
मोबाइल फोनचा वापर करत असताना त्यात कथितरित्या स्फोट झाल्यामुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. केरळ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी ‘पीटीआय-भाषा’ ला सांगितलं की तिरुविलवमाला मध्ये सोमवारी म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी रात्री दहा वाजता आदित्यश्रीच्या मोबाइल फोनमध्ये स्फोट झाला. त्यांनी सांगितलं की आदित्यश्रीचा मृत्यू झाला. ती जवळच्या Christ New Life School मध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
An eight-year-old girl studying in Class 3 at a school in #Kerala's Thrissur died when a mobile phone on which she was watching a video exploded in her hand.
The incident occurred late Monday night and despite the best efforts of giving medical attention, she passed away.
— IANS (@ians_india) April 25, 2023
आठ वर्षीय आदित्यश्री तिरुविलवमाला मधील एका शाळेत ईयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. सोमवारी रात्री मोबाइलवर व्हिडीओ पाहत असताना हातातील फोनचा स्फोट झाला. रिपोर्ट्सनुसार ही घटना रात्री 10.30 च्या सुमारास घडली. वैद्यकीय उपचार करून देखील तिला वाचवण्यात यश आलं नाही. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास हाती घेतला आहे तसेच फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आलं आहे.
रिपोर्ट्सनुसार हा फोन तीन वर्षांपूर्वी विकत घेण्यात आला होता, तसेच यातील बॅटरी गेल्यावर्षी बदलण्यात आली होती. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा आदित्यश्री आपल्या आजीसोबत होती तसेच हा फोन चार्जिंगला लावून वापरला जात होता असं देखील समोर आलं आहे. हा मोबाइल कोणत्या कंपनीचा होता तसेच याचा मॉडेल नंबर कोणता होता हे मात्र स्पष्ट झालं नाही. मोबाइल फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे आठ वर्षीय आदित्यश्रीच्या चेहरा आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. परंतु त्यानंतर उपचार करून देखील काही फायदा झाला नाही आणि तिचा मृत्यू झाला.
बिहारमध्ये देखील झाली होती दुर्घटना
काही दिवसांपूर्वी बिहारमधील फोन ब्लास्टची बातमी आम्ही दिली होती. तेव्हा शाओमी कंपनीच्या Xiaomi 11 Lite NE फोन मॉडेलचा स्फोट झाला होता. ही घटना बिहारमधील मोहाद्दीनगर, जिल्हा भागलपुरमधील आहे. एक शाओमी मोबाइल फोन युजर संजीव राजा यांच्या फोनमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही वेळाने त्या फोनमध्ये स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटातून कोणतीही जीवितहानी झाली नाही.














