Xiaomi बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत आहे कि कंपनी एका नवीन हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस वर काम करत आहे जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाईल. अनेक लीक्स मध्ये या स्मार्टफोनचे नाव Redmi Pro 2 सांगण्यात आले आहे पण अजूनतरी स्पष्ट झाले नाही कि कि Redmi Pro 2 शाओमी स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर करेल किंवा हा या चिपसेट वर आधारित फोन एखाद्या दुसऱ्या नावाने टेक मंचावर येईल. शाओमीने अजूनपर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत तसेच एका ताजा लीक मध्ये या फोन स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.
शाओमी के स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केले गेले आहेत. या वेबसाइट वर टिपस्टर द्वारा एक फोटो फाईल अपलोड करण्यात आला आहे ज्यात शाओमीच्या आगामी स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. तसेच हीच फोटो फाईल स्लॅशलीक वेबसाइट वर पण शेयर करण्यात आली आहे जिथे फोनच्या नावाच्या जागी Redmi 855 लिहिण्यात आले आहे.
Redmi 855 स्पेसिफिकेशन्स
शाओमीच्या या फोनची सर्वात मोठी खासियत फोन मधील क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 855 क्वालकॉम द्वारा लॉन्च केला गेलेला आतापर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट आहे. हा चिपसेट फक्त फास्ट प्रोसेसिंग देत नाही तर सोबत हा चिपसेट असलेले स्मार्टफोन 5जी नेटवर्कला पण सपोर्ट करतात. हा चिपसेट सध्या फक्त हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस साठी आणण्यात आला आहे.
हे देखील वाचा: ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस
इतर स्पेसिफिकेशन्स पाहता ताजा लीक नुसार या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.39-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. बोलले जात आहे कि शाओमीचा हा फोन एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल आणि ज्यामुळे फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वतः रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी म्हटले होते कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन हाई स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला जाईल.
लीक नुसार रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा असेल तसेच तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा दिला जाईल.
कथित Redmi 855 मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची बातमी पण या लीक मध्ये सावर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शाओमीचा एका फोनचा फोटो पण समोर आला होता ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दाखवण्यात आला होता. बोलले जात आहे कि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या शाओमीच्या फोन मध्ये पण हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. लीक नुसार शाओमीच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये एनएफसी कनेक्टिविटी मिळेल.
हे देखील वाचा: BSNL ने या तीन प्लान मध्ये केले बदल, मिळेल 25 पट जास्त डेटा
शाओमीने अजूनतरी या फोनचे नाव आणि याची लॉन्च स्थिति बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपनी एखादी आफिशियल घोषणा करत नाही तोपर्यंत या फोन संबंधीत स्पेसिफिकेशन्स पण निश्चित म्हणता येणार नाहीत.

















