Qualcomm Snapdragon 855 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात https://www.91mobiles.com/marathi/realme-flagship-phone-with-snapdragon-855-plus-soc-teased/ https://www.91mobiles.com/marathi/realme-flagship-phone-with-snapdragon-855-plus-soc-teased/#respond Wed, 17 Jul 2019 16:03:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4823 रियलमी व्यतिरिक्त Black Shark, nubia Red Magic, Vivo NEX आणि Vivo iQOO कंपन्या पण आपले स्मार्टफोन या प्रोसेसर सह लॉन्च करू शकते.

The post Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अमेरिकन कंपनी क्वालकॉमने आपल्या नवीन मिड-साइकिल फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेटची घोषणा केली आहे, ज्या नंतर चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस पवार्ड स्मार्टफोनच्या लॉन्च बद्दल टीजर जारी केला आहे. कोणत्या फोन सोबत हा प्रोसेसर सादर केला जाईल याचा उल्लेख कंपनीने अजूनतरी केला नाही.

Realme ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर पोस्ट केली, ज्यात Hello स्नॅपड्रॅगॉन 855+ लिहिण्यात आले आहे. या पोस्ट सह प्रोससेरचा फोटो पण आहे. यावरून हिंट मिळाली आहे कि कंपनी येत्या काळात स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर असलेला फोन सादर करू शकते.

हे देखील वाचा: 12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च

नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस बद्दल बोलायचे तर यात पावरफुल सीपीयू आणि चांगल्या जीपीयू चा वापर केला गेला आहे. तसेच रियलमी व्यतिरिक्त Black Shark, nubia Red Magic, Vivo NEX आणि Vivo iQOO कंपन्या पण आपले स्मार्टफोन या प्रोसेसर सह लॉन्च करू शकते.

काही दिवसांपूर्वी रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली होती कि कंपनी लवकरच 5G हँडसेट मार्केट मध्ये सादर करू शकते. तसेच हि टेक्नोलॉजी भारतात सादर करण्यासाठी पण माधव यांनी आपल्या ट्विट मध्ये उल्लेख केला होता.

आगामी 5G स्मार्टफोन बद्दल सध्या तरी कोणतीही माहिती समोर आली नाही आशा आहे कि स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह येईल. स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा 855+ असल्यामुळे या फोन मध्ये फ्लॅगशिप फीचर्स दिले जातील.

हे देखील वाचा: 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5

विशेष म्हणजे कंपनीने अलीकडेच आपला Realme X आणि Realme 3i भारतात लॉन्च केले होते. Realme 3i एक बजेट कॅटगरीचा फोन आहे, ज्याची सुरवातीची किंमत 7,999 रुपये आहे. तर Realme X को कंपनी ने 16,999 रुपयांमध्ये सादर केला होता. डिवाइस 23 जुलै पासून प्लिपकार्ट वर सेल साठी येईल.

रियलमी एक्स वीडियो

The post Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-flagship-phone-with-snapdragon-855-plus-soc-teased/feed/ 0
शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/#respond Thu, 25 Apr 2019 11:37:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4160 फोनच्या नावाच्या जागी Redmi 855 लिहिण्यात आले आहे.

The post शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत आहे कि कंपनी एका नवीन हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस वर काम करत आहे जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात ​पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाईल. अनेक लीक्स मध्ये या स्मार्टफोनचे नाव Redmi Pro 2 सांगण्यात आले आहे पण अजूनतरी स्पष्ट झाले नाही कि कि Redmi Pro 2 शाओमी स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर करेल किंवा हा या चिपसेट वर आधारित फोन एखाद्या दुसऱ्या नावाने टेक मंचावर येईल. शाओमीने अजूनपर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत तसेच एका ताजा लीक मध्ये या फोन स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

शाओमी के स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केले गेले आहेत. या वेबसाइट वर टिपस्टर द्वारा एक फोटो फाईल अपलोड करण्यात आला आहे ज्यात शाओमीच्या आगामी स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. तसेच हीच फोटो फाईल स्लॅशलीक वेबसाइट वर पण शेयर करण्यात आली आहे जिथे फोनच्या नावाच्या जागी Redmi 855 लिहिण्यात आले आहे.

Redmi 855 स्पेसिफिकेशन्स
शाओमीच्या या फोनची सर्वात मोठी खासियत फोन मधील क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 855 क्वालकॉम द्वारा लॉन्च केला गेलेला आतापर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट आहे. हा चिपसेट फक्त फास्ट प्रोसेसिंग देत नाही तर सोबत हा चिपसेट असलेले स्मार्टफोन 5जी नेटवर्कला पण सपोर्ट करतात. हा चिपसेट सध्या फक्त हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस साठी आणण्यात आला आहे.

हे देखील वाचा: ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता ताजा लीक नुसार या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.39-इंचाचा डिस्प्ले​ दिला जाईल. बोलले जात आहे कि शाओमीचा हा फोन एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल आणि ज्यामुळे फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वतः रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी म्हटले होते कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन हाई स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला जाईल.

लीक नुसार रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा असेल तसेच तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा दिला जाईल.

कथित Redmi 855 मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची बातमी पण या लीक मध्ये सावर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शाओमीचा एका फोनचा फोटो पण समोर आला होता ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दाखवण्यात आला होता. बोलले जात आहे कि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या शाओमीच्या फोन मध्ये पण हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. लीक नुसार शाओमीच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये एनएफसी कनेक्टिविटी मिळेल.

हे देखील वाचा: BSNL ने या तीन प्लान मध्ये केले बदल, मिळेल 25 पट जास्त डेटा

शाओमीने अजूनतरी या फोनचे नाव आणि याची लॉन्च स्थिति बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपनी एखादी आफिशियल घोषणा करत नाही तोपर्यंत या फोन संबंधीत स्पेसिफिकेशन्स पण निश्चित म्हणता येणार नाहीत.

weibo

The post शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/feed/ 0