहे तो एक keypad phone असल्याचं सांगण्यात आलं आहे जो चार्जिंग दरम्यान ब्लास्ट झाला आहे.

उत्तरप्रदेश मधील दुर्घटना

फोन ब्लास्टची ही दुर्घटना उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने जवळपास 6 महिन्यांपूर्वी एक नवीन कीपॅड असलेला मोबाइल फोन विकत घेतला होता. गेल्या रविवारी तिने हा मोबाइल फोन चार्जिंगला लावून ठेवला होता तसेच फोनच्या कडेला त्या महिलेची 8 महिन्याची मुलगी झोपली होती. हे देखील वाचा: सर्वांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या 5G Smartphone चा पहिला सेल आज; 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी

चार्जिंगवर असतानाच फोनमध्ये धमाका झाला आणि हा ब्लास्ट इतका खतरनाक होता की फोनच्या बाजूला झोपलेल्या मुलीचा जागेवर मृत्यू झाला. तपासातून समोर आले आहे की या कीपॅड मोबाइलची बॅटरी आधीच फुगली होती. दुर्घटनेच्या वेळी ज्या सॉकेटमध्ये फोन चार्जिंगला लावण्यात आला होता तो सोलर पॅनलशी जोडलेला होता. त्यामुळे अनबॅलेन्स्ड करंटमुळे फोनचे नुकसान झाले होते आणि त्याच्या बॅटरीचा स्फोट झाला.

Redmi 6A Blast

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. हे देखील वाचा: वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा

xiaomi Redmi 6a Blast

ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.

The post धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-month-old-dies-in-phone-blast-mobile-explode-in-up/feed/ 0
पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/#respond Mon, 12 Sep 2022 11:19:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13028 Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची […]

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि या दुर्घटनेत एका झोपेत असलेल्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.

Xiaomi Phone Blast

रेडमी 6ए ब्लास्टची बातमी एका व्यक्तीनं आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे. या ट्वीटमध्ये मनजीत नावाच्या व्यक्तीनं काही फोटोज शेयर करत दावा केला आहे की त्यांच्या काकीचा मृत्यु Xiaomi Redmi 6A Blast मुळे झाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मनजीतनं ब्लास्ट झालेल्या मोबाइल फोनच्या फोटो सोबतच मृत महिलेचा फोटो देखील शेयर केला आहे ज्यात मृतदेह स्पष्ट दिसत आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली

हे ट्वीट खूप संवेदनशील आहे त्यामुळे विवेक बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

रेडमी फोनमध्ये स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. शेयर केलेल्या फोटोजमध्ये बिछान्यावर रक्त दिसत दिसत आहे. तसेच फोन देखील पूर्णपणे जळाला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट

xiaomi Redmi 6a Blast

शाओमीनं व्यक्त केला शोक

ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/feed/ 0
Nokia च्या फोन मध्ये झाला ब्लास्ट, तुम्ही मात्र हि मोठी चूक करू नका https://www.91mobiles.com/marathi/nokia-phone-catches-fire-kerala-man-with-burn-injuries/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-phone-catches-fire-kerala-man-with-burn-injuries/#respond Mon, 09 Nov 2020 13:35:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8868 खासकरून उशीखाली किंवा फोन वर दबाव पडेल अश्या ठिकाणी फोन ठेऊ नका. फोन थंड राहील अश्या ठिकाणी फोन ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा.

The post Nokia च्या फोन मध्ये झाला ब्लास्ट, तुम्ही मात्र हि मोठी चूक करू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन्स आपल्या आयुष्याचा असा भाग बनले आहेत कि आपण त्यांच्याविना एक पाऊल देखील टाकू शकत नाही. इतकेच नव्हे तर झोपताना पण आपण आपला फोन जवळ ठेवतो. अश्यावेळी जेव्हा स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या घटना होतात तेव्हा आपल्याला धक्का बसतो. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि यात सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. आज पुन्हा एकदा मोबाईल फोन ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळच्या चंद्रा बाबू नावाच्या एका 53 वर्षीय व्यक्ती सोबत हि घटना घडली आहे, ज्यात त्यांना जखम पण झाली आहे.

मनोरमाच्या एका रिपोर्टनुसार हि घटना तेव्हा घडली जेव्हा पेशाने ऑटो रिक्शा ड्राइवर चंद्रा बाबू फोन आपल्या उशीखाली ठेऊन आराम करत होते. सोमवारी सकाळी केरळच्या कोल्लम मधील ओचिरा मध्ये राहणारे चंद्रा बाबू जेव्हा झोपेत होते, तेव्हा त्यांच्या उशीखाली ठेवलेला नोकियाचा मोबाईल ब्लास्ट झाला ज्यामुळे ते जखमी झाले.

चंद्र बाबूने टीएनएमला सांगितले कि मी एका प्रवाश्याला त्रिवेंद्रम अंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडून घरी परतलो होतो. मी थकलो होतो म्हणून मला झोप आली. माझा खांदा दुखू लागला म्हणून मला जाग आली. जेव्हा मी अंथरुणावर बघितले, तेव्हा उशीचा कोपरा जळला होता जिथे फोन ठेवला होता आणि फोन मधून ठिणग्या उडत होत्या.

बाबू यांनी सांगितले कि त्यांना अजूनही समजले नाही कि फोन मध्ये आग कशी लागली. रिपोर्टनुसार ते एकटे होते आणि जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांनी शर्ट नव्हता घातला. चटका बसू लागल्यावर त्यांनी फोन जमिनीवर फेकला आणि त्वरित उपचार करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेले.

हे देखील वाचा :

हि चूक करू नका ब्लास्ट होऊ शकतो फोन

आपल्या पैकी अनेक लोक झोपताना फोनचा वापर करतात आणि तो आपल्या जवळ ठेवतात. खासकरून उशीखाली किंवा फोन वर दबाव पडेल अश्या ठिकाणी फोन ठेऊ नका. फोन थंड राहील अश्या ठिकाणी फोन ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा.

VIA: The News Minute

The post Nokia च्या फोन मध्ये झाला ब्लास्ट, तुम्ही मात्र हि मोठी चूक करू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-phone-catches-fire-kerala-man-with-burn-injuries/feed/ 0
Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/#respond Mon, 01 Jun 2020 12:23:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7236 सॅमसंग संबंधित एक धक्कादायक बातमी पण समोर आली आहे, ज्यातून समजले आहे कि कंपनीच्या Samsung Galaxy A20e स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

The post Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेल्या काही दिवसांत वेगाने पुढे जात आहे. नवीन टेक्नोलॉजी आणि शानदार डिजाईन व स्पेसिफिकेशन्स असलेले सॅमसंग फोन आता कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होत आहेत, जे सॅमसंगचा यूजर बेस मजबूत करत आहेत. सध्या भारतात पण सॅमसंग फोनच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. याच महिन्यात Samsung ने अनेक स्मार्टफोन्स बाजारात घेऊन येणार आहे, ज्याची वाट यूजर्स पण बघत आहेत. पण यात आता सॅमसंग संबंधित एक धक्कादायक बातमी पण समोर आली आहे, ज्यातून समजले आहे कि कंपनीच्या Samsung Galaxy A20e स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

Samsung Galaxy A20e आग लागण्याची घटना भारतातील नाही, हि कॅलिफोर्निया मध्ये समोर आली आहे. DailyMail च्या बातमी वरून समजले आहे कि कॅलिफोर्नियाचे रहिवाशी Kenji Yanase सॅमसंगचा गॅलेक्सी ए20ई स्मार्टफोन वापरत होते आणि त्यांच्या फोन मध्ये आग लागली आहे. केंजी यांनी आपल्या फोनचा वीडियो इंटरनेट वर अपलोड पण केला आहे जिथे जळालेल्या फोन आणि त्याचे तुटलेले पार्टस दिसत आहेत. रिपोर्टनुसार यूजरचा दावा आहे कि फोन बॅटरी मधून आधी ठिणग्या येऊ लागल्या आणि त्यानंतर संपूर्ण डिवाईस मध्ये आग लागली तसेच त्याचे घर पण काळ्या धुराने भरून गेले.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए20ई फोनची स्क्रीन डेड झाली होती, त्यानंतर यूजर केंजी यांनी फोनचा बॅक पॅनल उघडून बघण्यास सुरवात केली. केंजी यांनी सांगितले कि फोन त्यांच्या हातातच होता आणि अचानक बॅटरी मधून ठिणग्या येऊ लागल्या आणि काही क्षणात फोन एखाद्या फाटक्या प्रमाणे जळू लागला. फोन वर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला पण आगा थांबली नाही.

यूजरने सांगितले कि फोन जाळल्यामुळे त्याच्या घरात काळा धूर झाला आणि वेगळा दुर्गंध येऊ लागला. आग न विझल्यामुळे केंजी यांनी जळत असलेला Samsung Galaxy A20e एका भांड्यात ठेऊन घराबाहेर काढला. मीडिया रिपोर्टनुसार यूजरच्या मते फोनच्या बॅटरी मध्ये आग लागली होती तसेच नंतर त्यांनी बघितले कि फोनचा मदरबोर्ड स्पष्ट दिसत होता.

मीडिया रिपोर्टनुसार सॅमसंग पब्लिक स्टेटमेंट प्रसिद्ध करत सांगितले आहे कि कंपनीचा Galaxy A सीरीज स्मार्टफोन्सच्या क्वॉलिटी वर पुरेपूर विश्वास आहे आणि सॅमसंगला आपल्या यूजर्सच्या सुरक्षेची काळजी पण आहे. कॅलिफोर्निया मध्ये सॅमसंगने यूजरकडून फोन घेतला आहे आणि आग लागण्याच्या कारणांची तसेच छेडछाडीच्या कारणांची तपासणी चालू आहे. Samsung Galaxy A20e मध्ये आग लागण्याच्या या घटनेमुळे जवळपास 4 वर्षांपूर्वीच्या Galaxy Note 7 च्या ब्लास्टच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

The post Samsung Galaxy A20e मध्ये लागली आग, Galaxy Note 7 च्या आठवणी झाल्या जाग्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20e-caught-fire-phone-burnt-blast-smartphone-into-flames/feed/ 0
Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/#respond Tue, 04 Feb 2020 12:43:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6499 Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची एखादी घटना घडते तेव्हा आपण सावध होतो. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि यात सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. आज पुन्हा एकदा मोबाईल फोन ब्लास्टची घटना समोर आली आहे. हि बातमी गुजरात मधील जामनगर मधून आली आहे जिथे मोबाईल रिपेरिंग शॉप वर एक फोन अचानक ब्लास्ट झाला. फोन Xiaomi चा होता आणि मॉडेल होता Redmi Note 6 Pro. शाओमी फोन ब्लास्ट होण्याची घटना याआधी पण भारतात अनेकदा झाली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली त्या नुसार ग्राहकाच्या फोन मध्ये काही तरी बिघाड होता आणि तो रिपेयर केला जात होता. जेव्हा फोनचा बॅक पॅनल उघडण्यात आला, तेव्हा अचानक Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

हि बातमी सर्वात आधी खबरगुजरात ने प्रकाशित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया वर या सीसीटीवी मध्ये कैद झालेला वीडियो टाकला आहे. त्याचबरोबर ज्या मोबाईल रिपेरिंग शॉप वर हि घटना घडली तिथल्या एका फेसबुक यूजर कुनाल सोनी याने पण आपल्या फेसबुक अकाउंट वर वीडियो अपडेट केला आहे. त्यांनी वीडियो मध्ये अशी माहिती दिली आहे कि मोबाईल टेक्निशियन किशनने जेव्हा फोन चेक करण्यासाठी तो उघडला तेव्हा बॅक पॅनल उघडल्याने फोन मध्ये धूर येऊ लागला आणि फोन ब्लास्ट झाला. फोन रिपेयरिंगचे काम ध्रुती मोबाईल द्वारे केले जात होते आणि तिथेच हि घटना घडली. फोन मध्ये आग लागताच धूर येऊ लागला आणि गोंधळ उडाला. हा फोन कोणत्या यूजरचा होता आणि यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे कि नाही याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. परंतु फोन ब्लास्टच्या बातमीने लोकांना नक्कीच घाबरवले आहे.

Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग, Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये झाली दुर्घटना#RedmiNote6Pro #PhoneBlast

91mobiles मराठी यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याचे वीडियो मध्ये स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनल उघडताना फोन मधून धूर येऊ लागला. तेव्हा फोन टेक्निशियनच्या हातात होता. घाबरून टेक्निशियनने फोन लगेच काउंटर वर ठेवला आणि धूर वेगाने वाढू लागला. यावेळी मोबाईलचा मालक पण तिथे उभा होता. जेव्हा धूर अचानक वाढला तेव्हा टेक्निशियनने फोन खाली जमिनीवर फेकून दिला.

Kunal Soni यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

सुदैवाने Xiaomi Redmi Note 6 Pro टेक्निशियनच्या हातात ब्लास्ट झाला नाही आणि या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हे प्रकरण समोर आल्यामुळे सर्विस सेंटर वरील लोक Xiaomi ब्रँड आणि त्याच्या प्रोडक्ट वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. आतापर्यंत याबाबत कंपनीचे कोणतेही विधान आले नाही. एक मोठी दुर्घटना टळली पण आता हे बघावे लागेल कि Xiaomi या घटनेसाठी कोणाला जबाबदार ठरवते सर्विस सेंटर कि एखादी व्यक्ती कि आपल्या प्रोडक्ट्स वर सेफ्टी साठी काही खास काम करेल.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/feed/ 0
फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/ https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/#respond Wed, 04 Dec 2019 12:18:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5964 पोलिसांनी प्रथमदृष्ट्या असे मानले कि फोन चार्जिंग वर असल्यामुळे कीत्तिसकला करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

The post फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात एक बातमी समोर आली होती कि ओरिसा मध्ये एक 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू फोन उशाला ठेऊन झोपल्यामुळे झाला होता. मीडिया रिपोर्ट वरून समजले कि मृतकाने आपला मोबाईल चार्ज वर लावून झोपला होता आणि रात्री त्याच्या फोन मध्ये ओवर चार्जिंगमुळे आग लागली आणि तसेच ब्लास्ट झाला आहे. या दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला होता. तर आता अशीच हैराण करणारी एक बातमी थाईलँड मधून आली आहे जिथे फोनला करंट लागल्यामुळे एक 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

विदेशी न्यूज वेबसाइट द सन कडून मिळालेल्या या बातमी मध्ये सांगण्यात आले आहे कि थाईलँड मध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीने फोन चार्जिंगला लावून आपल्या बेड वर ठेवला होता आणि नंतर तो मृत अवस्थेत बेड वर मिळाला. न्यूज रिपोर्ट नुसार 28 वर्षीय कीत्तिसक मूनकीत्तिने आपल्या बेड वरच एक्स्टेंशन बोर्ड मध्ये फोन चार्जिंगला लावला होता आणि तो बेड वर पडून तो वापरत होता. वापरताना त्याला करंट लागला आणि अंथरुणातच तरुणाचा मृत्यू झाला.

कीत्तिसक सोबत घडलेल्या या घटनेची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. रिपोर्टनुसार त्याच्या आईने पोलिसांना सांगितले आहे कि, ती घरात काम करत होती आणि काम करताना त्यांनी कीत्तिसकला कामात मदत करण्यासाठी आवाज दिला. जेव्हा अनेकदा हाक मारून पण तरुणाने उत्तर दिले नाही तेव्हा कीत्तिसकची आई त्याच्या खोलीत गेली तेव्हा तिने बघितले कि कीत्तिसक आपल्या अंथरुणात झोपलेला आहे आणि त्याच्या शरीरात हालचाल नव्हती.

मुलगा निपश्चित पडलेला पाहून त्याच्या आईने कीत्तिसकला अनेकदा हलवून बघितले तर तो पूर्णपणे बेशुद्ध होता. तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले आणि जेव्हा पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा कीत्तिसकला मृत घोषित करण्यात आले. पोलीस नुसार 28 वर्षीय युवकाच्या शरीरावर फोनची तार गुंडाळलेली होती तसेच कीत्तिसकचे दोन्ही हात आणि मनगटांवर भाजल्याचे निशाण होते. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या असे मानले कि फोन चार्जिंग वर असल्यामुळे कीत्तिसकला करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत शरीर पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले आहे.

एका महिन्यात हि दुसरी दुर्घटना आहे ज्यात दुर्लक्षामुळे मोबाईल यूजरला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना सावधानतेचा इशारा देत आहोत कि टेक्नॉलॉजीला वापर करताना हिशोबात करावा व्यसन लागू नये. 91मोबाईल्स आपल्या वाचकांना विनंती करत आहोत कि रात्री झोपताना फोन चार्जिंग वरून काढून स्वतःपासून दूर ठेऊन झोपा आणि कधीही फोन ओवर चार्ज करू नका. करंट, आग किंवा ब्लास्टच नाही तर मोबाईल मधून होणारा किरणोत्सर्ग मानवी शरीरासाठी घातक असतो.

The post फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/man-died-smartphone-plugged-into-charger-on-bed-electrocuted-in-thailand/feed/ 0
फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/ https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/#respond Thu, 14 Nov 2019 13:17:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5778 Google ने विश्वास दर्शवला आहे कि पुन्हा कोणत्याही युजरला अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही याची ते काळजी घेतील.

The post फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये आग लागल्यामुळे तसेच मोबाईलची बॅटरी ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना कुठून ना कुठून समोर येत असतात. याच आठवड्यात अशीच एक घटना ओरिसा मध्ये घडली होती ज्यात रात्री झोपताना स्मार्टफोन मध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्या स्फोटाने मोबाईल यूजरचा मृत्यु झाला होता. मोबाईलच्या या दुर्घटनेनंतर आता एक अशी घटना प्रकाशात आली आहे ज्यात स्मार्टफोन नाही तर हातातील स्मार्ट बँड मध्ये ब्लास्ट झाला आणि यात यूजर जखमी झाला आहे.

स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या बातम्यांमानंतर आता स्मार्ट बँड व फिटनेस बँड संकटाच्या छायेत आहेत. स्मार्ट बँड मध्ये आग लागल्याची आणि ब्लास्ट होण्याची हि बातमी अमेरिकेतून आली आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हि दुर्घटना झाली होती ज्यामुळे जगभरातील स्मार्ट बँड व फिटनेस बँड यूजर्स घाबरले आहेत. हैराणीची बाब म्हणजे ज्या बँड मध्ये ब्लास्ट झाला आहे तो कोणत्याही छोट्या किंवा नवख्या कंपनीचा बँड नव्हता तर टेक विश्वातील दिग्गज ब्रँडस मधील Fitbit चा फिटनेस बँड होता. अलीकडेच Fitbit कंपनीला Google ने विकत घेतले आहे.

Fitbit फिटनेस बँड मध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी आम्हाला द सन वेबसाइट वरून मिळाली आहे. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हि दुर्घटना गेल्या 5 नोव्हेंबरला झाली आहे आणि या घटनेचा शिकार अमेरिकेतील लोवा मधील इथन लँडर्स झाला आहे. रिपोर्ट नुसार लँडर्स ने आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे याची संपूर्ण माहिती दिली होती. लँडर्स ने सांगितले होते कि तो सवयीप्रमाणे फिटनेस बँड हातात घालून झोपला होता.

झोपेत त्याला अचानक आपल्या हातावर गर्मी जाणवली. गाढ झोपेत त्याला अचानक त्याला वाटले कि आपला हात जळत आहे. त्याने पहिले कि Fitbit बँड मधून धूर निघत होता. लँडर्स ने घाईत बँड काढण्याचा प्रयत्न केला पण बँड खूप जास्त गरम झाल्यामुळे काढता येत नव्हता. लँडर्स ने आणि त्याच्या पत्नीने प्रयत्न करून बँड हातातून काढला आणि त्यात स्फोट झाला.

जखमी लँडर्स हॉस्पिटल मध्ये गेला तिथे त्यावर उपचार सुरु झाले. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले कि लँडर्सला थर्ड डिग्री बर्न झाला आहे आणि त्याच्या त्वचेखाली मांसापर्यंत जखम पोचली आहे. लँडर्सचा हात बरा होण्यास वेळ लागेल. यावर Fitbit कंपनी म्हणाली कि त्यांना घटनेची माहिती मिळाली आहे आणि ते याची तपासणी करतील. Google ने विश्वास दर्शवला आहे कि पुन्हा कोणत्याही युजरला अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही याची ते काळजी घेतील.

The post फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/feed/ 0
ओरिसा मध्ये झाली मोठी दुर्घटना! उशाला फोन ठेऊन झोपला होता 22 वर्षीय तरुण, ब्लास्ट होऊन झाला मृत्य https://www.91mobiles.com/marathi/odisha-man-dies-after-mobile-phone-blast-near-head-while-sleeping/ https://www.91mobiles.com/marathi/odisha-man-dies-after-mobile-phone-blast-near-head-while-sleeping/#respond Mon, 11 Nov 2019 13:55:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5746 पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये स्मार्टफोन कोणत्या ब्रँडचा होता याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

The post ओरिसा मध्ये झाली मोठी दुर्घटना! उशाला फोन ठेऊन झोपला होता 22 वर्षीय तरुण, ब्लास्ट होऊन झाला मृत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नॉलॉजी जितकी एडवांस होते तितकी फायदेशीर ठरते. पण हीच टेक्नॉलॉजी गरजेपेक्षा जास्त वापरल्यास हानिकारक ठरते. मोबाईल आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सोबत असतो. पण निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो आणि हेच एका दुःखद घटनेतून समोर आले आहे. मोबाईल उशाला ठेऊन झोपल्यामुळे ओरिसा मधील एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि ओरिसा मधील एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू मोबाईल उशाला ठेऊन झोपल्यामुळे झाला आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि या 22 वर्षीय युवकाचे नाव कुना प्रधान होते जो गवंड्याचे काम करत होता. प्रधान रविवारी रात्री एका कंस्ट्रक्शन साइट वर तीन इतर कामगारांसोबत झोपला होता. कुना ने झोपताना आपला फोन चार्जिंगला लावून आपल्या जवळ ठेवला होता.

फोन उशाला ठेऊन कुना झोपला आणि फोन चार्जिंग वरच राहिला. चार्जिंग चालू असल्यामुळे सर्वात आधी फोनची बॅटरी फुल चार्ज होऊन ओवर हीट झाली आणि रात्री अचानक बॅटरी फुटली आणि फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. फोन डोक्या शेजारी असल्यामुळे कुना प्रधानला गंभीर जखम झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हि घटना ओरिसा मधील अटहाराबांकी भागातील आहे.

ब्लास्टची बातमी ऐकून पोलीस घटनास्थळी पोचले आणि तिथे कुना प्रधान त्यांना मृत अवस्तेत मिळाला. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी पाठवले. पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये स्मार्टफोन कोणत्या ब्रँडचा होता याचा खुलासा करण्यात आलेला नाही. कुना प्रधान याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब दुःखात बुडाले आहे पण हि घटना प्रत्येक मोबाईल यूजर्ससाठी एकप्रकारची चेतावणी आहे.

फोन मध्ये ब्लास्ट होण्याचे आणि बॅटरी मध्ये आग लागण्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. काही घटना परदेशात घडतात तर काही दुर्घटना भारतात घडतात. 22 वर्षीय युवकाच्या मृत्यू मधून प्रत्येकाने शिकावे कि फोन ओव्हरचार्ज करू नये आणि रात्री झोपताना फोन चार्जिंग वरून काढून आपल्यापासून लांब ठेवावा. फक्त ब्लास्ट नव्हे तर मोबाईल मधून होणारा किरणोत्सर्ग पण हानिकारक असतो.

The post ओरिसा मध्ये झाली मोठी दुर्घटना! उशाला फोन ठेऊन झोपला होता 22 वर्षीय तरुण, ब्लास्ट होऊन झाला मृत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/odisha-man-dies-after-mobile-phone-blast-near-head-while-sleeping/feed/ 0