POCO M4 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:05:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000mAh बॅटरीअसलेल्या Poco M4 Pro 5G च्या एमआरपीवर 23 टक्के डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/poco-m4-pro-5g-available-with-huge-discount-know-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m4-pro-5g-available-with-huge-discount-know-specs-price-sale-offer/#respond Mon, 28 Nov 2022 04:28:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15411 काही महिन्यांपूर्वी शाओमीच्या सब ब्रँड पोकोनं आपला सर्वात स्वस्त 5G फोन भारतात सदर केला होता. कंपनीनं POCO M4 Pro स्मार्टफोन POCO M3 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर केला होता. या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर हा जुन्या फोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडसह सादर करण्यात आला आहे आणि आता हा हँडसेट डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. […]

The post 5000mAh बॅटरीअसलेल्या Poco M4 Pro 5G च्या एमआरपीवर 23 टक्के डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी शाओमीच्या सब ब्रँड पोकोनं आपला सर्वात स्वस्त 5G फोन भारतात सदर केला होता. कंपनीनं POCO M4 Pro स्मार्टफोन POCO M3 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर केला होता. या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर हा जुन्या फोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडसह सादर करण्यात आला आहे आणि आता हा हँडसेट डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. फोनचे मुख्य फीचर्स पाहता यात 6.6-इंचाचा FHD + डिस्प्ले, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला या डिवाइसची किंमत आणि यावरील ऑफरची माहिती घेऊया.

POCO M4 Pro 5G ची किंमत आणि ऑफर

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेल 23 टक्के डिस्काउंटनंतर 12,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड ट्रँजॅक्शनवर ग्राहकांना 10 टक्के सूट दिली जाईल. तर सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ईएमआय ट्रँजॅक्शनवर 12 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना देखील या स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही हा फोन 451 रुपयांच्या मासिक हप्त्यावरही विकत घेऊ शकता. डिवाइस Power Black, Cool Blue आणि POCO Yellow कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

POCO M4 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आणि एक पंच-होल कॅमेरा आहे. फोन सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, सेल्फीसाठी फ्रंटला 16MP स्नॅपर, 3.5mm ऑडियो जॅक आणि Android 11 आधारित MIUI 12.5 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स मिळते.

कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ड्युअल 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. ऑप्टिक्स पाहता POCO M4 Pro 5G मध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक

POCO M4 Pro 5G मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या डिवाइसची साइज 163.56 x 75.78 x 8.75 मिमी आणि वजन 195 ग्राम आहे. फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 810 5G चिपसेटसह माली-जी57 एमसी2 जीपीयू द्वारे चालतो. हा POCO फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो जी मायक्रोएसडी कार्ड (1TB पर्यंत) च्या माध्यमातून वाढवता येते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 5000mAh बॅटरीअसलेल्या Poco M4 Pro 5G च्या एमआरपीवर 23 टक्के डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m4-pro-5g-available-with-huge-discount-know-specs-price-sale-offer/feed/ 0
POCO Smartphone वर जबरदस्त सूट; पुन्हा मिळणार नाही इतका मोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर https://www.91mobiles.com/marathi/5000-discount-on-poco-smartphones-poco-x4-pro-5g-poco-m4-pro-5g-poco-m5-in-flipkart-big-billion-days/ https://www.91mobiles.com/marathi/5000-discount-on-poco-smartphones-poco-x4-pro-5g-poco-m4-pro-5g-poco-m5-in-flipkart-big-billion-days/#respond Wed, 14 Sep 2022 11:16:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13100 दिवाळीच्या आधी टेक ब्रँड पोकोनं अतिशबाजी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीनं आपल्या मोबाइल फोन्सवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. यात कंपनीच्या महागड्या फोन्सचा समावेश तर आहेच परंतु बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सवर देखील मोठी सवलत दिली जात आहे. यातील काही POCO Smartphones वर 5,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. कंपनीनं POCO X4 PRO 5G, POCO M4 PRO 5G […]

The post POCO Smartphone वर जबरदस्त सूट; पुन्हा मिळणार नाही इतका मोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दिवाळीच्या आधी टेक ब्रँड पोकोनं अतिशबाजी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीनं आपल्या मोबाइल फोन्सवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. यात कंपनीच्या महागड्या फोन्सचा समावेश तर आहेच परंतु बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सवर देखील मोठी सवलत दिली जात आहे. यातील काही POCO Smartphones वर 5,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. कंपनीनं POCO X4 PRO 5G, POCO M4 PRO 5G आणि POCO M5 वर भरभक्कम डिस्काउंटची घोषणा केली आहे. पुढे आम्ही कंपनीच्या ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.

पोको मोबाइल फोन्सवरील डिस्काउंट

पोको एक्स4 प्रो 5जी फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ऑफर अंतगर्त 18,999 रुपयांमध्ये मिळणारा फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये मिळेल. तर 19,999 रुपयांच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये झाली आहे. तर सर्वात मोठा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 21,999 रुपयांच्या ऐवजी 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: रेडमीला बाजारातून हद्दपार करण्यासाठी रियलमी सज्ज; फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच

POCO X4 Pro 5G Launch Price Discount After Price
4GB+64GB INR 18,999 INR 5,000 INR 13,999*
6GB+128GB INR 19,999 INR 5,000 INR 14,999*
8GB + 128GB INR 21,999 INR 5,000 INR 16,999*

पोको एम4 प्रो पाहता या फोनच्या 8 जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर 4,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे त्यामुळे याची किंमत 18,999 रुपयांवरून 14,499 रुपये होईल. तसेच फोनच्या 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटवर कंपनी 3,500 रुपयांची सूट देत आहे त्यामुळे दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 11,499 रुपये आणि 13,499 रुपये झाली आहे.

POCO M4 Pro 5G Launch Price Discount After Price
4GB+64GB INR 14,999 INR 3,500 INR 11,499*
6GB+128GB INR 16,499 INR 3,500 INR 13,499*
8GB + 128GB INR 18,999 INR 4,500 INR 14,499*

पोको एम5 स्मार्टफोन देखील या स्कीम अंतगर्त 1,500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑफर अंतगर्त 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांच्या ऐवजी 10,999 रुपयांमध्ये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 14,499 रुपयांची ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

POCO M5 Launch Price Discount After Price
4GB+64GB INR 12,499 INR 1,500 INR 10,999*
6GB+128GB INR 14,499 INR 1,500 INR 12,999*

उपरोक्त डिस्काउंट पोकोच्या सर्व स्मार्टफोन्सवर शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या Big Billion Days सेलमध्ये खरेदी केल्यास मिळेल. या सेलच्या तारखेची घोषणा फ्लिपकार्टनं आजच केली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल या महिन्यात 23 तारखेला सुरु होणार असून हा सेल 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहील. या कालावधीत स्मार्टफोन्ससह अनेक वस्तूंवर दमदार डिस्काउंट, डील्स आणि ऑफर्स मिळतील.

The post POCO Smartphone वर जबरदस्त सूट; पुन्हा मिळणार नाही इतका मोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000-discount-on-poco-smartphones-poco-x4-pro-5g-poco-m4-pro-5g-poco-m5-in-flipkart-big-billion-days/feed/ 0