How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक

How To Test Internet Speed: भारतात Airtel 5G Plus आणि Jio Ture 5G सेवा सुरु झाल्या आहेत. एक ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G लाँच केलं होतं, त्यानंतर एयरटेलनं देशात 8 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. तसेच रिलायन्स जियोनं 6 ऑक्टोबरला पाच शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. 5G सर्व्हिसमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी हाय-स्पीड इंटरनेटचा दावा केला आहे. असा दावा तुमचे लोकल इंटरनेट प्रोव्हायडर देखील करतात. परंतु यात किती तथ्य आहे हे तुम्ही एका टेस्टनं जाणून घेऊ शकता. इंटरनेट स्पीड टेस्टच्या मदतीनं तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड मोजू शकता, मग लोकल प्रोव्हायडर असो किंवा तुमची टेलिकॉम कंपनी.

How To Test Internet Speed

इंटरनेट आता घरोघरी पोहोचलं आहे. त्यामुळे अधूनमधून इंटरनेट स्पीडचा प्रॉब्लम डोकं वर काढतो. जर तुम्हाला देखील इंटरनेट कनेक्शनचा स्पीड चेक करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला स्मार्ट पद्धत सांगणार आहोत, जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून चुटकीसरशी इंटरनेट स्पीड चेक करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरून इंटरनेट स्पीड चेक करण्याची माहिती आली आहे. हे देखील वाचा: झक्कास! 101 रुपयांमध्ये मिळतायेत Vivo Phone, दिवाळीच्या आधी कंपनीची जबराट ऑफर

Internet Speed Test

इंटरनेट स्पीड चेक करण्यासाठी तुम्हाला फोन किंवा फिर लॅपटॉपच्या ब्राउजर मध्ये Internet Speed असं सर्च करावं लागेल.

इथे तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये पहिला ऑप्शन गुगलच्या इंटरनेट स्पीड टेस्टचा दिसेल.

या बॉक्समध्ये तुम्हाला ‘रन स्पीड टेस्ट’ Run Speed Test वर क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा डाउनलोड आणि अपलोड स्पीड चेक करता येईल.

तसेच fast.com किंवा speedtest.net सारख्या वेबसाइट देखील तुमच्या कनेक्शनचा इंटरनेट स्पीड सांगू शकतात.

स्मार्टफोनमध्ये App देखील करेल मदत

जर तुम्हाला फोनच्या ब्राउजरमधून इंटरनेट स्पीड चेक करायचा नसेल तर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅप देखील इंस्टॉल करता येईल. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून Ookla App इंस्टॉल करावं लागेल. इंटरनेट स्पीड टेस्ट कारण्याच्याबाबतीत विश्वासू अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप आतापर्यंत 100 मिलियन पेक्षा जास्त वेळा इंस्टॉल करण्यात आलं आहे. हे देखील वाचा: 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here